पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
सध्या सोशल मिडीया आणि प्रिंट मिडीयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली हे चांगलेच गाजत आहे.
सांगली महानगर पालिकेत श्री विष्णु माने हे जमातीचे एक कर्तव्यदक्ष, कर्तव्य निष्ठ, समाज निष्ठ कर्तुत्वान अनेक वेळेस जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आहेत.श्री
विष्णु माने राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श असा राजकीय, धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक ईतिहास सांगली जिल्ह्य़ातील लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. आदर्श तरूण पिढी निर्माण झाली पाहिजे,लोकांनी पुस्तक वाचली पाहिजेत. या साठी पुण्यश्लोक धअहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने काही तरी झाले पाहिजे या हेतूने त्यांनी विचार केला.त्यांनी तो विचार आचरणात आणला आणि कर्तुत्वान असल्याचे सिद्ध केले.श्री विष्णु माने यांनी सर्व राजकीय पक्षातील नगरसेवक २०११ साली एकत्र केले आणि तत्कालीन महापौर डाॅ.नितीन सावगावे यांना घेऊन जयंत पाटील यांना भेटले. श्री जयंत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि स्मारका साठी जमिनीची शोधा शोध सुरू झाली.शहरात जमिन मिळेना. मग विष्णु माने हे रघुवंश सोसाटीचे सदस्य आहेत. त्यांनी रघुवंश सोसायटीची करोडो रूपये किमत असलेली पाऊण एकर जागा सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या मार्फत महानगर पालीकेस दिली. अशा तर्हेने अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगलीचे काम २०१२ ला भूमी पुजन करून सुरू झाले. नंतर महानगर पालीकेत व राज्यात भाजपची सत्ता आली तरीही ज्येष्ठ नगरसेवक श्री विठ्ठल खोत यांच्या सौ. संगिताताई खोत भाजप महापौर झाल्या. नगरसेवक सरगर,नगरसेवक हुलवान असे सर्व नगरसेवक. तसेच सर्व जाती धर्माचे नगरसेवक एकत्र येऊन स्मारकाचे काम चालूच ठेवले. भव्य दिव्य कमान. सुंदर असे कंपाऊंड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा मिक्स धातूचा पुतळा. पुतळ्याचा मंडप अगदी सुंदर असाच आहे.शेजारी ऐतिहासिक पुस्तकासाठी ग्रथांलय उभारले आहे.कपांउड भितींवर आतील बाजूस ऐतिहासिक चित्रांची सजावट केलेली आहे.सांगली महानगर पालीकेने आज पर्यंत पावणे दोन कोटी रूपये खर्च केलेला आहे. उद्घाटन सोहळा मा.महापौर संगिताताई खोत यांच्या कार्य कालात होणार होता. सांगलीचा महापूर, कोरोना अशा संकटांना संगिताताई यांनी सक्षम पणे हताळले आणि शहराची कमान सांभाळली.कोरोना आला आणि स्मारक समर्पण सोहळा लांबनीवर पडला.सांगली
महानगर पालीके मार्फत आणखीही जोरदार पणे काम काज सुरूच आहे.
रघुवीर सोसायटीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी ग्रथांलयाच्या पुस्तकासाठी पन्नास हजार रूपये जाहीर केले आहेत.
मी सांगलीत साहित्य संमेलन बैठकीला गेल्यानंतर श्री विष्णु माने, श्री विठ्ठल खोत, सौ संगिताताई खोत यांनी महापौर होण्यापूर्वी व नंतर नेहमीच सहकार्य केले आहे.
सांगली मध्ये सर्व पक्षीय धनगर जमात नगरसेवक एकत्र पणे काम करत असतात. करत आहेत.
सौ संगिताताई खोत मा.महापौर सांगली
यांच्या कर्तुत्वाची दखल घेत त्यांचा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य म्हसवडचे स्वागताध्यक्ष मा.बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी साहित्य संमेलनात भव्य राज्य स्तरीय सत्कार केलेला आहे.
तसेच विष्णु माने यांनाही साहित्य संमेलनात राज्य स्तरीय यशवंतराव होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
अशा या बहुचर्चित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक अर्पण सोहळा दि. २|०४|२०२२ रोजी सांगली येथे गुडीपाडव्याच्या मुहुर्तावर दुपारी ०४ वाजता करण्यात येणार आहे. तरी सांगली जिल्ह्य़ातील व महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रेमींनी हजर राहण्यासाठी सोसेल मिडीयात निमंत्रण देण्यात आली आहेत. राज्य भरातून जमातीची मान्यवर मंडळी स्मारकाला भेटून जात आहेत. माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिगोंली,रामराव जी वडकूते .डाॅ.बाबाहेब देशमुख स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे वारस व शेकाप नेते हेही भेट देवून गेले आहेत.
लोकशाही मध्ये राजकीय नाट्य झालीच पाहीजेत. तो विरोधकांचा हक्क असतो.राजकीय नाट्यामुळे दोन गोष्टी घडतात एक तो कार्यक्रम राज्य भर प्रसिद्ध होतो.विरोधक जागरुक असल्याचे राज्य भरातील लोकांना समजते. या ठिकाणी विरोध झाल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक सांगली हे कार्य व कार्यक्रम मुंबई ते पुणे आणि कोल्हापूर ते नागपूर असा चांदा ते बांधा प्रसिद्ध झाला आहे.विरोध होण्याचे दुसरे एक महत्वपूर्ण कारण आहे. लोक शाहीत राज सत्ता मिळवण्यासाठी वोट बँक ला महत्त्व असते.धनगर जमात राज्यात जरी दोन नंबर असली तरी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या विभागात एक नबंर आहे.त्यामुळे वोट बँक टिकवण्या साठी उद्घाटन नाट्य असने स्वभावीक आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठ वाड्यात धनगर जमात एकत्र येवू नये या साठी राजकीय पक्ष वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात.तोडा, फोडा आणि राज्य करा असे धोरण आहे.जमातीच्या नेत्यांनी हुशारीने वागावे.राजकीय पक्ष वापर करून फेकून देतात. माजी आमदार मा.रामहरी रुपनवर .माजी आमदार मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख, मा.आमदार रामराव वडकूते, मा.माजी मंत्री राम शिंदे साहेब .माजी आमदार मा. हरिदास जी भदे राजकारण जरूर करतात पण जमातीचे कार्य असेल तर पक्षाचे जोडे सभागृहा बाहेर काढून येतात त्या मुळे आजही ते जमाती साठी आदरणीय आहेत आणि सदैव रहातील .तसेच या मान्यवरांनी जातीचे राजकारण कधीच केले नाही.यांनी जात कधीही राजकीय डावावर खेळली नाही.
स्वतःचा राजकीय स्वार्थ साधन्या साठी एखादा मडंप टाकून कार्यक्रम घेणे सोपे असते.पण समाजा साठी समर्पित भावनेने काम करणे व कार्य करून ठेवणे महा कठीण असते.मा.नगरसेवक विष्णू माने गेले दहा ते अकरा वर्षे झाले अहिल्याबाई होळकर स्मारका साठी कष्ट करत आहेत. मा.विष्णू माने खरोखर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रेमी आहेत.कारण अकरा वर्षांत सांगली महानगर पालिकेत अनेक राजकीय व शासकीय पदाधिकारी आणि अधिकारी येवून गेले विष्णु माने आणि रघुवंश सोसायटी यांनी जातीने लक्ष घालून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक पुर्ण केले. महाराष्ट्र राज्यातील जमाती मध्ये प्रमाणीक पणे समाजासाठी काम करणारे लोक आहेत. समाजात वर्गणी गोळा करून कार्य क्रमाच्या नावाखाली उदरनिर्वाह करणारे आहेत.काही फक्त बोल बच्चन आहेत आणि कर्तव्यशुन्य आहेत.काही लबाड आणि भामटे आहेत, समाजाच्या जिवावर राजकीय पदे मिळवतात लवकर संपून जातात. पण आजही धनगर जमाती मध्ये अनेक प्रमाणीक पणे मनोभावे कार्य करणारे विष्णू माने सारखे सज्जन लोक आहेत. त्यांना मदत करणारे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल खोत, संगिताताई खोत,हरिदास जी लेंगरे असे लोक आहेत. तसेच सर्व पक्षीय सांगलीतील नगरसेवक यांनीही मदत केलेली आहे. कावळ्याच्या घरट्यात कोकीळा अंडी घालून पळून जाते म्हणून ते घरटे कोकीळेचे होत नाही.सरकरी काम हे कावळ्याच्या घरट्या सारखे असतात, काम एक करतो तर उद्घाटन दुसराच करतो.पण विष्णू माने हे उधार मतवादी आहेत ते भाजप सरकारच्या काळातही त्याच्यांकडून उद्घाटनास तयार होते. पण ते नशिबवानही आहेत त्यांची सत्ता महानगर पालीकेत आली आणी उद्घघाटन संधीही त्यांना मिळाली.दि.०२|०४|२०२२ दुपारी ०४ नंतर गुडी पाडव्याच्या मुहुर्तावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा आहे. कार्यक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कधीही जाती साठी काम केले नाही. धर्मासाठी जरूर केले पण धार्मिक असहिष्णूता केली नाही. अखंड हिंदुस्थान आणि हिंदू धर्माच्या रक्षण आणि उन्नती साठी आदर्श राज्य केले. आपणही या आदर्श मातेचा वारसा जतन करत एकत्र येऊन चांगले कर्तुत्व बजावनार्या लोकांबरोबर उभे राहीले पाहीजे. त्यांचा गौरव केला फाहीजे. ज्यांना शक्य असेल त्या सर्व खरोखर अहिल्या प्रेमी लोकांनी भव्य व देखण्या स्मारक लोकार्पण कार्यक्रमास हजर रहावे, भेट द्यावी.
लेखक:
डाॅ. अभिमन्यु टकले.
प्रसिद्धी प्रमुख:
रेशमा ठोंबरे सांगली.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य .
धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य.🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
