Sunday, January 17, 2021

ह.भ.प.कचरे महाराज यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड.

🌹ग्रामविकासाला वाहून घेतलेले  ह.भ.प.रमेश महाराज कचरे यांची धर्मपीठाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड🌹

   राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील आदर्श डोळयासमोर ठेवून आजीवन ग्रामविकासाचा प्रचार व प्रसार करण्याची शपथ घेतलेले ह.भ.प.रमेश महाराज कचरे यांच्या खांद्यावर धनगर धर्म पीठाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदाची पताका देण्याचा निर्णय झाल्याचे धर्मपीठाचे विदर्भ अध्यक्ष श्री.विनायक काळदाते व विदर्भ धर्मगुरु प्रभाकररावजी दिवनाले यांनी कळवले आहे.ह.भ.प.कचरे महाराजांच्या नियुक्ती मध्ये धर्म पीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले व अमरावती जिल्हा  अध्यक्ष ज्ञानेश्वरजी ढोमने यांचे मार्गदर्शन विदर्भ समितीला लाभले.

   ह.भ.प.कचरे महाराजांचा व्यासंग मोठा असून सपूर्ण विदर्भात त्यांचे ग्रामविकासावर प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात.

   ह.भ.प.कचरे महाराजांना शासना मार्फत व विविध संस्थामार्फत पुरस्कारीत करण्यात आले आहे,गौरविण्यात आले आहे.त्यांची यवतमाळ जिल्हा धनगर धर्म पीठाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याने संत मंडळीमध्ये आनंद पसरला असून ग्रामविकासा सोबतच समाजविकासाचे सुद्धा प्रबोधन होणार आहे.


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...