Sunday, January 17, 2021

नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा.बाबा टेकाडे यांची नेमणूक.


🕉️धर्म पीठाची   नागपूर येथील पताका प्रा बाबा टेकाडे यांच्या खांदयावर🕉️ 
   महाराष्ट्राच्या उपराजधानीत धनगर धर्म पीठाची झेंडा जोमाने फडकवण्याच्या हेतूने धर्म पीठाचे  नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा.बाबा टेकाडे यांची निवड करण्यात आली आहे.
   लांबलचक बायोडाटा असलेले बाबा टेकाडे हे सावनेर येथे प्राध्यापक आहेत,पत्रकार आहेत व हाडाचे समाजसेवक आहेत.
  प्राध्यापक असलेल्या बाबा टेकाडे यांनी यापूर्वी  पत्रकार संघाचे अध्यक्ष पद,य.श.मुक्त विद्यापिठाचे संयोजक पद,एन.सि.सि.चे मेजर पद,तालुका क्रिडा समितीचे सचिव पद,विशेष कार्यकारी अधिकारी पद तसेच तंटा मुक्ती समितीचे पदाधिकारी पद भूषविले आहे.
   अत्यंत उर्जावान असलेले हे व्यक्तीमत्व समाजकार्यासोबतच विविध समाजप्रबोधनात व समाजविकास कार्यात अग्रेसर असते.
प्रा.श्री.बाबा टेकाडे यांच्या धर्म पीठावरील नेमणूकीमुळे नागपूर जिल्ह्यात धर्म पीठाच्या कामकाजाला बळकटी येउन समाजप्रबोधन,समाजशिक्षण व समाज संघटीकरणातून समाजविकासाचा हेतू साध्य होण्यास मदत होईल.🌹

प्रा.बाबा टेकाडे
सुभाष शाळेजवळ, सावनेर
जि.नागपूर
मो.8888862911

✍️विनायक काळदाते
      ह.भ.प.प्रभाकर दिवनाले
      ज्ञानेश्वर ढोमने.

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...