Friday, January 15, 2021

धर्मपिठ विदर्भ धर्मगुरु म्हणून ह.भ.प.प्रभाकररावजी दिवनाले यांची निवड.


🕉️अभिनंदन-श्री.प्रभाकरराव दिवनाले 🌹

 धनगर धर्मपिठाचे विदर्भ विभागीय धर्मगुरु  म्हणून निवड झाल्याबद्दल🕉️🌹

  

   रानावनात फिरणाऱ्या व शेतीव्यवसायात झोकून घेणाऱ्या धनगर समाजाला अध्यात्म ,आपल्या चालीरीती, कुळदैवत,कुळाचार याची ओळख होण्याबरोबरच समाज शिक्षणाचा व समाजविकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी धनगर धर्मपिठाची स्थापना केली.

   समाजाचा सर्वागीण विकास होण्यासाठी समाजातील प्रत्येकाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,धार्मिक बाबतीत अपडेट असणे आवश्यक आहे.या धावपळीच्या युगात माणसिक शांततेसाठी आपले आचार विचार सकारात्मक असने आवश्यक आहे.सकारात्मक विचारासाठी मनाची शांतता आणि मनशांती साठी धर्माचारण आवश्यक आहे.किंबहुना जिवनातील चौफेर यशासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मध्ये धर्मशिलता,धर्माचे आचरण सुद्धा आवश्यक आहे."धर्मो रक्षती रक्षिता" या उक्तीप्रमाणे धर्माचे रक्षण म्हणजे पालन हा सर्वागीण विकासाचा पायाच आहे असे म्हटल्यावर वावगे ठरू नये.

  धर्माची सोपी व सुलभ व्याख्या करायची झाल्यास "धर्म म्हणजे जिवन जगण्याची आचारसंहिता".ज्यामुळे आपले जिवन सुखी ,सुसह्य ,आनंदी व सद्उपयोगी होते.रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चालने हा झाला पादचाऱ्याचा धर्म किंवा वाहतुकीची आचारसंहिता. जर आपण धर्म सोडला व आचारसंहिता भंग करून डाव्याबाजू ऐवजी उजव्या बाजूने चालायला लागलो तर अपघात होतो कारण आपण डाव्या बाजूने चालन्याचा धर्म सोडला.


 बेफाम हत्तीला जसा माहूत अंकुशाने नियंत्रित करतो तसे अमर्याद भौतिक साधन सुचितेमुळे चलबिचल झालेल्या मनाला नियंत्रित करण्यासाठी धर्माचा म्हणजे योग्य विचाराचा अंकुश आवश्यक आहे.

मानसाच्या सर्वागीण विकासासाठी सुद्धा धर्म आवश्यकच आहे हे जगमान्य झाले आहे.जगात कोणताच देश नास्तिक नाही. विज्ञानात अति प्रगत पाश्चिमात्य राष्ट्राचे पंतप्रधान सुद्धा देवाला स्मरून शपथ घेतात.

  धनगर समाज धर्मपिठ हे एका दिंडी सारखे आहे.इतर दिंड्यासोबत मिसळून वारी पूर्ण करणारे ते आहे.

   अशा उदात्त हेतूने स्थापन झालेल्या धनगर धर्मपिठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.विष्णुपंत गावडे यांनी धर्मपिठाचे विदर्भ अध्यक्ष श्री.विनायक काळदाते यांच्या नामनिर्देशनावर  श्री.प्रभाकरराव दिवनाले, अकोला यांची धनगर धर्मपिठाचे  विदर्भ विभागाचे धर्मगुरु म्हणून सुपात्र नेमणूक केली आहे.

  एसटी महामंडळातील नोकरी नंतर अध्यात्म मार्गातून समाजसेवा व समाजप्रबोधन करणारे प्रभाकरराव दिवनाले लेखक आहेत प्रबोधनकार, किर्तनकार  आहेत.त्यांचे" क्रोध-एक जीवन शत्रू" हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झाले आहे.

श्री.प्रभाकरराव दै.तरुण भारत,देशोन्नती, मातृभूमि मध्ये अध्यात्मावर लिखाण सुद्धा करतात, आकाशवाणी वर व्याख्याने देतात,शालेय विद्यार्थ्यांना तसेच वृद्धाश्रमा मध्ये व्याख्यान देतात.त्यांना अंकुर साहित्य संघाचा सन 2018 चा अध्यात्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

  धनगर धर्मपिठाचे विदर्भातील धर्मगुरू म्हणून श्री.प्रभाकरराव दिवनाले आपल्या प्रवचन,व्याख्यान, लिखाणातून

धनगर धर्म पिठाचे धर्म प्रसाराचे काम यशस्वी पुढे नेतील या बद्दल त्यांना शुभेच्छा.🌹


🕉️✍️ विनायक काळदाते.

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...