Tuesday, February 16, 2021

धनगर धर्मपिठा मार्फत लवकरच राज्यस्तरीय धर्म संसद.डॉ. अभिमन्यू टकले.

धनगर धर्म पिठा मार्फत लवकरच पहिली राज्य स्तरीय ऐतिहासिक धर्म संसद  होनार 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

तमाम महाराष्ट्र राज्यातील अध्यात्म,धर्म, क्षेत्रातील व धर्म प्रिय सज्जन व मान्यवरांना व धर्म पिठ पदाधिकारी, धर्म गुरू,अनुयायी, भक्त,संत, संत  साहित्यीक यांना कळवण्यास आंनद होत आहे की महाराष्ट्र राज्यात लवकरच  धर्म संसद आयोजित करवयाची आहे.धर्म म्हणजे सत्य.सत्याला कधी जात आणि धर्म नसतो.त्या प्रमाणे सर्व समावेशक धर्म संसद होनार आहे.

सध्याच्या युगात समाजाला योग्य दिशा देने,मार्गदर्शन करने,सज्जनांना एकत्र करने हे काम फक्त साहित्य संमेलन आणि धर्म या दोनच व्यासपीठावर होऊ शकते .या उलट समाजाला एखाद्या मुद्यावर भावनीक बनवून त्याचा स्वतःच्या पक्षासाठी व मतासाठी उपयोग करून फेकून देण्याचे काम राजकीय नेते करत असतात. बहुजन, ओबीसी यांना धर्मातही फक्त भक्त आणि देणगीदार दर्जा प्राप्त आहे.देशात जरी लोकशाही व घटनेचे राज्य असले तरी लोकांच्या मनावर धर्माचे राज्य आहे हे नकारून चालनार नाही.या मध्ये ८५%हिंदू हे ओबीसीं आहेत. यांना धर्म स्वातंत्र्य असले तरी व्यासपीठ मात्र कोणीही तयार केलेले नाही.त्या साठी आपण धनगर धर्मपिठ प्रभावी असे व्यासपीठ तयार केलेले आहे.अनेक धर्मपिठ आहेत पण त्यांचा सामान्य माणसाला काहीच उपयोग नाही. अनेक अरबो खरबोची देवस्थान आहेत पण ते फक्त देणग्या गोळा करुन एखादेअन्नछत्र व एखादे रूग्णालय चालवने या पलीकडे गेलेले नाहीत.जे जगात बहुसंख्य लोकांचे धर्म आहेत त्यांना जगभर राजाश्रय आहेत व आपल्या देशात ही राजाश्रय आहे.ते योग्यच  असले तरी हिदू धर्माला मात्र  जगात कोठेच राजाश्रय नाही.धर्म विद्यापीठ नाहीत.धर्म शिक्षण, संशोधन, प्रसारण नाही. धनगर आणि बहुजन समाजाचा जसा अडगळीत पडला  ईतिहास होता तो आपण साहित्य संमेलन माध्यमातून बाहेर काढला तसेच ही दैवतेही बाहेर  व्यासपीठावर आली पाहिजेत. हिदू धर्मा पासून प्रिंट मिडीया ही खूप दूर गेलेला आहे.

महाराष्ट्र ही संताची भूमी.तुकोडोजी महाराज, संत  गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर माउली,संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखा मेळा, संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज, संत बाळुमामा, संत जनाबाई, संत भगवान बाबा. संत गाडगे महाराज, संत कैकाडी महाराज,संत सावता महाराज. कितीतरी जमिनीवर चालून समाज प्रबोधन करणारी संत दैवते या राज्याच्या भूमीत होउन गेली. यांचे चांगभल  धनगर धर्मपिठा मार्फत झाले पाहिजे.

खंडोबा, बिरोबा,सिध्दोबा, महालिंगराया, म्हसोबा, बाबींरबुआ,  सोमलिंगराया, भूताळ सिध्द, चिचंणी मायाक्का, अशा अनेक या दैवतांचा धार्मिक इतिहास,बाहेर आला पाहिजे.लाखो लोकांच्या यात्रा ,जत्रा भरतात याचे सुयोग्य नियोजन झाले पाहिजे.अनेक धार्मिक ओव्या आहेत. हलमत नावाचा कन्नड मध्ये धर्म ग्रंथ आहे. हा मौलीक ठेवा, ही मौलीक धर्म संस्कृती आपण टिकवायला पाहीजे.वाईट कर्मकांड काढून टाकले पाहिजेत.सर्वात महत्वाचे धनगर आणि बहुजनांना एक चांगले धार्मिक व्यासपीठ मिळावे या साठी धर्म संसद झाली पाहीजे.बहुजनांच्या धर्माचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या सरकारच्या कानात सकारात्मक द्रुष्टीने घुमला पाहिजे.संत सज्जन एकत्र आली पाहिजेत तरच राज्यात आणि देशात एक चांगली समाज परिवर्तन करणारी व सुसंस्कृत पिढी घडवनारी चळवळ सुरू झाली पाहिजे.

शंकराचार्य नंतर आदर्श राज्य कारभार व आदर्श धर्म शिक्षण, धर्म संवर्धन, धर्म रक्षण,प्रसारण कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. त्यांचा वारसा सक्षम पणे  टिकवण्या साठी आपणाला या पालखीला खांदा द्यावा लागणार आहे.राज्यातील तमाम धर्म,अध्यात्म प्रिय जनांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हिंदू धर्माचा वारसा  टिकवण्या  साठी उत्कृष्ट धर्म कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी यादी तयारी करावी.महाराष्ट्र राज्यात 80%हिंदू धर्मीय आहेत तर 80%हिंदूचा व 20%अल्प संख्याक 20% अल्पसंख्याक धर्म  कार्य करणार्या संत, अनुयायांचा ही सन्मान करण्यात येईल.तसेच जे कोणी धर्म चर्चा सत्र,परिसंवाद या मध्ये भाग घेवू ईच्छीते त्यांनीही आपली नावे खालील पदाधिकारी यांच्या कडे द्यावेत.धनगर धर्म पिठ सर्व कर्तुत्वान लोकांसाठी खुले आहे.

संपर्क फोन नंबर 

१] श्री बापूसाहेब हटकर मुंबई. केंद्रीय अध्यक्ष. 7710020069. २]श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष नाशिक 

8208558546 

३]श्री प्रभाकर दिवनाले आकोला. विदर्भ धर्म गुरू. 

४]श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष. सातारा.9423827878

५]श्री ज्ञानेश्वर ढोमणे जिल्हाप्रमुख आमरावती 9423434223

६]श्री विठ्ठल सजगने सर   जि. अध्यक्ष.माणदेश. 9423828908

७]श्री प्रकाश कोळेकर जिल्हाध्यक्ष सोलापूर. 9970817591

८]डाॅ.मधुकर सलगरे सर  लातूर. धर्म गुरू मराठवाडा 9922245380

९] श्री सोमनाथ कर्णवर API मुंबई विभाग.9595114444

१०]डाॅ.विजय पाटील कोकण प्रमुख 9890730893

११] डाॅ. सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष पुणे.

१३]डाॅ.प्रविण सहावे नागपूर9326863318

लवकरच पिठ पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा करून , वेळ,स्थळ,चर्चा सत्र,परिसंवाद विषय, मुख्य अतिथी ठरवले जातील.यळकोट यळकोट जय मल्हार, हरहर महादेव,जय भवानी जय शिवशंकर च्या गर्जनेत पहिली धर्म संसद एकदम दणक्यात घेतली जाईल. धर्म संसद कशी असेल या वरतीही एक लेख लिहीला जाईल. 

आपलेच एक सर्वांच्या हक्काचे पहिले एकमेव राज्य स्तरीय व्यासपीठ धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य. आपल्या संस्कृती आणि धर्माचा अभिमान असेल तर धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या घराघरात  पोहचवा.अभिमान बाळगा  सर्व धर्म संस्कृती चा मुळ पुरूष धनगर आहे.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

धनगर धर्मपिठा मार्फत राज्यस्तरीय धर्मसंसदेचे आयोजन-डॉ. अभिमन्यू टकले.

Thursday, February 11, 2021

धर्मपिठाचे राज्य संघटक पदी माजी.डि.वाय.एस.पि.केशवराव पातोंड यांची तर अमरावती जिल्हा संघटक म्हणून प्राध्यापक संजय अघडते यांची निवड.

🕉️या रे या लहान थोर,येथे कुणी नाही लहान नर-झेंडा धर्मपिठाचा घेतला खांदयावर🕉️

      🌹राज्य संघटक म्हणून माजी डि.वाय.एस.पि.श्री.केशवराव पातोंड यांची निवड🌹

    धर्मपिठाच्या माध्यमातून समाजातील सुशिक्षित ,विचारवंत, समाजसेवी आणि परोपकारी वृत्तीचे  बांधव एकत्र येउन हा समाज विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सरसावत आहेत.संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले व केंद्रीय अध्यक्ष मा.बापूसाहेब हटकर यांच्या सल्याने अशीच एक महत्त्वाची निवड म्हणजे  मा.केशवराव पातोंड यांची धर्मपिठाच्या राज्य संघटक पदी निवड.

परिचय🌹 श्री.केशवराव पातोंड अकोला हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत (डि.वाय.एस.पी.),उच्च शिक्षित असून उत्कृष्ट कामकाजासाठी शासनाने व समाजाने त्यांचा गौरव केला आहे.चंद्रपुर गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त प्रदेशात त्यांनी सेवा देवून देशसेवा केलेली आहे,त्याप्रदेशातील गुन्हेगारांना वठणीवर आणून सज्जनांचे रक्षण केले आहे,गुन्हेगारांचे समुपदेशन करून मत परिवर्तन केले आहे.औरंगाबाद, चाळीसगाव परिसरात नोकरी करत असतांना नोकरी सोबतच समाजसेवेत मोठे योगदान दिले आहे.चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे कार्यरत असतांना त्यांच्या पुढाकाराने समाजाचे सुव्यवस्थित असे मंगल कार्यालय उभे राहले आहे जे उल्लेखनीय आहे,प्रशंसनिय आहे.

  मा.पातोंड साहेब चांगले वक्ते असून त्या माध्यमातून त्यांनी समाज जोडला आहे त्याचा फायदा धर्मपिठाला समाजप्रबोधन, शिक्षण व समाज विकासात नक्कीच होणार आहे.

🌹प्रा.संजय अघडते-अमरावती जिल्हा संघटक म्हणून निवड.

    आजची दुसरी महत्त्वाची निवड म्हणजे प्रा.श्री.संजय अघडते सरांची अमरावती जिल्हा संघटक म्हणून निवड. प्रा.संजय अघडते सर दर्यापूर जि.अमरावती येथे विद्यार्जनाचे काम करत असून त्यांना समाजसेवेची आवड आहे,  विद्वतांचा मोठा गोतावळा त्यांच्या सोबत आहे.परिसरातील   समाजबांधवांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा नेहमी लाभ होत असतो.

वरील विद्वजनांनी धर्मपिठाचे सामाजिक विकासाचे मिशन व व्हिजन स्विकारुन  ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचे ठरवले आहे,त्यांना या समाजकार्यात शुभेच्छा🌹

✍️विनायक काळदाते

    कार्यध्यक्ष

   ✍️ ह.भ.प.प्रभाकर दिवनाले

   धर्मगुरु

✍️प्रा.एल.डी.सरोदे

  प्रसिद्धी प्रमुख(विदर्भ)

Monday, February 1, 2021

धर्मपिठाची आँनलाईन मिटिंग दि.31 जानेवारी 2021 रोजी संपन्न.

✍️धर्मपिठ आँनलाईन मिटिंग दि.31/01/2021वृतांत. 📚

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹

    समाज  शिक्षण,प्रबोधन संघटन,धर्मसंवर्धन व यामधून सर्वांगीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत झालेल्या धर्मपिठाचे कामकाज मागील तिन चार महिन्यात वेगाने पुढे जात आहे.

  समाजातील विचारवंताची मांदीयाळी धर्मपिठा मध्ये पहायला मिळत आहे,यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, पत्रकार, संतमडळी,शेतकरी, व्यावसायिक,गृहिणी  ई.सामील झाल्या आहेत,होत आहेत.

   कोविद-19व लाँकडाउनमुळे सर्व संपर्क मोबाईल व सोशलमेडीयाच्या माध्यमातून साधल्या जात असतांना सुद्धा धर्मपिठाची पताका सोलापूर ते नागपूर फडकवण्यात यश आले.

 धर्मपिठाच्या वेगवेगळ्या प्रदेशातील पदाधिकाऱ्यांची एकमेकांसोबत ओळख व्हावी, चर्चा व्हावी या हेतूने दि.31जानेवारी2021 रोजी संध्या.8वा. धर्म पिठाची आँनलाईन मिटिंग केंद्रिय अध्यक्ष मा.  बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सर्व प्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली.

   संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले यांनी प्रवासातच मिटिंग मध्ये सहभाग नोंदवला व पदाधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले.मा.हटकरसाहेबांनी धर्मपिठाची आवश्यकता, महत्त्व व गरज याबद्दल सविस्तर माहिती दिली तर डॉ टकले यांनी धर्मपिठाचे व्हिजन व मिशन सांगितले.श्री ज्ञानेश्वरजी ढोमने यांनी सभेचे सुत्रसंचालन केले.

कार्यध्यक्ष विनायक काळदाते, महिला आघाडी राज्य अध्यक्ष सौ.ढोमने ताई, विदर्भ संघटक श्री.गोपाळभाऊ गावंडे,विदर्भ धर्मगुरु ह.भ.प.दिवनाले महाराज, ह.भ.प.कोल्हे महाराज, ह.भ.प.घोंगे महाराज, ह.भ.प.कचरे महाराज,ह.भ.प. घोडस्कर महाराज, ह.भ.प.पुनसे महाराज, रंजनाताई गांजे , शशिकलाताई सरगर,सिमाताई धुमाळ ,मंजुषाताई चामटे , सुलोचनाताई कारिकंटे (मेहत्रे) ,आर. पि. कूवर साहेब,राजेश दिवनाले सर यांनी सभेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला.विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी विदर्भात प्रादेशिक स्तरावर संतसभा घेण्याची कल्पना मांडली, त्याला संस्थापक अध्यक्षांनी अनुमोदन दिले. केंद्रीय अध्यक्षांनी दर आठवड्याला आँनलाईन सत्संग घेण्याची कल्पना मांडली त्याला पदाधिकारी व संतमडळीने सकारात्मक प्रतिसाद दिला.ह.भ प.कोल्हे महाराजांनी संतमडळींना धोरण प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज वर्तवली.ह.भ प.घोंगे महाराजांनी तरुणांमध्ये धर्म प्रचारासाठी,आवड निर्माण करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची  विनंती केली. सलगर ताई यांनी धर्म पिठाचे व्हिजन व मिशन असलेले पत्रक उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

   श्री.ढोमने साहेबांनी आभार प्रदर्शन करून मिटिंगची सांगता केली.

✍️विनायक काळदाते

      कार्यध्यक्ष

    धनगर धर्मपिठ.

    दि.01/02/2021

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹

समाजसेविका सौ.मिनाताई होपळ यांची धर्मपिठ महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष पदी निवड.

🕉️🛕🔯धर्मपिठ महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष पदी समाजसेविका सौ.मिनाताई होपळ यांची निवड🕉️🛕🔯🛕🕉️🌹🕉️🌹

   समाज प्रबोधन,शिक्षण, समाजसेवा या माध्यमातून सर्वागीण समाज विकास साधन्याचे धोरण,मिशन व व्हिजन असलेल्या धर्मपिठात समाजातील उत्कृष्ट समाजसेवक,समाजसेविका सहभागी होत आहेत. शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, डॉक्टर, पत्रकार, महिला ,जेष्ठ नागरिक ,तरुण सामिल होत आहेत ही धर्मपिठाच्या पारदर्शक धोरणाची पावतीच आहे.

धर्मपिठाची महिला आघाडी सुद्धा आपल्या कार्यसहभागाने धर्मपिठाच्या कामकाजात नेहमी अग्रेसर असते.

🌹सौ.मिनाताई होपळ यांची महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष

निवड🌹

   मागील बारा तेरा वर्षांपासून अकोट जि.अकोला येथे डिसेंबर महिन्यात आयोजित होत असलेल्या वधूवर परिचय मेळाव्याचे नियोजनात सिंहाचा वाटा असलेल्या सौ.मिनाताई होपळ ह्या मेळाव्याचे बॅक आँफिसच म्हणावे लागेल.

  दरवर्षी निराधार विद्यार्थ्यांना व वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना आपल्या घरी एक दिवस घरी मुक्कामी आणून, त्यांना घरपण देण्याचे समाजकार्य सुद्धा त्यांच्या नावावर आहे.लाँकडाउन काळात सर्वत्र रोजगार थांबलेले असतांना सौ.मिनाताई होपळ यांनी परिसरातील दिव्यांग कुटुंबाना आपल्या स्त्रीधनातून मदत केली.

आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मा.श्री.रामदासजी होपळ सर यांच्या अर्धांगिनी असलेल्या सौ.मिनाताई श्रीयुत सरांच्या यशात त्यांच्या पाठीमागे सशक्त पणे उभ्या असतात.सौ.मिनाताई    आपले यजमान श्री.होपळ सर यांच्या जि.प.शाळेत सुट्टी च्या दिवशी जाऊन शाळा सुशोभित करतात जेणे करून विद्यार्थ्यांना शाळेत आनंद वाटेल.त्यांनी पुर्णवेळ निस्वार्थ समाजसेवेला वाहून घेतले आहे.

सौ.मिनाताई होपळ यांची धर्मपिठ महिला आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी झालेली निवड धर्मपिठाचे कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी फार मोलाची ठरणार आहे,त्यांना आपल्या कार्यात शुभेच्छा🌹

✍️सौ.शारदाताई ढोमने

   धर्मपिठ महिला राज्य अध्यक्ष.

 रेश्मा ठोंबरे

प्रसिद्धी प्रमुख

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...