Saturday, January 16, 2021

माजी नगरसेविका सौ.प्रतिभाताई इसळ यांची विदर्भ संघटक म्हणून निवड.

🕉️माजी नगरसेविका सौ.प्रतिभाताई इसळ यांची धनगर धर्म पीठाच्या विदर्भ संघटक म्हणून नियुक्ती🌹🌹


   "धर्मो रक्षिती रक्षत: "असे शास्त्र वचन आहे आणि जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा देवादिकांनी स्त्रीशक्तीच्या स्वरूपातच सृष्टीचे रक्षण केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आहे. धनगर समाजाचा धार्मिक, सामाजिक, राजकीय इतिहासाचे संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण झालेल्या धर्म पीठामध्ये स्त्रीशक्तीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे जे वंदनीय आहे,अपेक्षित आहे.

  आज अशाच एका कर्तृत्ववान भगिनीने धर्म पीठाचे धर्म कार्य आपल्या खांद्यावर घेतले आहे.त्या आहेत अमरावती येथील माजी नगरसेविका सौ.प्रतिभाताई इसळ.

  सौ.प्रतिभाताई यांचे महिला विकासात मोठे योगदान असून बचत गटामार्फत त्यांनी गरजू महिलांना मदतीचा हात दिला आहे.समाजसंघटन व समाजप्रबोधनात सुद्धा त्या अग्रेसर आहेत.त्या पदवीधर असून माजी नगरसेविका आहेत ,महिला आघाडी मध्ये कार्यरत आहेत.समाजाच्या प्रत्येक चळवळीत त्या सक्रिय असतात.

सौ.प्रतिभाताई यांची धनगर धर्म पीठ महिला आघाडीच्या विदर्भ संघटक म्हणून धर्म पीठ महिला राज्यधक्ष सौ.शारदाताई ढोमने यांनी निवड जाहीर केली  आहे.त्यांच्या मदतीने धर्म पीठाचे काम विदर्भात अजून जोमाने पुढे जाईल. 🌹

✍️विनायक काळदाते.

      रेशमा ठोंबरे,प्रसिद्धी प्रमुख


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...