Friday, January 29, 2021

धनगर जमातीच्या चळवळी संपवनारे संपले पाहिजेत हेच कै.बि.के.कोकरे यांनाअभिवादन-डॉ. अभिमन्यू टकले.

धनगर जमातीच्या चळवळी संपवणारे संपले पाहिजेत हेच कै.बि के कोकरे यांना अभिवादन 

प्रा. डाॅ.अभिमन्यु टकले 

🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️धनगर जमातीच्या प्रमाणीक चळवळी संपवणारे संपले पाहिजेत हेच माझे कै. बापूसाहेब कोकरे यांना विनम्र अभिवादन. 

श्री बापूसाहेब कोकरे यांनी धनगर समाजाच्या समाज कारणाची लोकशाहीतील पहिली चळवळ १९८८ ला सुरू केली.या संघटनेचे नाव यशवंत सेना का? तर महाराजा यशवंतराव होळकर , शाहू महाराजांच्या मुलगा यशवंत, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुत्र यशवंत यांच्या नावाने यशवंत सेना काढण्यात आली. श्री अनिल कुमार  वाघे सोलापूर हे पहिले यशवंत सेनेचे सचिव. मी २००३ते२००४ या काळात श्री अर्जुन दादा सलगर बरोबर दोन्ही नेत्यांच्या घरी जाऊन आलो आहे. यशवंत सेना व हे नेते कसे संपवले? का संपवले? कोणी संपवले?याची उत्तरे शोधली? यशवंत सेना धनगर जमातीच्या लोकांनीच सुपारी घेऊन संपवली.दोन्ही नेते विषाणू जन्य जैविक अस्त्र वापरून नष्ट केले. आगोदर वाघे वारले. नतंर कै.बी के कोकरे यांना नष्ट केले.

यशवंत सेना स्थापनेत श्री पांडुरंग गडदे मास्तर  मुंबई यांचा मोठा वाटा होता.गडदे मास्तर मुंबई चे अध्यक्ष होते.श्री राजू जांगळे कोकण चे अध्यक्ष होते.श्रीरंग वाघमोडे लोखंडी जथा विभाग अध्यक्ष होते.तर श्री बापूसाहेब हटकर हे सरचिटणीस मुंबई होते.

कै बापूसाहेब यांनी समाज सेवेची डरकाळी फोडली होती आणि महाराष्ट्राची राजकीय गादी थरथरली होती.१९९०ला पंढरपूर आरक्षण मेळावा जाहीर झाला.आषाढी कार्तिकी  यात्रा नसताना पंढरपूर यात्रा भरली. कै.बापूसाहेब कोकरे चा ताबा शत्रुने घेतला होता.बापूसाहेबांना थम्स  अप मध्ये मद्य घालून पाजले जात होते. बाहेर धनगर जमातीच्या घोषणा चालू होत्या.बापूसाहेब स्टेज वर हडभडत आले आणि एकच वाक्य बोलले यशवंत सेना काँग्रेस मध्ये विलीन करत आहे. नतंर धनगर जमातीला एन टी २आरक्षण मिळाले. बापूसाहेबाना विषाणू जन्य जैविक आजार निर्माण केला गेला होता. जबरदस्ती खिशात पैसे कोंबले होते. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जा तेथेच नोकरी कर परत आला तर बघून घेवू  म्हणून बापूसाहेब महाराष्ट्र राज्यातून हाकलून लावले. बापूसाहेब परत ससून रुग्णालय पुणे येथे उपचार घेत घेत समाजासाठी शहीद झाले, शेवटची मदत श्री अर्जुन दादा सलगर आणि श्री महादेव जी जानकर यांनी केली.

आज आरक्षणामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी, डाॅ.ईजिंनियर, प्रशासकीय अधिकारी झाले आहेत.पण आपल्याला सवलत का मिळाली हे विसरून कुटुंबात रममाण होऊन आयुष्याचे भौतिक भोग घेत आहेत. 

अनेक ग्रामपंचायत, झेडपी सदस्य या सवलती घेत आहेत. पण आपल्या आईवडील व्यतिरिक्त आपल्या साठी कोणीतरी झगडले आहेत बळी गेलेले आहेत, आयुष्याचा यज्ञ करून स्वत:ची आहुती दिली आहे हे का विसरता? चांगल्या चळवळी संपवण्या साठी आजही प्रस्थापित नालायक लोकांकडून सुपारी घेतली जाते आणि चळवळी संपवल्या जातात. आपलेच लोक चिरीमिरी घेवून बंड करतात आणि चळवळी संपवतात. कै.बापूसाहेब कोकरे चे वादळ दोन तीन वर्षात च संपवण्यात आले.मेळाव्या नतंर बापूसाहेब कोकरेचें काय झाले त्याचा शोध जमातीने का नाही घेतला? त्यांचा शोध घेवून मदत का नाही केली? आजही बापूसाहेब कोकरेच्यां नावाने राज्यात अनेक सामाजिक दुकाने थाटण्यात आली आहेत.विठोजी रावांना पेशव्यांनी हलहल करून मारून टाकले त्याचा बदला म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांनी पुणे जाळून टाकले होते व हाडे उरूळी कांचन पर्यंत पसरली होती. पेशवे कोकणात पळून गेले होते.पण बीके कोकरेंचे बलिदान मात्र आजही प्रस्थापितांच्या बिमोडाची वाट पहात आहे.धनगर समाजाच्या चळवळींची अवस्था काशीला निघालेल्या  कुत्र्यां सारखीे झाली आहे.  मालकांचा आदेश पाळण्या साठी प्रमाणीक पणे टुकड्यावर जगणारी कुत्री ईतर कुत्र्यांना आपला ईलाका ओलांडून देत नाहीत अशी अवस्था आहे.सध्याच्या सर्व सामाजीक राजकीय चळवळी फक्त आणि फक्त आरक्षणाच्या नावावर चालू आहेत. या सर्वाना माहीती आहे आरक्षण मिळणार नाही .तरीही आरक्षणाच्या नावावर कोणी पैसे कमावून हात धुतले,कोणी आमदार खासदार होऊन हात धुतले.काही राजकीय पक्ष सत्तेत आले.धनगर समाज मात्र राजकीय, सामाजिक, अर्थिक, मानसिक रित्या गिरणीत  दळला जात आहे.हे थांबले पाहिजे.धनगर जमातीला आरक्षण कसे  मिळेल यावरती यांच्याकडे खरे उत्तर नाही. कलयुगात सत्य व धर्म एकटेच  निंदा, नालस्ती,आपमान, कष्ट, अन्याय सहन करत असते .या उलट अधर्माचे ,असत्याचे सर्व सोबती आणि संगती असतात. पण लक्षात  ठेवा सत्य परेशान हो सकता है पराजित नही.

मराठा समाजाच्या आरक्षणा साठी आण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले त्यांच्या नावाने महामंडळ सुरू झाले,अनेक संस्था स्मारक स्थापन झाल्या पण बि के चा बदला घेणे सोडा आपण व मी एखाद्या चौकात फोटो पुतळा,स्मारक उभा करू शकलो नाही? कसा समाज सुधारणार? बि के चा इतिहास बाहेर आला पाहिजे या साठी साहित्य संमेलनात त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला.त्यांची प्रतीमा  पहिल्या साहित्य संमेलनात प्रथम दर्शनी ठेवण्यात आली. यशवंत  सेना सेना पतींचा पुरस्कार देऊन गौरवही केला. या निमीत्ताने मला एकच सांगायचे आहे ज्यांनी ज्यांनी जमातीला, आरक्षण, राजकीय, सामाजिक, अर्थीक रित्या फसवले आहे व  चांगल्या चळवळी संपवण्या साठी सुपार्या घेणार्या विषारी सापांना वेळीच ठेचले पाहिजे तरच समाजाचे हित आहे.बि के कोकरे यांच्या नावाने एखादे मध्यवर्ती स्थळ पाहून पुतळा उभा करावा व दरवर्षी या ठिकाणी त्यांना अभिवादन करावे.होळकर घरण्याने देशाचे राजकारण केले.पण बि के कोकरे नी फक्त धनगर जमाती साठी बलिदान दिले.त्यांचा पुतळा एका व्यक्तीकडून, गावाकडून, उभा करू नये तर त्यांचे काम राज्यासाठी होते.राज्याने उभा करावा.बि के ची जिवंत असताना लोकांनी काळजी घेतली नाही. जमातीने आता तरी सावध व्हावे चांगल्या चळवळी संपवनारे, चांगल्या लोकावर भुंकणारे, सुपार्या घेवून जमातीला संपवनारे संपले पाहिजेत. कै.बापूसाहेब कोकरे साहेब तुमच बलिदान व्यर्थ जाणार नाही आम्ही एकत्र येत आहोत, शूर आहोत, षंड नाहीत.आम्ही विठोजीचे बलिदान विसरलो नाहीत. आमच्या विरंगना तुरूंगात टाकून ठार मारल्या हे ही विसरलो नाहीत. बापूसाहेबांची चळवळ कपटाने संपवली आहे व बापूसाहेबांना कपट करून मारलेले आहे हे ही विसरलो नाहीत.तुमच्या बलिदानचे विचार आमच्या मनात आले तरी आमची तळपायाची आग मस्तकात जाते पण लोकशाहीने कायद्याने आमचे  हात बांधले आहेत. आम्ही आपले घरातले बाहेरचे शत्रु संयम,शांतता, बुध्दी,एकता यांनी अप्रत्यक्ष  रित्या नक्कीच ठेचू तुमच राहीलेले कार्य  पुरे करू हीच आमची तुम्हाला विनम्र आदरांजली विनम्र अभिवादन 

जय मल्हार 

हर हर महादेव 

प्रा.डाॅ.अभिमन्यु टकले 

संस्थापक 

धनगर धर्म पिठ 

आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐♟️💐💐💐💐💐💐💐💐💐


Monday, January 25, 2021

धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल श्री.गोपाळभाऊ गावंडे यांचा अकोला येथे सत्कार.

🕉️🌹धर्मपिठ विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल मा.गोपाळभाऊ गावंडे यांचा अकोला येथे सत्कार🕉️🌹


   समाज शिक्षण,प्रबोधनातून  सर्वांगीण समाज विकास साधन्याचे व्हिजन व मिशन असलेल्या धर्मपिठामध्ये  शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, ईजिनिअर,व्यावसायिक, नोकरदार सामिल होऊन समाज विकासात योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत.

  धर्मपिठाच्या विदर्भ संघटक पदी अशाच उच्च शिक्षित, तरुण,बांधकाम व्यावसायिक असलेल्या श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची निवड करण्यात आली.

  श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल अकोला येथे त्यांच्या मित्रमंडळ व हितचिंतकांकडून  मा.आ.हरिदासजी भदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  मा.जि.प.सदस्य श्री.दिनकरराव नागे,डॉ. पातुर्डे,नितीन गव्हाळे,संजय गाडगे,श्री बाळासाहेब खराटे,मनोज करणकार,दिपक नागे,देवानंद नवलकार,दिपक पातोंड,यशवंत नागे,सचिन बचे व समाजबांधव उपस्थित होते.


Sunday, January 24, 2021

आदरणीय रुक्मिणीताई गलांडे,ACP यांना धर्मपिठाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 आदरणीय रुक्मिणीताई गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂

धनगर धर्मपिठ

महाराष्ट्र राज्य.


Saturday, January 23, 2021

उपवासाचे फायदे आणी तोटे-डॉ. पुजा सहावे/डॉ.प्रविण सहावे.धर्मपिठ नागपूर शहर अध्यक्ष.

🚩आज एकादशी आहे🚩


उपवासाचे फायदे (Benefits Of Fasting)

उपवासाचे फायदे हे घरामध्ये सुख शांतीसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास करायला हवा. उपवासाने नक्की काय फायदे होतात हे आपण खाली वाचूया - 


1. उपवासामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते (Fasting Helps The Body To Detox)

बऱ्याचदा बाहेर जेवल्याने तेल आणि मसाल्याचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून  टाकणं गरजेचं आहे. यामुळे फक्त पोटासंबंधी नाही तर त्वचेच्या समस्याही या टॉक्झिन्समुळे सुरू होतात. त्यामुळे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढून टाकायला हवा. अशा स्थितीत उपवास केल्यास, तुम्ही खाद्यपदार्थांऐवजी शुद्ध पेय अर्थात फळांचा रस,  लस्सी आणि ताक असे पदार्थ पिण्याने शरीर डिटॉक्झिफाय करू शकता. यामुळे त्वचेसंबंधी समस्या कमी होण्यास सुरूवात होते. 


2. वजन कमी करण्यासाठी उपवास (Helps To Loose Weight)

वजन कमी करण्यासाठी उपवास


अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना वजन जास्त असण्याची समस्या आहे. तुम्ही वजन वाढवण्याकडे वेळेवर लक्ष द्यायला हवं. कारण नंतर हे शारीरिक दृष्टीने अधिक त्रासदायक ठरू शकतं. तसं तर वजन कमी करण्यासाठी उपवास हा चांगला पर्याय ठरू शकतो. इंटमिटेंट फास्टिंग हा सध्याचा ट्रेंड आहे. ज्याबद्दल आम्ही तुम्हाला वरही सांगितलं आहे. उपवास वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 


3. पचनक्रियेसाठी उपवासाचे फायदे (Benefits of Fasting For Digestion)

बऱ्याच लोकांना पचनक्रियेची समस्या असते. अशावेळी उपवास करणं फायद्याचं ठरतं. तुमची पचनक्रिया उपवासामुळे चांगली होते. उपवासाने शरीराचं पचनयंत्र व्यवस्थित काम करतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीर आजारांशी स्वतः लढा देण्यास समर्थ होतं. एका अभ्यासानुसार 62.33% लोकांना उपवासादरम्यान अपचनाची समस्या झाली नाहीये तर 27% लोकांची अपचनाची समस्या ठीक झाली आहे. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते. 


4. रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास (Fasting Relieves Blood Pressure)

 रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास - Benefits Of Fasting In Marathi


जसजशी जाडेपणाची समस्या वाढते, तसतशी शारीरिक समस्या वाढते आणि रक्तदाबाची समस्या ही त्यापैकीच एक आहे. रक्तदाबाची समस्या ही आजकाल तरूणपणातही होऊ लागली आहे. अशावेळी याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, उच्च रक्तदाबापासून उपवास तुम्हाला नक्कीच सुटका करून देऊ शकतो. तुम्ही जर साधारण 8 तासाचा उपवास केलात तर तुम्हाला लाभदायी ठरू शकतो. यामुळे तुमची उच्च रक्तदाबाची समस्या बऱ्याच अंशी बरी होते. तसंच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. 


5. कोलेस्ट्रॉल होतं कमी (Cholesterol Reduces)

तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपवास केलात तर यामुळे तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा तुमच्यापासून अनेक आजाराही दूर होऊ लागतात. लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल हा आजारही येतो. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ हा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. तसंच यामुळे तुमच्या हृदयावरही परिणाम होत असतो. पण तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास केलात तर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणं सोपं होतं. उपवासाच्या वेळी एचडीएल अर्थात चांगल्या कॉलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते. 


6. त्वचा होते अधिक सुंदर (Skin Becomes Beautiful)

त्वचा होते अधिक सुंदर - Benefits Of Fasting In Marathi


बऱ्याचदा क्रिम आणि इतर सौंदर्यप्रसाधनं नाहीत तर तुमच्या खाण्यातील बदलानेही त्वचा अधिक सुंदर होते. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण आणा असं नेहमी सांगण्यात येतं. जास्त तेल आणि मसाल्याचं खाणं तुम्ही खाल्ल्यास, तुम्हाला चेहऱ्यावर अधिक त्रास होतो त्याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स येणं आणि काळे डाग निर्माण होणं हादेखील होतो. उपवास ठेवल्याने तुमचं शरीर डिटॉक्झिफाय होतं आणि त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम तुमची त्वचा अधिक चमकदार आणि चांगली होण्यावर होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात तेव्हा त्वचा अधिक चमकदार होते. तसंच उपवासामध्ये तुम्ही अधिक पौष्टिक खाता आणि फळांवर अथवा फळांच्या रसावर भर देता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होते. फळांचा रस पिणं हे अतिशय शुद्ध असून त्वचेवर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. 


7. मानसिक आणि भावनात्मक लाभासाठी उपवास (Fasting For Mental And Emotional Benefits)

उपवासाचा परिणाम हा केवळ शारीरिक आरोग्यावर होतो असं नाही, त्याचा मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. उपवास करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता लागते. तुमच्या एकाग्रतेवर चांगला परिणाम होऊन कामात अधिक लक्षही लागतं. सुस्ती कमी होते. कामाकडे लक्ष केंद्रित करता येतं. तसंच सतत चिंता आणि तणाव असेल ज्यामुळे झोप येत नसेल तर उपवासाने आणि उपवासात योग्य खाण्याने तुम्हाला चांगली झोपही येते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी जर झेपत असेल तर शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास करणं चांगलं आहे. 


8. उपवासाने वय वाढतं (Fasting Increases Your Age)

आपण सतत काही ना काहीतर चुकीचे अन्नपदार्थ पोटात घालवत राहतो. त्याचा परिणाम  शरीरावर होऊन अनेक आजार निर्माण होतात. पण हे थांवबण्यासाठी आणि शरीराचं पचन आणि शरीराचं तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण उपवास करायला हवा. त्यामुळे तुमचं वय वाढतं. योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुमचं वय निश्चितच वाढतं. कारण उपवासाच्या वेळी आपण शरीराला आवश्यक तितकाच आहार घेतो. अरबट चरबट खात नाही. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. 


9. मेटाबॉलिजममध्ये होते वाढ (Increase In Metabolism)

उपवास म्हटलं की, आपण कधीही जास्त खात नाही. सहसा खाणं टाळतो. केवळ फळं आणि फळांचा रस अथवा तत्सम पदार्थांवर लक्ष देत असतो. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होऊन तुमच्या मेटाबॉलिजममध्येदेखील वाढ होते. तुमची शारीरिक ऊर्जा योग्य प्रमाणात राखून अतिरिक्त टॉक्झिन्स शरीरातून बाहेर फेकले जातात. त्यामुळेच शरीरामध्ये मेटाबॉलिजम वाढतं. 


आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे 'आरोग्यदायी पदार्थ'


10. प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ (Increase In Immunity)

कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. उपवासाचा हा एक फायदा होतो तो म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. उपवास केल्याने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर फेकली जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही योग्य स्वरूपात उपवास करायला हवा. उपवास करायचा म्हणजे दिवसभर केवळ पाण्यावर राहायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा असा अर्थ होत नाही. नियमित काही तासांनी फळं खाऊन अथवा पाणी पिऊन त्याप्रमाणे उपवास केल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 


11. पिंपल्सपासून मिळते सुटका (Reduces Pimples)

पिंपल्सपासून मिळते सुटका


उपवासाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच आहे. त्याता सर्वात जास्त परिणाम हा चेहऱ्यावर पिंपल्स येण्यात होत असतो. पण तुम्ही नियमितपणे उपवास केलात आणि खाण्यापिण्याचं योग्य प्रमाण पाळून तिखट आणि तेलकट पदार्थ कमी केलेत तर तुम्हाला नक्कीच पिंपल्सपासून सुटका मिळते. उपवासाने हा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक येण्यासाठीही उपवास फायदेशीर ठरतो. 


12. हृदयासाठी अप्रितम (Good For The Heart)

हृदयासाठी अप्रितम


सतत खात राहण्याने कॉलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याचा थेट परिणाम होतो तो हृदयावर. पण तुम्हाला हृदयरोगांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही योग्यरित्या उपवास करायला हवा. तुमच्या हृदयावर कोणताही दाब न येता अनेक समस्यांपासून  तुम्ही दूर राहू शकता. उपवासामध्ये तुम्ही केवळ जलपदार्थ अथवा केवळ शरीराला आवश्यक आहेत तेच पदार्थ खाता. त्यामुळे हृदयात कॉलेस्ट्रॉलचा धोकाही टळतो. तसंच हृदयासाठी उपवास करणं चांगलं ठरू शकतकं.  


उपवासाच्या वेळी काय खायला हवं? (What To Eat During Fasting)

उपवासाच्या वेळी काय खायला 


तुम्ही कोणत्या प्रकारचा उपवास करत आहात त्यानुसार तुम्ही काय खायला हवं ते अवलंबून आहे. आम्ही तुम्हाला इथे काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत सांगणार आहोत ज्याचं सेवन उपवासादरम्यान तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे उपवासादरम्यान तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तुम्ही पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर तुम्ही आंशिक उपवासापासून सुरूवात करा. यामध्ये तुम्हाला काही वेळेसाठी काही अन्नपदार्थांपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. या वेळेत तुम्ही फळ, फळांचा रस अथवा हल्केफुल्के पदार्थ खा. ज्याप्रमाणे - 


उपवासादरम्यान तळलेले पदार्थ सेवन करू नका

रसदार फळांचं सेवन करा

तुम्ही नेहमी ड्रायफ्रूट्सचं सेवन करा

दूध प्या

फळांचा रस तुम्ही प्या

तुम्ही मीठ खाणार नसलात तर तुम्ही हिरव्या भाज्या मीठाशिवाय उकडवून खा

तुम्ही निर्जला उपवास करत असाल तर तुम्ही दूध पिऊ शकता. तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही कॉफी अथवा चहा पिऊ शकता. मात्र असं करत असल्यास, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला जर अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी पिऊ नका


नोट - तुम्हाला वर जे पदार्थ सांगण्यात आले आहेत ते उपवास करणाऱ्या व्यक्तीनुसार बदलू शकता. हे  तुम्हाला पर्यायी पदार्थ म्हणून आम्ही सांगितले आहेत. 


उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य


उपवासादरम्यान तुम्ही काय टाळायला हवं (What To Avoid During Fasting)

तुम्ही उपवास हा तुमच्या आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी करणार असता. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला उपवासाच्या दरम्यान टाळायला हव्यात. 


उपवासापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची आणि शरीराची योग्य तयारी करा. वजन कमी करण्यासाठी उपवास करणं आणि धार्मिक उपवास करण्यामध्ये खूपच अंतर असतं. दोन्हीसाठी तुम्हाला तुमचं मन आणि शरीर तयार करावं लागतं. तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीसाठी उपवास करणार आहात हे तुमच्या मनात निश्चित करून घ्या. उपवास करताना तुमच्या रोजच्या कामातही काही फरक पडू शकतो याकडे नीट लक्ष द्या. 

तुम्ही पहिल्यांदाच उपवास करत असाल तर तुम्ही वेळ कमी ठेवा. जास्त वेळेसाठी तुम्ही लगेच उपवास करू नका

उपवास करण्यापूर्वी तुम्ही योग्य आणि पौष्टिक जेवण करा. जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दरम्यान कोणताही त्रास होणार नाही. लक्षात ठेवा की, एकाच वेळी जास्त खाऊ नका. या जेवणात तुम्ही उपवासाचे थालीपीठदेखील खाऊ शकता.

उपवासाच्या दरम्यान जास्त कठीण व्यायाम अथवा जास्त वेळ व्यायाम करू नका कारण या दरम्यान तुमच्या शरीराला अधिक एनर्जीची गरज असते आणि व्यायाम केल्यास, अधिक ऊर्जा जाते. त्यामुळे तुम्हाला अधिक थकवा येण्याची शक्यता निर्माण होते. 

तुम्हाला जर आरोग्यासंबंधी काही समस्या असतील अथवा कोणत्याही प्रकारचं औषध तुम्ही घेत असलात तर उपवास करणं टाळा

उपवासादरम्यान पोष्टीक गोष्टींचं सेवन जास्त करा - उदाहरणार्थ - फळ, फळांचा रस, दूध इत्यादी

उपवासानंतर खूप भूक लागणं साहजिक आहे. पण अशावेळी उपवास सोडताना अति आहार घेणं शक्यतो टाळा. संतुलित प्रमाणात तुम्ही आहार घ्या

उपवास केल्याने काय होतं नुकसान (Side Effects Of Fasting)

तुम्हाला उपवासाने होणारे फायदे तर कळलेच आहेत. पण उपवासाचे काही तोटेही आहेत. आपण त्याबद्दलही जाणून घेऊया - 


तुम्ही उपवासादरम्यान योग्य पौष्टिक तत्वयुक्त खाद्यपदार्थांचं सेवन न केल्यास, तुम्हाला डिहायड्रेशन,  चक्कर आणि थकव्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात

तुम्हाला जास्त कालावधीसाठी उपवास करायचा असल्यास, तुम्हाला एनिमिया होण्याची शक्यता असते

उपवासानंतर तुम्ही जर लगेच खाल्लं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या निर्माण होऊन त्रास होतो

काही लोकांना उपाशी राहिल्यास भूक सहन होत नाही आणि चिडचिडेपणा वाढतो अथवा रागाचं प्रमाण वाढतं

जास्त काळ उपाशी राहिल्यास डोकेदुखी अथवा अन्य काही आजार होण्याची शक्यता असते

उपवासाचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. तोट्यांपेक्षा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त फायदा होतो. पण तुम्ही जास्त काळासाठी उपवास करू नये हा सल्लादेखील आम्ही तुम्हाला नक्कीच देत आहोत. कारण याचा तुमच्या शरीरावर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो. उपवासाचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पाणी,  ज्युस आणि फळांचं सेवन कराल.


धर्मपिठ विदर्भ धर्मगुरू ह.भ.प.प्रभाकरराव दिवनाले यांचे कडून शुभेच्छा.

.

🚩🕉️ हार्दिक अभिनंदन🌹

                मा. विनायकरावजी काळदाते साहेब यांची नुकतीच धनगर धर्मपीठाचे कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

                मा. काळदाते साहेबांचा तसा बऱ्याच दिवसांपासून धर्मपीठाशी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संबंध आला . परंतु 10 आक्टो.2020 ला त्यांची धनगर धर्मपीठाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची काम करण्याची हातोटी, संघटनात्मक कौशल्य  व समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित वर्गाला धर्मपीठा कडे आकर्षण करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना राज्य संघटक म्हणून पदभार सांभाळण्यास सांगण्यात आले त्यानुसार त्यांनी आपली यशस्वी कारकीर्द पार पाडली .

               अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या काळदाते साहेबांच्या कामाची धर्मपिठाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अभिमन्यु टकले साहेब , केंद्रीय अध्यक्ष बापूसाहेब हटकर  यांनी कामाची दखल घेत त्यांना नुकतेच कार्याध्यक्ष पद बहाल केले .

             काळदाते साहेब मूळचे सिंदखेड मोरेश्वर जि.अकोला, (विदर्भ)येथील रहिवाशी असून अकोलेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे . त्यांच्या शब्दाला मान म्हणून त्यांचे शिफारसी वरून सौ. शारदाताई ढोमणे यांची धनगर धर्मपीठाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.


               महिला आघाडीचे राज्याचे अध्यक्ष पद व धर्मपीठाचे कार्याध्यक्ष पद विदर्भाला लाभले ही बाब विदर्भासाठी भुषणावह आहेच सोबत अभिमानास्पद सुद्धा आहे.

              त्यांच्या मार्गदर्शनाखाली , संघटनात्मक कार्य आणखी पुढे जाईल याची आम्हास खात्री आहे .

               कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन . त्यांच्यावर धर्मपीठाने टाकलेली जबाबदारी निश्चितच पार पाडतील .


प्रभाकर दिवनाले

       धर्मगुरु

विदर्भ प्रदेश


🕉️🔯🕉️🔯🕉️🔯🕉️🔯


🙏🙏 धन्यवाद🙏🙏


धर्मपिठ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.कचरे महाराज यांचेकडून नवनियुक्त कार्यध्यक्ष यांना शुभेच्छा.


आदरणीय श्री विनायकराव काळदाते सर आपली कार्य अध्यक्ष धर्मपीठ महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती झाली आहे करीताआपल मी आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो 🌹👏🏼

जयगुरु 

जय 

ल्हा

🙏🏽🚩⛳👏🏼

आपला नम्र 

रमेश कचरे फुबगांव 

धनगर धर्म पीठ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष 

 धन्यवाद सर

🌹👏🏼🌾🚩🌹👏🏼✒️

केंद्रिय अध्यक्ष मा.बापूसाहेब हटकर यांचे कडून नवनियुक्त कार्यध्यक्ष यांना शुभेच्छा.

🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️

              *अभिनंदन विनायकराव काळदाते!*

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

          मा विनायकराव काळदाते साहेब यांची धनगर धर्म पिठाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यांचं हार्दिक अभिनंदन!

🥁🎺🎁💐🤝🏻

             धनगर धर्म पिठाचे संस्थापक अध्यक्ष मा डॉ अभिमन्यू टकले. यांनी ईतर पदाधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करून मा काळदाते साहेब यांची नेमणूक केली ती सर्वांगाने योग्य आहे. 

          मा काळदाते हे उच्च विद्याविभूषित आहेत. ते एका राष्ट्रीयीकृत बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. स्वभाव अत्यंत मन मिळवू आणि नम्र आहे. त्यांची विदर्भ विभाग प्रमुख पदी नेमणूक करताच त्यांनी कामाचा जो धडाका लावला आणि उत्तम, लायक आणि गुणवान पदाधिकाऱ्याच्या ज्या नेमणुका केल्या त्याला तोड नाही. या सर्व बाबींचा विचार करून विनायकराव यांची महाराष्ट्र  प्रदेश कार्याध्यक्षपदी जी निवड करण्यात आली ती अतिशय योग्य निवड आहे. म्हणून काळदाते साहेब यांचं पुनश्च एकदा अभिनंदन!

           दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नेमणूकी मुळें विदर्भ विभागाला काळदाते यांच्या रूपाने राज्य पातळीवर एक सशक्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले  हे स्वतः प महाराष्ट्रातील आहेत. मी बापू हटकर केंद्रीय अध्यक्ष खान्देशातून आहे. त्यामुळे या तीनही विभागांना भरभक्कम प्रतिनिधित्व मिळाले आहे. आता मराठवाडा आणि कोकण येथून दोन चांगले प्रतिनिधी प्रदेश कमिटीवर घेऊन संपूर्ण राज्य व्यापी समान प्रतिनिधित्व देण्यात येईल. त्यातून धर्म पिठाची योग्य वाटचाल सुरू होईल. लवकरच धर्म पिठाची राज्य व्यापी ऑन लाईन बैठक घेऊन त्यात धर्मपीठाच्या कार्या बद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल. 

अभिनंद श्री विनायकराव. जोरात, जोमात काम सुरू करा. सर्व महाराष्ट्र तुमच्या ताब्यात दिला आहे. आदिमाया महाकाली मायाक्का, गंगापुत्र बिरुबा आणि संत बाळूमामा यांचे आशीर्वाद आपल्या सर्वा सोबत आहेत. आगे बढो महात्मा. 

*चांगभल*

                         बापू हटकर

              केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्म पीठ

🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️


धर्मपिठ कार्यध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल धन्यवाद-विनायक काळदाते.

🍁उपाधीचा भार, आहे कठीण अपार-परी सन्मानाने तुमच्या ऋणी झालो फार 🍁

          विनायक काळदाते.


धर्मपिठाच्या कार्यध्यक्ष पदी माझी निवड करून पिठाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व संत महंतानी माझ्या क्षमतेवर जो विश्वास टाकला त्याबद्दल मि केंद्रीय अध्यक्ष मा.बापूसाहेब हटकर, संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले साहेब व धर्मपिठाच्या महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकारी व संतमंडळीचा आभारी आहे,ऋणी आहे.

  अवगुण माझे,जरी होते ठावे l

कसोटीत तुमच्या, मि चपलख उतरावे ll ,समाज शिक्षण, प्रबोधन व संघटनातून सर्वांगीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपिठाचे काम पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या हातात दिलेली ही पताका मि खाली ठेवणार नाही व तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडे जाऊं देणार नाही अशी मि ग्वाही देतो.

   योग:कर्मसु कौशलम् याचा एक अर्थ आपले काम कुशलतेने करणे असा सुद्धा निघतो त्याप्रमाणे धर्मपिठाचे प्रशासकीय कामकाज योग्य पद्धतीने पुढे नेवून हा योग साधन्याच्या माझा नक्की प्रयत्न असेल.येथे कौशल्य म्हणजे निष्काम कर्म असा अर्थ मला अभिप्रेत आहे.निष्काम कर्म करण्यासाठी आवश्यक असते ती समत्वबुद्धी अर्थात कोणत्याही परिस्थितीत विचलीत न होणारी बुद्धी, आपण धर्म पिठाचे सदस्य ति आत्मसात करण्याचा प्रयत्न करु.'मि'पणाची बाधा जोवर होत नाही तो पर्यंत माणसं जुळत राहतात व चळवळ पुढे चालत राहते हे सत्य आहे,त्यामुळे "अंहकाराचा वारा न लागो राजसा l माझिया विष्णु दासा भाविकांसी l या संत वचना प्रमाणे आपण कार्यरत राहू व धर्मपिठाची पताका फडकवत ठेवू असा मला आत्मविश्वास वाटतो.

  संतकाळात जसा दांभिकाचा जोर होता तसाच सुळसुळाट अविचाराचा आज रोजी समाजात झाला आहे.समाजमन विचलित झाले असून काय स्विकारावे व काय सोडावे या प्रश्नामध्ये समाज गुरफटून गेला आहे.

  धर्मपिठावर समाज शिक्षण, प्रबोधन,संघटन करून पुन्हा  समाजाला आर्थिक, लौकिक, पारमार्थिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या सशक्त करण्याची जबाबदारी आहे.

विस्कळीत झालेला समाजाला आज वरील मुद्यांवर काम करणाऱ्या अराजकीय संघटनेची गरज आहे व ते काम धर्मपिठ नक्की करु शकते असा मला विश्वास आहे.

    धर्मपिठ ही पंढरीची वारी आहे,या मुख्य दिंडीत भविष्यात अनेक लहान लहान दिंड्या सामिल होतील ,मार्गक्रमण करतील , त्यांना सामावून घेण्याची माणसिकता आपल्याला आत्मसात करावी लागेल.धर्मपिठाची पताका राज्यात, परराज्यातच नव्हे तर विदेशात सुद्धा पसरावी लागेल व तसे व्हिजन व मिशन राबवावे लागेल.संस्थापकाचा मानस असलेली धर्मपरिषदेची तयारी सुरू करावी लागेल, त्याकरिता विभागवार संतमेळावा व धर्मसभेंचे नियोजन करावे लागेल.

  मैअकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया "या उक्तीप्रमाणे चार दोन समाजधुरीनांनी उभे केलेल्या धर्मपिठाला आज शेकडोंनी प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक ,शिक्षिका, वकील, अधिकारी, शेतकरी,कामकरी,माता भगिनी जोडल्या जात आहेत.या सर्वांना अपेक्षित असलेला सर्वांगीण विकासाची धैय्य धोरणे,उद्दिष्टे राबवण्याचा प्रयत्न माझ्या कडून नक्कीच होईल. 

 आपण सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन,पाठिंबा आहेच तो यापुढे सुद्धा मिळत राहील व धर्मपिठाचे अलौकिक कार्य पुढे जात राहील असा मला विश्वास आहे.

 पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार.🙏


✍️विनायक काळदाते

कार्यध्यक्ष,धनगर धर्मपिठ

महाराष्ट्र राज्य.


Thursday, January 21, 2021

विदर्भातील धनगर समाजात होऊन गेलेले संत झिंग्राजी महाराज यांची पुण्यतिथी.

🕉️🚩🔯🚩🕉️🚩🕉️आज दि.22जानेवारी, विदर्भात होउन गेलेले संत झिग्राजी महाराज यांची आज पुण्यतिथी🕉️🚩🕉️🚩🔯🚩🕉️🚩


 महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात मोठी संत परपरा आहे.विदर्भात संत गजानन महाराज,झिंग्राजी महाराज,नरसिंग महाराज,तुकडोजी महाराज, गाडगेबाबा,मुंगसाजी महाराज गुलाबबाबा,पुंडलीक महाराज व ईतर ज्ञात अज्ञात संतमडळी होउन गेली.यापैकी काही संतमडळी व त्यांचे देवस्थानांना कमी अधिक प्रमाणात प्रसिध्दी मिळाली.परंतु ही सर्व संत मंडळी प्रचितीच्या क्षेत्रात एकसमान होत्या. संतमडळींना कुठलीही जात नसते ,कुळ नसते.त्यांच्या अलौकिक कार्याने ते सर्वच समाजात वंदनीय ठरले.

  असेच एक संत झिंग्राजी महाराज विदर्भातील अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हा (देवी) या गावात होउन गेले.धनगर कुटुंबात जन्माला आलेले झिंग्राजी महाराज आपल्या दैवी शक्ती व लिला यांच्या जोरावर त्याकाळात भक्तांच्या गळ्यातील ताईत होउन गेले.

  झिंग्राजी महाराज हे गजानन महाराजांच्या समकालीन संत.गजानन महाराजांच्या पोथी म्हणजे विजय ग्रंथात हा ग्रंथ लिहिणाऱ्या दासगणू महाराजांनी झिंग्राजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे.गजानन महाराज, झिंग्राजी महाराज, अकोटचे नरसिंग महाराज हे एकमेकांच्या संपर्कात असत व आपले जनकल्याणाचे कार्य ते आपल्या भक्त वर्गात करत असत.

  झिंग्राजी महाराज हे विदेही होते ,अपवादात्मक परिस्थितीत मृत व्यक्तीला जिवंत करणे,कोरड्या विहीरीला पाणी आणणे, महापूरातून बाहेर येणे असे अनेक चमत्कार त्यांच्या नांवावर आहेत.निस्वार्थी भावनेने आपल्या भक्तांना बोध देण्यासाठीच या समकालीन संतानी चमत्कार केले.झिंग्राजी महाराज सुद्धा अवलियाच होते,त्यांना अंगावरील कपड्यांचे किंवा भौतिक सुखाची भ्रांत नव्हती, गोडधोड, शिळे-ताजे,गरीब-श्रीमंत हा फरक त्यांच्या लेखी नव्हता.

 मुऱ्हा या गावी एकविरा देवीचे प्राचीन मंदिर असून झिंग्राजी महाराजांचे जन्मस्थळ व कार्यस्थळ सुद्धा आहे.या मुऱ्हा गावात देविचे जागृत देवस्थान असल्यामुळे गावाचे नांवच मुऱ्हादेवी असे झाले आहे.या मुऱ्हा येथील एकविरादेवी मंदिराच्या ईशान्य बाजूला भुयारात झिंग्राजी महाराजांचे समाधी स्थान आहे.

  झिंग्राजी महाराजांच्या सानिध्यातच त्यांचे शिष्य नारायण महाराज तयार झाले.या नारायण महाराजांनी अकोला जिल्ह्यातील शिरसोली या गावी झिंग्राजी महाराजांचे मंदिर उभारले.  या नारायण महाराजांचे शिष्य म्हणजे धर्मपिठाचे अकोला जिल्हा धर्मगुरु ह.भ.प.कोल्हे महाराज. वैकुंठवासी संत वासुदेव महाराजांनी झिंग्राजी महाराज यांचा ग्रंथ लिहिला आहे.धर्मपिठाचे कोल्हे महाराज शिरसोली येथील झिग्राजी महाराज सस्थानवर प्रतिनिधी म्हणून सुद्धा  आहेत,त्यांनी आपले गुरु व झिंग्राजी महाराज यांचे शिष्य नारायण महाराज यांची आरती सुद्धा रचली आहे.गावातील ह.भ.प.खोटरे दादा हे शिरसोली येथील झिग्राजी महाराज मंदिराची पुजाअर्चा करतात.

  मागील विस वर्षांपासून दरवर्षी पौष शु.नवमीला शिरसोली जिल्हा अकोला येथे झिंग्राजी महाराजांची पुण्यतिथी साजरी होते ,यावर्षी ति 22जानेवारी2021 रोजी आहे.शिरसोली येथील वाघ कुटुंब परंपरागत पद्धतीने पुण्यतिथीला अन्नदान करत असतात.

  आज विदर्भ संत झिंग्राजी महाराज यांची पुण्यतिथी आहे,आपण सर्व त्यांच्या स्मृतीला वंदन करु व त्यांना भावपुष्प अर्पण करु.


✍️विनायक काळदाते

    कार्यध्यक्ष,धर्मपिठ म.रा.

  माहिती-ह.भ.प.कोल्हे 

              महाराज, धर्मगुरु,

              धर्मपिठ, म.रा.



 🕉️श्री विनायकजी काळदाते कार्य अध्यक्ष धर्मपिठ महाराष्ट्र राज्य पदी निवड 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯श्री विनायक जी काळदाते एक तडफदार एम.एससी ॲग्री बॅन्क अधिकारी पण तेवढाच विनयशील माणूस. एक बंधु पिड्याट्रीक डाॅक्टर, एक बंधू उच्च अधिकारी आदिवासी विभाग,वहिनी डॉक्टर, पुतण्या डॉक्टर, मुलगा डॉक्टर, व्याही माजीआमदार. अशाही परिस्थितीत विद्या विनयेन शोभते या प्रमाणे जमिनीवर पाय असलेला माणूस म्हणजे  विनायक जी काळदाते .

आपले कर्तृत्व,उर्जा,पारदर्शक भुमिका व संपर्क यंत्रणेच्या सहाय्याने धनगर धर्म पिठाला लोकाभिमुख करण्यास हातभार लावून  समाजाची ही अराजकीय चळवळ "धर्म पिठ"घरा घरात पोहचवण्यासाठी मिशनरी प्रमाणे काम करणारे श्री.विनायक काळदाते, नाशिक यांची धर्मपिठाचे कार्यध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सदर नेमणूक धर्मपिठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी केंद्रीय अध्यक्ष श्री.बापूसाहेब हटकर व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. श्री.विष्णूपंत गावडे यांच्या सोबत परामर्श घेऊन करण्यात आली.


🌹परिचय-श्री.विनायक काळदाते हे एम.एससी (कृषी) एम.बि.ए.असून  बँक मँनेजर आहेत.राष्ट्रीयकृत  बँकेच्या  नोकरीत असताना त्यांनी  गुजरात, महाराष्ट्र, गोवा प्रदेशात सेवा करून त्या त्या परिसरातील समाजबांधवांना बँकेच्या व सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. समाजातील गरजवंताना व पात्र व्यक्तींना शेतीकर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज  मिळवून दिले,पात्र लोकांना कर्जमाफी मिळावी म्हणून मदत केली.समातील गोरगरीब मुलींच्या लग्नाला मदत केली.वधुवर परिचय मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवून मुला मुलींच्या पालकांना ते मदत करतात.शाखाभेद नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.  धर्म पिठाच्या माध्यमातून झालेल्या परिचयातून,संघटनातून सुद्धा दोन तिन विवाह त्यांच्या कडून निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत.आपल्या ईतर राज्यातील  नेमणूकी दरम्यान त्यांनी दक्षिण गुजरात मधील भरवाड बांधव व गोव्यातील गवळी धनगर बांधवांना मदत केली,संघटन केले.मेंढपाळावरील हल्ले, महिलांवरील अत्याचार, वसतिगृह, शिष्यवृत्ती,वनविभाग  अडचणी,समाजाच्या श्रद्धा स्थानांवरील अतिक्रमण, आरक्षण अशा विविध विषयांवर ते सरकार व लोकप्रतिनिधींकडे नेहमी पाठपुरावा करत असतात, पत्र,मेल,निवेदने देत असतात.

   समाजातील सुशिक्षितांना नोकरीसंधी,उद्योग व्यवसाय मार्गदर्शन  तसेच शेतकरी बांधवांना आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे,निर्यात करणे कामी प्रेरणा देत असतात. समाजाने वैयक्तिक व सामुहिक पातळीवर शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारावे यासाठी ते प्रबोधन करत असतात.त्यांच्या या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना 2003 साली "शेतीमित्र" पुरस्कार प्रदान केला,बँकने उत्कृष्ट कार्य निष्पादनासाठी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान केला.

  श्री.काळदाते हे उत्कृष्ट कवी व लेखक आहेत व समाजाचा जागल्या म्हणून सोशलमेडीयावर लेखन करत असतात. 

   श्री.काळदाते यांचे कुटुंब वैद्यकीय व्यवसायाशी निगडित आहे ते समाजातील गरजवंताना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करत असतात. मागील वर्षी सोशलमेडीयावर अपिल करून त्यांनी कँन्सर ग्रस्त समाजबांधवांला लक्षणीय आर्थिक मदत मिळवून दिली.

  आपली ओळख व अस्तित्व मुळात समाजामुळे असते असे त्यांचे मत आहे.  उर्वरित आयुष्य त्यांनी समाजकार्यासाठी खर्च करण्याचे ठरवले असून प्रत्येकाने दिवसातील कमित कमी एक तास समाजासाठी दयावा असा त्यांचा सल्ला आहे.

 समाज संघटन, प्रबोधन व सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीवर अराजकीय चळवळ उभी करण्याची धर्मपिठाची भुमिका पुढे घेऊन जाण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याचा त्यांचा माणस आहे.

  श्री.काळदाते हे उर्जावान, चारित्र्यवान आहेत,बेदाग आहेत,निगर्वी आहेत त्यांची धर्मपिठाचे कार्यध्यक्ष पदी  नेमणूकीमुळे अध्यक्षीय टिमला आपले व्हीजन व मिशन पुढे घेऊन जाण्यात मोठी मदत होईल असा ठाम विश्वास आहे.आपण सर्वजन त्यांच्यावर सोपविलेल्या या नविन जबाबदारीचे स्वागत करु,त्यांना मदत करु व धर्म पिठाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करु.त्यांच्या या निवडी मुळे महाराष्ट्र राज्यात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री.काळदाते यांचे  या नवीन नेमणुकी बद्दल अभिनंदन व उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा.🌹

🌹डॉ. अभिमन्यू टकले

सस्थापक अध्यक्ष, आदिवासी धनगर साहित्य संमेलन व धनगर धर्मपिठ-महाराष्ट्र राज्य. 

🌹श्री बापूसाहेब हटकर

केंद्रीय अध्यक्ष, धनगर धर्मपिठ.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

Wednesday, January 20, 2021

धर्मपिठ महिला आघाडीचा सर्वत्र बोलबाला.


🕉️धर्म पिठ महिला आघाडीचा चांदा ते बांदा जोर🕉️

   सध्या महिला सक्षमीकरणावर सर्वच ठिकाणी भर दिल्या जात आहे,महिलांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण व नेतृत्व देण्याच्या चर्चा होत आहेत. परंतु महिलांना पुढे करून पडद्या मागून पुरुष मंडळी ढवळाढवळ करत असल्याचे बऱ्याच ठिकाणी पहायला मिळते.

   या उलट परिस्थिती धर्म पिठा मध्ये झाली आहे.सौ.शारदाताई ढोमने यांनी महिला राज्य अध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारल्यानतर नागपूर ते कोल्हापूर महिलांची फळी दिवसेंदिवस अधिक सक्रीय होत असताना दिसत आहे."अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया" या म्हणी प्रमाणे राज्यातील महिला डाँक्टर, प्राध्यापक, ईजिनिअर,शिक्षिका, पत्रकार, समाजसेविका,गृहिणी धर्म पिठासोबत जुळत आहेत.यामध्ये अनेक महि पि.एच.डी.धारक आहेत, अनेक डॉक्टर आहेत. ह्या सर्व महिला समाज शिक्षण, प्रबोधन व समाजविकासाच्या आंतरीक तळमळतेने धर्म पिठा सोबत काम करत आहेत.

  आजही सक्षम,प्रतिभावंत अशा महिला पदाधिकाऱ्यांनी धर्म पिठाचा झेंडा खाद्यावर घेऊन खालील जबाबदारी स्विकारली आहे

🌹सौ.कविताताई वाढे-अमरावती जिल्हा उपाध्यक्ष. सौ.वाढे ताई पि.एच.डी असून जेष्ठ समाजसेविका आहेत.


🌹सौ.सुनंदाताई गंधे-अमरावती तालुका प्रसिद्धी प्रमुख-सौ.सुनंदाताई ह्या शिक्षिका असून समाजसेवेत सक्रीय आहेत.त्यांचे एक चिरंजीव परदेशात आहेत.


🌹रेखाताई अवघड,अमरावती-प्रसिद्धी प्रमुख-रेखाताई अवघड ह्या रेल्वे तिकीट निरीक्षक असून त्यांना समाजकार्याची आवड आहे.


🌹सौ.प्रियाताई सरोदे-अमरावती उपाध्यक्ष-सौ.सरोदेताई ह्या समाजकार्यात सक्रीय असून त्यांचे कुटुंब समाजाच्या प्रत्येक चळवळीत सहभागी असते.

🌹सौ.सिमाताई धुमाळ-परभणी शहर अध्यक्ष-सौ.सिमाताई जेष्ठ समाजसेविका असून उत्कृष्ट संघटक आहेत.त्यांना समाजकार्याची आवड असून, समाजाच्या प्रत्येक चळवळीत त्या सहभागी असतात.

🌹सौ.सुविधाताई मुंदाने-अमरावती-जिल्हा समन्वयक-सौ.सविताताई सक्रिय समाजसेवक आहेत.उत्कृष्ट संघटक आहेत.

🌹सौ.जयाताई अवघड-संपर्क प्रमुख-अमरावती. उत्कृष्ट सघटक,समाजसेवक.

🌹सौ.प्रभाताई गोहत्रे-अमरावती जिल्हा धर्म प्रचारक-जेष्ठ समाजसेविका, उत्कृष्ट संघटक.

🌹सौ.दिपिकाताई ढवळे-अमरावती-शहर संघटक.सौ.दिपिकाताई यांना समाजसेवेची आवड असून समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात, चळवळीत त्या सक्रीय सहभाग नोंदवत असतात.

धर्मपिठाने साजरी केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती.

🕉️📚धर्म पिठाने साजरी केली सावित्रीबाई फुले जयंती🕉️📚


   पहिल्या महिला शिक्षिका व ज्यांच्यामुळे भारतातील स्त्रीयांना शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती धर्म पिठाच्या विविध शाखांनी उत्साहात साजरी केली.

  अमरावती येथे धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी अत्यंत उत्साहात प्रतिमा पुजन केले.

  पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ.सविताताई दुधभाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.सावित्रीबाई फुले यांचे कर्तुत्व व त्यांच्या मुळे आजच्या महिलांना मिळालेल्या संधी या विषयावर सौ.दुधभाते ताई यांनी आपले विचार मांडले.

  यवतमाळ येथे महिला जिल्हा अध्यक्ष सौ.थोटे ताई यांनी प्रतिमा पुजन केले तर नाशिक येथे महिला जिल्हा अध्यक्ष सौ.मिनाताई बिडगर यांनी ओझर ग्रामस्थांसोबत जयंतीचा कार्यक्रम साजरा केला.

   धर्म पिठ विदर्भ प्रसिद्धी प्रमुख प्रा.एल.डी.सरोदे(पत्रकार) यांनी मुर्तिजापूर येथील जयंतीच्या मुख्य समारंभात प्रमुख पाहुणे पद भुषवले व सावित्रीबाई फुले व आजची बहुजनांची अवस्था यावर आपले विचार मांडले.

  धर्म पिठ विदर्भ संघटक श्री.गोपाळभाऊ गावंडे,अमरावती जिल्हा अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने,तेल्हारा तालुका अध्यक्ष किशोर कोल्हे सर, अकोला शहर संघटक अनिल पातुर्डे सर,बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष लक्ष्मण पातोंड यांनी प्रतिमा पुजन करून सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले.

  धर्म पिठाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विविध सार्वजनिक जयंती समारंभात भाग घेत सावित्रीबाईंना अभिवादन केले.

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹


Sunday, January 17, 2021

अमरावती जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वरजी ढोमने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतांना.


 

पुणे कार्यकारिणी घोषित.

धनगर धर्म पीठ पुणे कार्य कारिणी जाहीर 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
पुणे बुधवार दिनांक २५।११।२०२०.
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य या संस्थेची बैठक डाॅ. विष्णुपंत गावडे.राज्य अध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्ष ते खाली झाली आहे.या वेळी डॉ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य सोलापूर येथे उपस्थित होते. राज्य भरातील सज्जन, धार्मिक,उच्च शिक्षित लोकांचा सहभाग घेऊन धर्म शिक्षण, प्रबोधन, संशोधन, प्रसारण करण्याचे ठरले आहे.त्या अनुषंगाने राज्य भरातील सज्जन व धार्मिक लोक स्वयंस्फूर्त पणे मनाने,आत्मियतेने जोडले जात आहेत. डाॅ.गावडे यांनी खालील प्रमाणे निवडी जाहीर केल्या.
डाॅ. सत्यवान गडदे जिल्हाध्यक्ष पुणे असतील. ते रूग्ण सेवे बरोबरच समाज, साहित्य, धर्म या साठी साठी प्रमाणीक पणे कार्य करत असतात. तसेच ते आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करत आहेत.
🔯डाॅ अनिता खटके या महिला विभाच्या पुणे जिल्ह्य़ा अध्यक्ष असतील. त्यां खूप मोठे शैक्षणिक कार्य करीत आहेत.डॉ अनिता खटके
डायरेक्टर जे एस पी म. जयवंराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजेंट अँड रिसर्च, हडपसर
शिक्षण =पी एचडी, MBA,Bsc केमिस्ट्री.कामाचा अनुभव. 25 वर्ष
विविध सामाजिक कार्यात पुरस्कार, best leader award
आवड
बिझनेस, सामाजिक कार्य, बागकाम
बोर्ड मेंबर
*पुणे मॅनेजमेट असोसिएशन
*पुणे डायरेक्टर असोसिएशन
*ऑल इंडिया मॅनेजमेट असोसिएशन
*ऍडीटोर इन् चीफ ऑफ *कॉर्पोरेट मंत्रा इंटरनॅशनल जर्नल
*Editorilal बोर्ड मेंबर ऑफ इंटनॅशनल जर्नल्स
Advisory member of Maharashtra
Entrepreneurship development cell ( MCED)
सोशल मेंबर्
तेजस्विनी फाऊंडेशन
मल्हार फाऊंडेशन
ग्रीन थूंब फाऊंडेशन
EAI फाऊंडेशन
सोलापूर सोशल फाऊंडेशन
ISCON member
जिजाऊ फाउंडेशन etc
25 इंटरनॅशनल रिसर्च पेपर प्रसिध्द
5 पुस्तके प्रसिद्ध ( सौऊर्जेवर पुस्तकाचं काम. चालू आहे
कार्य आवड
धनगर एकत्रीकरण
धनगर विद्यार्थी carrier guidance
धनगर व्यवसायइक एकत्रीकरण व जागृती
स्री सन्मान
आत्म निर्भर भारत
हिरवा गार भारत
उन्नत शेतकरी
सोलार एनर्जी ऊर्जा जागृती
इंडियन मॅनेजमेट गुरु जागृती.
, Director JSPM’S Jayawantrao Sawant Institute of Management and Research Hadapsar Pune.
🔯तसेच ईजींनीयर सारिका बुरले या पुणे शहर अध्यक्ष असतील. त्या ही उच्चशिक्षित आहेत. मास्टर ऑफ सिव्हिल ईजींनीयरींग आहेत. अमेरिकेत नोकरी करून स्वदेशात परतले आहेत. पुणे येथे नामांकित ईजींनीयरींग काॅलेज मध्ये प्राध्यापक आहेत.
🔯सौ.रेषमा गोपाळ जोगे ठोंबरे याही उच्चशिक्षित महिला असून एमए मराठी आहेत. पत्रकारीता झाली आहे.प्रा.गोपाळ जोगे फर्ग्युसन कॉलेज पुणे यांच्या पत्नी आहेत.त्या अनेक, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असतात. त्यांच्यावर पुणे विगाची प्रसिद्धी प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
धनगर धर्मपीठ हा वेगळा धर्म नसून
जमातीने स्थापन केलेले व्यासपीठ आहे. या मार्फत धर्म कार्य करीत असलेले मान्यवरांचे व धर्म मान्यवरां मार्फत, प्रबोधन, शिक्षण, संशोधन, प्रसारण, एकीकरण केले जात आहे.
निवड झालेल्या मान्यवरांचे तमाम महाराष्ट्र राज्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
प्रसिद्ध प्रमुख:
रेशमा जोगे ठोंबरे पुणे.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Breaking News

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join our WhatsApp Group

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...