Saturday, January 16, 2021

धर्मपिठात नारीशक्तीचा जागर.


🕉️धनगर धर्म पीठात नारी  शक्तीचा जागर🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏              भूतलावावर पहिली शिवशक्ती तयार झाली. एकच आहेत वेगळे नाहीत.स्ञी व पुरूष कर्त्रुत्वाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः

 वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्कृती मध्ये स्त्रियांचा सन्मान करण्याचे सांगितले आहे.स्त्रियांचा सन्मान करा म्हणून डांगोरा पिटणारा आपला समाजच स्त्रियांचे अवमूल्यन करण्यात आघाडीवर असतो.

जेव्हा जेव्हा राज्याचे,घराचे किंवा संघटनेचे कामकाज एखाद्या महिलेच्या हातात दिले जाते तेव्हा विलक्षण आश्चर्य कारक परिणाम दिसून येतात. फक्त त्यामध्ये पुरुष संस्कृतीने  ढवळाढवळ करता कामा नये.घर चालवणाऱ्या स्त्रीची नियोजन क्षमता देश चालवणाऱ्या स्त्री पेक्षा कमी नसते ति नियोजन, अंमलबजावणी, शिष्टाचार, शिक्षण,आरोग्य, अर्थ,कृषी सर्वच विभाग सक्षमपणे हाताळत असते.फक्त गरज असते ती म्हणजे खोटी पुरुष प्रधान लूडबुड थांबवण्याची.  भारतातील व जगातील स्त्रीयांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.पु.अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी तारामती,येसु बाई,भीमाबाई होळकर,ईंदिरा गांधी व आणि देशातील व जगातील सर्व कर्तृत्वत्वान स्त्रियांनी हाताबाहेर गेलेली परिस्थिती सुव्यवस्थित केल्याचा दाखला आहे,गरज आहे फक्त त्यांना काम करू देण्याची, लुडबुड न करण्याची व पुरुषी हस्तक्षेप न करण्याची  नाहीतर बालिश तो बायकात बोलला असे होता कामा नये.

भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्रि पाल, पी.व्ही सिंधु, सानिया मिर्जा, गीता फोगट, सायना नेहवाल,साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी अनेक कर्तृत्ववान महिला आपले क्षेत्र गाजवत आहेत.युरोपियन देशात मेंढपाळ व्यवसाय करणारी एक मुलगी त्या देशाची मंत्री झाल्याचे आपण सोशल मेडीयावर वाचलेच आहे.त्यामुळे स्त्री ही शक्तीच आहे फक्त आपण तिचा आदर करायला शिकले पाहिजे, मग ती खेड्यातील असो वा शहरातील. पुरुषांनी खोटा अहंकार सोडून स्त्रियांच्या कर्तृत्वार टिकाटीप्पणी करणे बंद केले पाहिजे. त्यांच्यातील नेतृत्व गुणाला सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे.

 धनगर धर्म पीठ ज्याचे ध्येय समाजाचे प्रबोधन, शिक्षण व समाजविकास आहे तेथे समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांनी हा समाजविकासाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे,ज्या मध्ये समाजकारण, राजकारण, शिक्षण,आरोग्य, आध्यात्म क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा जागर आहे.    सौ.रुक्मिणी  ताई गंलाडे डीवायएसपी  ठाणे.

1)शारदाताई ढोमने-पदवीधर समाजसेविका , समाज संघटनात अग्रेसर.

2)छबूताई मातकर ,पदवीधर समाजसेविका,माजी  सदस्य, पंचायत समिती

3) शारदाताई थोटे,पदवीधर समाज कार्यकर्त्या,राजकीय पक्षात महिला पदाधिकारी

4) अर्चनाताई तालन,पदवीधर महिला समाजसेविका,राजकीय पक्षाच्या पदाधिकारी

5)रंजनाताई लांडे ताई-पदवीधर, समाजसेविका

6)सुनंदाताई पाठक - पदवीधर,  ज्येष्ठ समाजसेविका

7)शोभाताई डहाके -शिक्षीका,पदवीधर समाजसेविका

8)जयश्रीताई वाघ -शिक्षीका,पदवीधर समाजसेविका, 

9)वर्षाताई मोहोडदव -पदवीधर समाजसेविका

10)प्रणालीताई खरबडे -शिक्षीका,पदवीधर समाजसेविका

11) डाॅ.रक्षाताई महाजन. -एम.ए.पि.एच.डी.,साहित्यिक, सेमाजसेविका                              12) सारीकाताई बुरले, समाजसेविका, इंजीनियर. 

13)डॉ. पुजाताई सहावे,बि.ए.एम.एस.,पुरस्कार प्राप्त समाजसेविका

14)सविताताई माने- साहित्यिक, पदवीधर समाजसेविका

14) सौ.रीमाताई कर्णवर -पदवीधर,सिद्धहस्त  समाजसेविका.

15)डॉ. अनिताताई खटके पि.एच.डी.सिद्धहस्त मँनेजमेट गुरु,शिक्षणतज्ज्ञ.

16) रेश्माताई ठोबरे- पदवीधर समाजसेविका, साहित्यिक

17)सविताताई दुधभाते -एम.ए.पि.एच.डी.प्राध्यापिका, समाजसेविका.

18)रुक्मिणीताई         गलांडे, डि.वाय.एस.पी.       १९)सौ रेशमा ठोंबरे एम ए,एमजे पत्रकारिका.    20)सौ मनिषा माने धर्म  समाज सेविका.

 या सर्व महिला सामान्य कुटुंबातील असून त्यांच्या असामान्य कर्तृत्वावर धर्म पीठाला अगाढ विश्वास आहे.

चला तर मग धर्म पीठाच्या माध्यमातून नारी शक्तीचा  सन्मान करण्याचे धडे आपण पुन्हा घेउ,अनेक  स्री रत्न आपल्या जमातीत आहेत बस त्या साठी व्यास पीठ गरज होती ,आपल्या संस्कृतीचे जतन करु.

✍️विनायक काळदाते

     धनगर धर्म पीठ.             🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...