💐स्व.लता मंगेशकर यांना धर्मपीठ सत्संगाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.💐
भारतरत्न, गानकोकीळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी धर्मपीठाच्या विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ.सुलोचनाताई मेहत्रे यांनी सुरुवातीला "इतनी शक्ती हमे देना दाता-मनका विश्वास कम ना हो'हे गीत गायले.
ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे,ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी अध्यात्मिक उदाहरणे देत स्व.लतादिदींना श्रद्धांजली वाहली.लतादिदींचा स्वर हा ईस्वर होता,त्यांनी केलेले गायन ही स्वरांची उपासना होती,आराधना होती,ईश्वराची प्रार्थनाच होती असे सांगितले.
प्रा.डॉ. अभिमन्यू टकले यांनी लतादिदींच्या आयुष्याचा जिवनपट सांगितला.
ह.भ.प.कचरे महाराज यांनी लतादिदी व राष्ट्रसंतांच्या भेटीची गोष्ट सांगितली.ह.भ.प घोंगे महाराज, घोडस्कर महाराज, ह.भ.प.प्रभाकर दिवनाले महाराज यांनी आपल्या श्रद्धांजली पर भाषणात लतादिदी ह्या दैवीशक्ती प्राप्त असलेल्या गायिका होत्या व त्यांनी स्वरांच्या माध्यमातून केलेली सेवा ही देशसेवा,जनसेवा व ईश्वर सेवाच होती असे प्रतिपादन केले.
मा.आर.पि.कुवर साहेब,ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी सुद्धा आपल्या शब्दसुमनांनी लतादिदींना श्रद्धांजली वाहली.
सौ.समिक्षाताई उपासे,पुजाताई गडदे,नंदाताई चापले,प्रा.डॉ.रक्षाताई महाजन,विजयाताई हाके,रंजनाताई कोकणे,रंजनाताई लांडे यांनी सुद्धा स्व.लतादिदींनी गायलेले अभंग, भक्तीगीत सादर करून आपली श्रद्धांजली अर्पण केली.
सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करून धर्मपीठाच्या श्रद्धांजली पर सत्संगाची सांगता केली.
विनायक काळदाते
धनगर धर्मपीठ,महाराष्ट्र राज्य.