धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य (लोक धर्म पीठ )
का? कशा साठी?
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
प्रस्तावना: धर्म म्हणजे काय? सत्य, न्याय, सदाचार म्हणजे धर्म होय.
धर्म पीठ म्हणजे धर्माचे,सुसंस्काराचे शिक्षण, प्रबोधन, संशोधन, प्रसार करणे व निरपेक्ष, सुसंस्कृत नागरीक व देश निर्माण साठी प्रयत्न करणे होय.
नाव जरी धनगर धर्म पीठ असले तरी धर्माला व देवाला कसलीही जात नसते.
धर्म पीठाचे उद्देश:☸️धर्म शिक्षण,प्रबोधन,संशोधन प्रसारण.
☸️धर्म कार्य करणार्या लोकांचे एकीकरण.
☸️राज्यातील व देशातील सर्व धार्मिक संस्थाने यांचे सहकार्य घेणे.
☸️राज्यातील व देशातील इतर,धर्म पीठाशी समन्वय करणे व राखणे.
☸️जमातीच्या संताचा,देव दैवतांचा इतिहास व्यासपीठावर आणने.
☸️धर्म, साहित्य संमेलन घेणे.
☸️धर्म परिषदा घेणे.किर्तन,प्रवचने आयोजित करणे.
☸️बाल संस्कार, शिक्षण घेणे.
☸️आरोग्य शिक्षण, शिबीर आयोजित करने.रूग्णालये स्थापन व सुरू करणे.
☸️आयुर्वेद प्रचार व प्रसार करणे.
☸️सामाजिक कार्य करने.धर्म.
☸️गुरू कुल स्थापना करणे.
☸️राज्य भर योग, आयुर्वेद कँम्प घेणे. विविध शैक्षणिक मार्गदर्शन करणे, व्यावसाय सुरू करणे.
☸️ज्योतिष विद्यापीठ स्थापन करणे.शैक्षणीक संस्था, मंदिरे स्थापन करणे.
☸️दिंडी काढणे. सांस्कृतिक कार्यक्रम घेणे.
☸️भारत देश निरधर्म पेक्ष देश आहे. परंतु सर्व धर्मांना त्यांच्या देशात राजाश्रय आहे .आपण राजाश्रय मिळून देण्यासाठीच प्रयत्न करणे.
☸️सर्व धर्माचा आदर करून धर्म परिषदा, धर्म संमेलन सुरू करणे.
☸️धर्म कार्य करणार्या लोकांना सरकारी मानधन सुरू करणे,मोफत प्रवास पास साठी प्रयत्न करणे.
☸️धर्माचा सामाजिक, राजकीय गैरवापर थांबवने.
☸️उतक्रुष्ठ सामाजिक, राजकीय, धार्मिक लोकांचा सन्मान करणे.
☸️वाईट, रूढी पंरपंरा यांना मुठमाती देणे.
☸️सर्व सण, उत्सव, धार्मिक लोक संत यांची पुण्यतिथी, जंयत्या साजर्या करणे.
☸️धर्म कार्य करणार्या लोकांचा विकास करणे.
अशा तर्हेने धर्म पीठ सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,सांस्कृतिक वारसा बळकट करून निकोप व सुखी, शांती, वैभवशाली समाज निर्माण करून एकोप्याची ,सहकार्य भावना निर्माण करेल.
आपण जर आपल्या देशाचा धर्म इतिहास पाहिला तर ,खरे धार्मिक कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले आहे.स्वातंत्र्या नंतर अनेक संत, धर्मगुरू होऊन गेले त्यांनी समाज प्रबोधन केले.पण राज्य, राष्ट्रीय पातळीवर धर्मा मध्ये जाती पोट जाती निर्माण झाल्या आणि समाज विभागला. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यानंतर कोणी ही धर्म एकीकरण, धर्म शिक्षण, धर्म संशोधन, धर्म प्रसारण केलेले नाही. विज्ञान, आधुनिकीकरण,स्पर्धा या मुळे माणसाला सुख,शांती, शारीरिक,माणसिक , अर्थिक वैभव टिकवण्याचे आव्हान माणसा समोर आहे. माणसाला भोगवाद आणि चंगळवाद पासून वाचवायचे असेल तर अध्यात्म आणि धर्म खूप महत्वाचे आहे. सध्या धर्म व भारतीय संस्कृती या माहीती तंत्रज्ञान विस्फोटाचा सामना करत आहेत. त्यामुळे धनगर धर्म पीठ असणे हे जमाती साठी खूफ महयवाचे आहे🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
No comments:
Post a Comment