धर्म पिठाची वाटचाल मुंबई ते कोल्हापूर. कोल्हापूर ते नागपूर महिला,संत,अधिकारी यांचा वाढता पाठींबा.🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll
ऋतस्य यथा प्रेत!
धर्म रक्षित रक्षित:
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯स्वातंत्र्यानंतर जमातीच्या अनेक चळवळी होवून गेल्या.त्या सर्वांचा मुद्दा एकच आहे आरक्षण आणि नंतर त्याचे राजकारण. यावरती अनेक आमदार मंत्री झाले. ही एक चांगलेच आहे.पण या सर्व चळवळीत आरक्षण मुद्दा असतो. एकच नेता असतो .त्याचा उद्देश पद मिळवने. आतापर्यंत नेता स्वत:च माझ्या मागे या म्हणून घोषणा करत असत. यामुळे काही 17/18 वर्षाची मुल जमवून नेते झाले. पण इतर समाज कधीही बाहेर आला नाही. पण साहित्य संमेलन माध्यमातून राज्यातील विचारवंत एकत्र येवू लागले. त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले. महिला आणि धार्मिक क्षेत्रातील लोकांना व्यासपीठ नव्हते तेही उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळेच या ऐतिहासिक एकमेवाद्वितीय व्यासपीठावर अनेक महिला अधिकारी, अधिकारी, धर्म आणि अध्यात्मीक क्षेत्रातील सन्माननीय मंडळी सामील होत आहेत. राज्य भरातून हा व्यासपीठ उपेक्षित समाज स्वत:हून जोडला जात आहे.समाजाला स्वप्न दाखवली जायची पण येथे असे काहीच नाही. येथे आहे परमेश्वरी कार्य आणि उद्देश आहेत धार्मिक, साहित्यीक,शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, शेती,महिला बेरोजगार सक्षमीकरण.
संस्थापक अध्यक्ष यांनी धनगर जमातीच्या अनेक चळवळी प्रमाणीक पणे सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात धनगर जमातीला एक साहित्य, सामाजिक, राजकीय ओळख निर्माण करून दिली आहे.धार्मिक अध्यात्मीक ओळख ही निर्माण होत आहे.त्यामुळे लोक जोडले जात आहेत. या ठिकाणी आज शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सन्माननीय महिला सहभागी होत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन 🌹🕉️यत्र नार्यस्तु पूज्यंन्ते रमन्ते तत्र देवता: धनगर धर्म पिठात मातृशक्तीचा आदर-सन्मान🕉️
स्त्रियांचा सन्मान व त्यांच्या कर्तबगारीवर अतुट विश्वास ठेवून त्यांना किमान नाही तर समान संधी देवून प्रसंगी त्यांच्या नेतृत्वात समाजप्रबोधन व समाजविकास साधन्याची मानसिक तयारी ठेवत मार्गक्रमण करत धनगर धर्म पिठ सोलापूर ते नागपूर स्त्री शक्तीची मोट बांधण्यात यशस्वी होत आहे.अनपेक्षितपणे समाजविकासाची ,समाजसंघटनाची ही मोहीम महिलाशक्तीच्या प्रभावाखाली जातांना दिसत आहे.धर्म पिठातील महिलांच्या घोडदौडीला व सहभागाला कारणही तसेच आहे ते म्हणजे धर्म पिठाने स्विकारलेले तत्त्व " यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:"
धर्म पिठात समाजातील डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, अधिकारी, शिक्षिका,पत्रकार, पोलीस,व्यवस्थापक,गृहिणी, समोपदेशनाच्या क्षेत्रातील भगिनी समाजविकासाच्या या पवित्र कार्यात एकत्र येउन मार्गक्रमण करत आहेत.
संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेब, अध्यक्ष डॉ. विष्णूपंत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने,प्रदेशाध्यक्ष सौ.संगिताताई पाटील महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रियांना धर्म पिठामध्ये प्रोत्साहित करत आहेत व या कार्यात यशस्वी होत आहेत.
आज कोल्हापूर, नाशिक,वर्धा येथील महिला पदाधिकाऱ्यांच्या काही नियुक्त्या घोषित होत आहेत, त्यांचा अल्प परिचय असा आहे.
🌹रंजनाताई गांजे,नाशिक-यांची नाशिक जिल्हा धर्म गुरु म्हणून निवड जाहीर करण्यात येत आहे.मा.रंजनाताई या निवृत्त शिक्षिका असून स्वाध्याय परिवारामध्ये त्यांचे मोठे स्थान आहे,कार्य आहे.समाजातील महिलांचे समोपदेशन व संघटन करून समाजविकासात योगदान देण्याची त्यांची अभिलाषा आहे.समाजाला भुषण वाटावे असे काम रंजनाताईंचे आहे.
🌹सौ.शोभाताई आगोने,नाशिक-यांची नाशिक जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे.सौ.शोभाताई समाजकार्यात व चळवळीत अग्रेसर आहेत.त्यांनी अनेक समाज आंदोलनात सुद्धा सहभाग घेतला आहे.
🌹सौ.प्रमिलाताई धाबळे, नाशिक शहर अध्यक्ष- सौ.प्रमिलाताई धाबळे ह्या उत्कृष्ट महिला संघटक असून नाशिक शहरात त्यांचे समाज चळवळीत सहभाग व योगदान असते.
🌹सौ.सुरेखाताई सागोरे,नाशिक शहर संघटक-सौ.सुरेखाताई यांना आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राची आवड असून या माध्यमातून समाजप्रबोधन व समाजविकास व्हावा या हेतूने त्या धर्म पिठा सोबत काम करणार आहेत.
🌹सौ.मिनाताई पुनसे -सौ.मिनाताई पुनसे यांची वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.एम.ए.बि.एड अशा उच्च शिक्षित असलेल्या ताई महाराष्ट्र शासनात कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून काम करतात. त्यांना समाजकार्याची आवड असून समाजविकासाची तळमळ आहे.
🌹सौ.शशिकलाताई सरगर,कोल्हापूर-सौ.शशिकलाताई यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येत आहे.
परिचय-प्रा. शशिकला तुकाराम सरगर
शिक्षण : एम. ए. एम. एड.
अनुभव : 28 वर्ष
सामाजिक कार्य :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ कोल्हापूर संस्थापक सदस्य, सचिव. धनगर समाजातील विद्यार्थिनींना महिला मंडळामार्फत गणवेश वाटप व हुशार विद्यार्थिनींना स्कॉलरशिप वाटप. पुणे येथील निर्माल्य या संस्थेमार्फत अंध विद्यार्थिनींना पुस्तक वाटप. शैक्षणिक कार्य : इयत्ता आठवी ते दहावी , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे मार्फत हिंदी अभ्यासक्रम मंडळावर अभ्यास तज्ञ म्हणून निवड व कार्य. कोल्हापूर येथील वाचन मंडळ सदस्य. कोल्हापूर व सांगली आकाशवाणी द्वारे विविध विषयांवर 50 हून अधिक वेळा भाषण
विविध वर्तमानपत्रे व मासिके यांच्याद्वारे प्रासंगिक लेख, कथा, ललितलेखन ,कविता प्रकाशन .
या सर्व भगिनींचे धर्म पिठात स्वागत आहे,त्यांना त्यांच्या या समाजकार्यात यश लाभो ह्या शुभेच्छा🌹
✍️विनायक काळदाते
राज्यसंघटक.
रेश्मा ठोंबरे
प्रसिद्धी प्रमुख
व सर्व पदाधिकारी.
धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

No comments:
Post a Comment