Tuesday, November 30, 2021

धर्मपीठ सत्संगाची सुवर्ण महोत्सवी सत्संगाकडे वाटचाल.

 धर्मपीठ सत्संगाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

     धर्मपीठ आपला ऐतिहासिक असा ५०वा सत्संग लवकरच आयोजित करणार आहे व त्या दिशेने नियोजन सुरू आहे.

   समाजाचे धार्मिक,आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय प्रबोधन करून सर्वागीण समाज विकास साधन्याच्या हेतूने धर्मपीठ आपले कार्य कुठल्याही प्रसिद्धी विना करत आहे.

   सोमवार दिनांक २९नोव्हेंबर रोजी धर्मपीठाचा ४५वा आँनलाईन सत्संग संपन्न झाला.

     सौ.शारदाताई ढोमणे यांनी हरिपाठ गायन केले तर संजिवन समाधी सोहळ्या करीता श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी असलेल्या ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या १६व्या अभंगावर आपले चिंतन केले.तसेच ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामाचे १५वे पुष्प गुंफले.

    सौ. सुलोचनाताई मेहत्रे, मालाताई शिंदे,प्राप्तीताई चितळकर, प्रज्ञाताई पेशवे,समिक्षाताई उपासे,राधाताई रुपनवर,कल्याणीताई गोफणे, नंदाताई शिंदे, ममताताई चितळकर यांनी भक्ती गित गायन केले.

ह.भ.प.दिवनाले महाराज, घोडस्कर महाराज, घोंगे महाराज,डॉ. अभिमन्यू टकले, बापूसाहेब हटकर,ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी आपले विचार व्यक्त केले.सौ.रेश्माताई ठोबरे यांनी पसायदान सादर केले.सौ.शारदाताई ढोमणे व रिया काळदाते यांनी सत्संगाचे तांत्रिक नियोजन केले.

    सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज,  दिवनाले महाराज,डॉ. अभिमन्यू टकले, बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,इंजि. श्री.विनोद ढोरे साहेब,विनायक काळदाते, हिमांशू शिंदे,शिवगनेश देवकर,सौ.शारदाताई ढोमणे,रेश्माताई ठोंबरे,प्रमिलाताई फणसे, सुलोचनाताई मेहत्रे, मालाताई शिंदे,प्राप्तीताई चितळकर, प्रज्ञाताई पेशवे, गडदे,राधाताई रुपनवर,कल्याणीताई गोफणे, नंदाताई शिंदे,ममताताई चितळकर  यांनी हजेरी लावली.


🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩


Monday, November 22, 2021

"सामर्थ्य आहे चळवळीचे.........धर्मपीठ ४४वा सत्संग संपन्न.

 🚩सामर्थ्य आहे चळवळीचे l जो जो करील तयाचे l परंतु तेथे भगवंताचे l अधिष्ठान पाहिजे  ll🚩

    🕉️धर्मपीठ ४४ वा सत्संग संपन्न🕉️


मागील वर्ष दोन वर्षांपासून कोरोना, अतीवृष्टी ,महागाई, बेरोजगारी अशा विविध तापांनी जन ग्रासलेले असताना त्यांचे आत्मिक बल वाढावे,समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती व्हावी या हेतूने सुरु झालेली धर्मपीठाची ही साप्ताहिक चळवळ "सत्संग" ने ४४ आठवडा म्हणजे ११वा महीना पूर्ण केला व १२व्या महीन्यात पदार्पण केले.

 ह.भ.प.कोल्हे महाराजांनी "एक नाम हरि द्वेत नाम दुरी l अद्वैत कुसरी विरळा जाणे "l या हरिपाठातील १५व्या अभंगावर आपले चिंतन केले तर ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामाचे १४वे पुष्प गुंफतांना ईश्वराचे लोकाध्यक्ष,सुराध्यक्ष,धर्माध्यक्ष असे विविध नांवे सांगितली.ह.भ.प. कचरे महाराज,घोंगे महाराज,दिवनाले महाराज ,डॉ. अभिमन्यू टकले यांनी धर्मपीठ सत्संगाच्या ११महिन्याच्या वाटचालीवर भाष्य केले .

सौ.शारदाताई ढोमणे,प्रज्ञाताई पेशवे,प्राप्तीताई चितळकर यांनी आपली गायन सेवा अर्पण केली तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.

सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज, दिवनाले महाराज, डॉ. अभिमन्यू टकले,ज्ञानेश्वरजी ढोमणे, विनायक काळदाते, प्रा.संजय अघडते,माणिकराव गुलवाडे, प्रा.दिपक माने,शिवगनेश देवकर, बालाजी घूले, प्रमोद भरणे, कैलास सपकाळ, शुभम नरोटे,आर्यन ढवळे,सौ.शारदाताई ढोमणे,रेश्माताई ठोंबरे,श्वेतकेतू ठोंबरे,नंदाताई चाफले प्रमिलाताई फणसे,प्राप्तीताई चितळकर,प्रज्ञाताई पेशवे  उपस्थित होते.सौ.शारदाताई ढोमणे,रिया काळदाते,तुषार कोल्हे यांनी आँनलाईन सत्संगाचे तांत्रिक नियोजन केले.


🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️


Monday, November 15, 2021

कार्तिकी एकादशी पर्वावर धर्मपीठाचा ४३वा सत्संग संपन्न.

 🚩देव वसे ज्याचे चित्ती-त्याची घडावी संगती🚩

🕉️धर्मपीठाचा४३वा सत्संग संपन्न🕉️


कार्तिकी एकादशीच्या महान पर्वावर धर्मपीठाचा ४३वा साप्ताहिक सत्संग संपन्न झाला.

निज रुप दाखवा हो-हरी दर्शनास दया हो अशी प्रार्थना करत ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरीपाठाच्या १४व्या अभंगावर आपले चिंतन केले तर "देव वसे ज्याच्या चित्ती-त्याची घडावी संगती" असे सांगत ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर आपले निरुपन केले.ह.भ.प.घोंगे महाराज यांनी उठा जागे व्हा असे आवाहन करत समाजाला जागे होण्याचे आवाहन केले.

ह.भ.प.दिवनाले महाराज, बापूसाहेब हटकर,डॉ. अभिमन्यू टकले यांनी सुद्धा आपले विचार मांडले.

  सौ.पुष्पाताई करे,शोभाताई डहाके, समिक्षाताई उपासे यांनी एकादशी पर गायन सेवा दिली तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.रिया काळदाते यांनी सत्संगाची तांत्रिक बाजू सांभाळली.

   सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, दिवनाले महाराज, बापूसाहेब हटकर, डॉ. अभिमन्यू टकले,प्रा.संजयजी शिंगाडे,विनायक काळदाते,प्रा.संजय अघडते, हिमांशू शिंदे,शिवगनेश देवकर,तुषार कोल्हे,पियुष दिवनाले, संतोष वाघमोडे, सिमंत गायकवाड, प्रमोद भरणे, नितू शिंदे,सौ.रेश्माताई ठोंबरे,पुष्पाताई करे,शोभाताई डहाके,समिक्षाताई उपासे,रिया काळदाते व समाजबांधव उपस्थित होते.


🚩🏵️🕉️🚩🏵️🕉️🚩🏵️🕉️


Monday, November 8, 2021

धर्मपीठाचा ४२वा सत्संग संपन्न.

 🚩धर्मपीठाचा ४२वा साप्ताहिक आँनलाईन सत्संग संपन्न🚩


"रिद्धी सिध्दी लावी पिसे-तयासी कोण पूसे" या शास्त्र वचनाचा दाखला देत ह.भ.प.क़ोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या १३व्या अभंगावर चिंतन केले.तत्पूर्वी सौ.शारदाताई ढोमणे यांनी या अभंगाचे गायन केले.महाराजांनी आपल्या चिंतनात द्वेतबुद्धी म्हणजे मनाची सैरभैर वृत्ती सिद्धि प्राप्तीच्या कशी आड येते हे समजून सांगितले.

  ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपन करताना "चला वळू गाई-बसू एका ठाई"हे शास्त्रवचन सांगत सर्व दुर्विचार,मतभेद दूर करून माणसाने एकत्र बसले पाहिजे ,विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे असे सांगितले. ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा चिंतन व निरुपनातील विषयाला हात घालत आपले विचार व्यक्त केले.

डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, श्री.कुवर साहेब यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.

  सौ.शारदाताई ढोमणे,पुष्पाताई करे,प्रज्ञाताई पेशवे, कल्याणीताई गोफणे इत्यादी भगिनीं


नी गायन केले तर सौ.रेश्माताई ठोबरे यांनी पसायदान सादर केले.

  सत्संगाला ह.भ.प.क़ोल्हे महाराज, कळंब महाराज,घोगे महाराज, घोडस्कर महाराज, कचरे महाराज, दिवनाले महाराज तसेच डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, श्री.विनायक काळदाते,श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे,आर.पि.कुवर साहेब,श्री.विनोद ढोरे साहेब, श्री.खंडेराव पाटील,राजेश दिवनाले सर,शिवगनेश देवकर ,सौ.शारदाताई ढोमणे, रेश्माताई ठोंबरे,पुष्पाताई करे,कल्याणीताई गोफणे,समिक्षाताई उपासे,प्रज्ञाताई पेशवे,प्राप्तीताई चितळकर ईत्यादी हजर होते.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️

Monday, October 18, 2021

धर्मपीठ ३९वा सत्संग संपन्न🚩

 धर्मपीठ ३९वा सत्संग संपन्न🚩



हरी नाम ना जपतीl परी नाना तिर्थे हिंडती l तयाची ही स्वार्थी भक्तीl कैसी लाभेल मना शांती ll

  धर्मपीठाच्या ३९व्या सत्संगात ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या दहाव्या अभंगावर निरुपन केले तर ह.भ प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर ९वे पुष्प गुंफले.दोन्ही महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगताना जनतेच्या वर्मावर बोट ठेवले.मुखात देवाचे नाव नाही आणि तिर्थाटन सुरू आहे या दांभिकतेवर महाराजांनी आसूड ओढले व नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले.तत्पूर्वी सौ.पुष्पाताई करे यांनी हरिपाठाच्या दहाव्या अभंगाचे गायन केले.ह.भ.प.घोडस्कर महाराज, कचरे महाराज,गाडगे महाराजांनी प्रार्थना सादर केल्या.

  डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,मा.कुवर साहेब यांनी धर्मपीठाच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले.

  सौ.सुलोचनाताई मेहत्रे,शोभाताई डहाके, मालाताई शिदे,पेशवे ताई,प्राप्तीताई चितळकर, शारदाताई ढोमणे यांनी भक्तीगीत सादरीकरण केले तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.

  सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, दिवनाले महाराज, घोडस्कर महाराज, कचरे महाराज, डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,ज्ञानेश्वर ढोमणे,विनायक काळदाते, हिमांशू शिदे,पियुष दिवनाले,राजेश दिवनाले सर माणिकराव गुलवाडे,संतोष पेशवे,डॉ. गोपाळ कळंब,ज्ञानदीप शिंदे तसेच शारदाताई ढोमणे, पुष्पाताई करे,रेश्माताई ठोंबरे,सुलोचनाताई मेहत्रे,शोभाताई डहाके,प्रमिलाताई फणसे,समिक्षाताई उपासे,प्राप्तीताई चितळकर, मालाताई शिंदे,पेशवेताई, रिया काळदाते व श्रोतेजन उपस्थित होते.


🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩

Tuesday, October 12, 2021

स्व.मा.आ.आनंदराव देवकते साहेबांना विनम्र अभिवादन.

 स्वर्गीय.        आनंदरावजी देवकते .राजकारणातील स्वयप्रकाशीत धनगर तारा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 विनम्र अभिवादन. 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

आनंदराव नारायणराव देवकते यांचा जन्म सामान्य शेतकरी धनगर कुटुंबात राजुर  या खेडेगावात ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर येथे झाला.  सत्य आणि प्रमाणीकपणा हा धनगर जमातीचे गुणसुत्रातच.ते धनगर असलेतरी ते धनगर जमातीचे नेते नव्हते. ते कांग्रेस चे राज्य स्तरीय नेते होते. सर्व जाती धर्माचे नेते होते. त्यामुळे २५ वर्षे आमदार आणि ५वर्षे मंत्री आणि ५वर्षे महानंदचे अध्यक्ष. लातूरचे पालकमंत्री राहूनही रहाण्याच्या घरातही बदल झाला नाही

राजकारणाची सुरुवात च राजूर गावचे संरपच म्हणून झाली.. 

खरतर बैरीस्टर टि.के.शेंडगे सहीत एकदम १२ धनगर आमदार स्वबळावर विना खर्च विधानसभेवर स्वतंत्र निवडून आले .तत्कालीन मुख्य मंत्री यशवंतराव चव्हाण आणि मराठा नेत्यांनी धनगर परत विधानसभेत दिसू नये म्हणून ३६ धनगर बहुल मतदार संघ राखीव ठेवले . राजकीय राख झालेल्या धनगर जमातीची     आणखी राख करून उजनी धरणात फेकून दिली.  धनगर जमातीचे  राजकीय अस्तित्व २०१४पर्यंत शुन्य करून टाकले.

दक्षिण सोलापूर तालुका मतदार संघ राखीव ठेवला नाही कारण आंनदराव देवकते संघटन मध्ये खूप हुशार होते. मी त्यांना अनेक वेळा भेटलो. ते अनेक वेळा आमच्या रुग्णालयात डायबेटिक फुट या आजारामुळे येत असत.आणि मी भेटलो की मी गप्प बसत नव्हतो राजकारण आलेच.मला ते म्हणत कांग्रेस माझी आई सोनिया माझी मायी मी त्यांची दायी  ते हे जाहीर सभेत ही म्हणत.मी ती निष्ठा ऐकूण तोंडात व कपाळावर मारून घ्यायचो. ६वेळा त्यांना या प्रमाणीक पणामळे तिकीट  मिळाले. दक्षिण तालुक्यात मतदार गणीत धनगर ८२००० मुस्लिम ६५०००कोळी लमान ३५००० आणि लिंगायत ८०००० दलित १५००० मराठा १५००० . देवकते साहेब फक्त धनगर म्हणून धनगर मतदान व कांग्रेस म्हणून मुस्लिम दलित मतदान फिक्स असायचे .लिंगायत आणि मराठा प्रंचड विरोध करायचे .ते राजूर ग्रामपंचायत चे सरपंच व १९६३ला दक्षिण तालुका उपसभापती झाले .तरीही १९७८ ते१९९३ व १९९९ते २००३ पंचवीस वर्षे आमदार राहिले.

२००३ला प्रमाणीक पणे आमदार कीचा राजीनामा देऊन मुख्य मंत्री सुशिलकुमार शिंदे साठी जागा रिक्त केली .  शिदेंनी परतफेड म्हणून खासदारकिचे तिकीट देवकते साहेबांना दिले .निवडणूकीने धनगर खासदार होवुन संसदेत जावू नये म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज गोपीनाथ मुंडे,  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते यांनी एक केला आणि धनगर संसदेत जान्यापासून रोखला.प्रतापसिंग मोहीते ना निवडून दिले.खरतरं गोपीनाथ मुंडे  साहेबांनी व  मराठा नेत्यांनी भाजपामधून रामहरी रुपनवर,सुभाष पाटील, आण्णा डांगे,मा.प्रकाश आण्णा  शेंडगे व कांग्रेस मधून आनंदराव देवकते यांची माती केली.देवकते साहेबांचा पराभव धनगर म्हणून आमच्या जीवाला लागला. २००३ते 

२००४ला आम्ही सर्वांनी एकत्र येवून डॉ .इंद्रकुमार भिसे सचिव व महादेवजी जानकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली . पुन्हा दक्षिण सोलापूर रचे बाय इलेक्शन लागले अर्जुन सलगर जिल्हा अध्यक्ष होते त्यांचे वय कमी म्हणून त्यांच्या बंधूंना रासपाचे तिकीट देवून उभा करून आम्ही मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पत्नी ला पराभूत केले.देवकते साहेबांचा बदला घेतला. नंतर देवकते साहेबांना महानंदचे अध्यक्ष केले.मला जानकर साहेबांनी यशवंत सेना अध्यक्ष बनवले  आणि अर्जून सलगर आणि मी सोलापूर जिल्ह्यात ६५० शाखा उभा केल्या.आम्हाला गोपीनाथ राव मुंडेचा राग होता. भाजपचे २१ सदस्य झेडपीत होते.  आर. जी. रुपनर आप्पा विरोधी पक्षनेते होते. झेडपी इलेक्शन लागले आम्ही प्रत्येक भाजपा विरोधात रासप उमेदवार दिला सगळा भाजपा व कांग्रेस पराभूत करून टाकले दुसरा बदला घेतला.नंतर जानकर  साहेबांनी रिडोलस स्थापन केले मगळंवेढा पंढरपूर एक लाख धनगर मतदान आहे  विजयसिंह मोहीते उभे राहिले धनगर जमातीने पाडून टाकले आणि धनगर जमातीचा राजकीय शत्रू असलेले मोहीते घराने जवळपास संपले आहे.

पंढरपूर ते बारामती आरक्षण दिंडी पहिली  बैठक मे २०१४ सोलापूरात झाली.आम्ही प्रंचड प्रसिध्दी दिली त्याच्या कटींग आजही आमच्या कडे आहेत आग लागल्या नंतर आम्ही दिडींतुन निघून गेलो.दिंडी मुळे धनगर कांग्रेस राष्ट्रवादी मधून बाहेर आला. कांग्रेस  राष्ट्रवादी मध्ये मुस्लिम दलित राहीला होता मग शक्कल लढवली धनगर दलित मुस्लिम गणीत मांडले.अर्जुन दादानी मला अगोदर विरोध केला आपल्याला बाळासाहेब आंबेडकर चालतील पण ओवेसी नको .नंतर दादा तयार झाला .आम्ही बैरीस्टर ओवेशींना भेटलो आणि मुस्लिम दलित कांग्रेस राष्ट्रवादी पासून दूर करण्यात यशस्वी झालो. महाराष्ट्र राज्यात आम्ही देवकते साहेब व धनगर जमातीचा केलेला राजकीय आपमानाचा बदला घेण्यात यशस्वी झालो.ओवेसी साहेब एमआयएम जिंकले.आम्ही जातीय राजकारणाचा बदला घेतला.

पण देवकते साहेब सर्वांचेच कांग्रेसी ज्येष्ठ नेते होते. त्यांना दक्षिण सोलापूर मतदार संघातील घर ,प्रत्येक माणसाची जमीनीचा बांध कोठे संपतो हे माहीत होते.ते धनगर नेता होण्याचे प्रयत्न ही करत नव्हते त्यांचेच योग्य होते.मा.आमदार गणपतराव देशमुख नंतर राज्यातील ज्येष्ठ आणि सर्वात जास्त काळ विधान सभेत असलेले नेते आंनदराव देवकते होते. त्यांना जर परत सतत  तिकीट दिले असते तर ते दुसरे विक्रम वीर प्रमाणीक धनगर  होते.म्हणून च या भ्रष्ट व्यवस्थेने त्यांना तिकीट दिले नाही.धनगर शुद्ध, प्रमाणीक ,परोपकारी असल्याने सतत निवडून येतात जर का पन्नासीक आले तर परत धनगरजमाती व्यतिरिक्त कोणच नसेल म्हणून सर्वच पक्ष जमातीला तिकीट देण्यासही घाबरत आहेत.हे वास्तव आहे.

देवकते साहेबांनी सर्व जाती धर्माला सहकारी साखरकारखाना , बाजारसमिती,बैंक  इतर पदे बहाल करुन सत्तेचा समतोल राखला.

शेवटी एवढेच म्हणेल देवकते साहेब तुम्ही जन्माने धनगर होते पण कर्माने  महात्मा गांधी होते. तुम्ही खूप सहन केले सोसले.  तुम्ही शरीरानं नाहीत तर कर्तृत्वाने आमच्यात असाल.तुमच्या जीवनाचा तारा निखळला असला तरी कर्तृत्वाचे तेज सतत तेवत राहील. तुम्हाला आणि तुमच्या जातीला राजकारणात नष्ट करु इच्छीनारांनी जर योग्य वाटा दिला नाही आश्वासने देवून पाळली नाहीत तर २०२४ पर्यंत तुमची जमात या दुष्ट कौरवांना नष्ट करुन  सत्यवादी राजांना गादीवर बसवून तुमचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करेल हीच धनगर जमातीचे आपणाला भावपूर्ण 💐💐विनम्र अभिवादन💐💐.हर और जित तो मर्दोके किस्मत के दो सितारे होते है! .देवकते साहेबांचे कार्य पाहून  थंड बसायला आम्ही षंड नाहीत. बदला घेतलाय.पडायला , पाडायला,लढाईला शिकलोय रडायला नव्हे. आम्ही लढतच मरणार रडत नव्हे. जब तक जियेंगे तब तक लढेंगे,हरेंगे तो औरभी भी लढेंगे, भिक नही लेंगे.  जरूर एक दिन का याब होंगे. .स्वर्गीय देवकते साहेब. 

आपलाच जमात वारस. 

डॉ अभिमन्यु टकले 

संस्थापक 

धनगर धर्म पीठ

 धनगर  साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य.

                                प्रकाशक: प्रसिद्धी:

श्री  विनायक काळदाते-कार्याध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹


Sunday, October 10, 2021

"अखंड होळकरशाही"पुस्तकाचे लेखक श्री.उज्वलकुमार माने व धर्मपीठ संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांची भेट.

 अखंड होळकर शाही पुस्तकाचे  लेखक व पत्रकार उज्ज्वलकुमार माने यांची भेट.  -----------------------------

प्रा. डॉ अभिमन्यु टकले. 

8793222817

-----------------------------

श्री उज्ज्वलकुमार माने हे मला ऑगस्ट मध्ये भेटायला आले व अंखड होळकर शाही पुस्तक भेट देवून गेले.मी पुजा अर्चा करत होतो आणि म्हणून मी पुस्तक भेट मिळाल्याचा फोटो घेतला नाही.पुस्तक वाचा आणि  कसे आहे ते सांगा एवढे बोलून ते पाच मिनिटात निघून गेले. ते जाताना मी त्यांना सांगीतले तुम्ही खूप कष्ट घेऊन पुस्तक लिहले मी वाचेलच आणि पुस्तक राज्यात गाजेलच.

मला पुस्तक वाचायलाच  तिन आठवडे लागले. मी पुस्तक परिचय व परिक्षणही लिहले होते.मी पुस्तक वाचले आणि  एक माहिती देणारा लेख ही लिहला. खरंतर ते परिक्षणही नव्हत आणि जाहिरात ही नव्हती. मला आवडले मी लिहले. आश्चर्य असे की आठवडा भरात त्याच पुस्तकावर, अनेक  साहित्य, इतिहासाची आवड असनारे जमातीच्या इतिहास प्रेमींनी परिक्षण लिहीले .सोसेल मिडीयात आणि प्रिंट मिडीयात ही राज्य भर गाजले.समाज सजग होत आहे वाचत आहे हे ही प्रकर्षाने जाणवले. या पुस्तकाला राज्य भरातून मागणी ही येवू लागली. 

रविवारी  आणखी ते पुस्तक घेऊन आले चेहर्‍यावर आनंद होता.पुस्तक लिहल्याचे समाधानही दिसत होते. राज्य स्तरीय 

पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या वेळेस सोलापूर येथे माझे मनोबल राखण्याचे  काम येथील सर्व पत्रकार बांधवानी केले होते.मला पत्रकार म्हणाले होते ,साहेब तुम्ही काळजी करू नका कोणीच आले नाहित तर आम्ही चाळीस पत्रकार दोन दिवस सभागृहात बसून राहू संमेलन यशस्वी करू. या सर्व प्रक्रियेचे जनक श्री उज्ज्वलकुमार माने, भरत कुमार मोरे आणि सर्व पत्रकार बंधु होते. आज जी धनगर जमातीची प्रतीमा राज्यात निर्माण झाली आहे त्याचे जनक सोलापूर चे सर्व प्रिंट मिडीयातील पत्रकार आहेत.

सोलापूर ही साहित्य, कला,सांस्कृतिक, ऐतेहासिक नगरी आहे. सोलापूर  येथील पत्रकार  व्यावसायिकतेचे व्यापारीकरण झालेले असतानाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता,नैतिकता यांचे  पालन करत असतात.पत्रकार हा दररोज लेखक असतो. आजही उज्वलकुमार माने यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला हे लवकर व्हावे अशी अशा व्यक्त केली.कोरोना ची तिसरी लाट आलीच नाही. त्यामुळे दिवाळी झाली की स्वागताध्यक्ष,अध्यक्ष, माजी अध्यक्ष ,सर्व राज्यातील सहकारी यांच्या सल्ल्यानुसार चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन जाहिर करू असे सांगितले. उज्वलकुमार माने यांनी साहित्य संमेलना साठी काही सुजाव ही सांगितले.साहित्य आणि धर्म संमेलनाच्या ठरावांना खूप महत्व असते. समाजाचे दखलपात्र मान्यवर ,पत्रकार, समाजसेवक,साहित्यीक संमेलनात सहभागी होत नसतील तर त्यांच्या विरोधात ठराव पास करायला पाहिजेत.चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन  सांगोला येथे अखंड होळकरशाही हे पुस्तक स्टाल वरती ऊपलब्ध करून देवू असेही उज्वलकुमार माने यांनी सांगितले.तसेच सोलापूर  येथे प्रिंट मिडिया  पत्रकार म्हणून जे करता येईल ते सर्व सहकार्य करू असेही त्यांनी अश्वासन दिले.✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️


Tuesday, October 5, 2021

"श्रद्धावान लभते ज्ञानम-शंकात्मा विनश्ती"सत्संगामधून लाभो सन्मती.धर्मपीठाचा ३७वा सत्संग संपन्न.

 श्रद्धावान लभते ज्ञानम-शंकात्मा विन्शती-सत्संगामधून लाभो सन्मती.🚩

   धार्मिक व्यासपीठावरुन समाज शिक्षण, प्रबोधन व सर्वागीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपीठाच्या ३७व्या साप्ताहिक आँनलाईन सत्संगामध्ये हरीपाठाच्या ८व्या अभंगावर ह.भ.प.कोल्हे महाराज यांनी चिंतन केले तर विष्णूसहस्त्रनामावर ह.भ.प.कळंब महाराज यांनी निरुपन करताना आयुष्यात माणसिक शांतते साठी,सुख समाधान व प्रगतीसाठी व ज्ञान प्राप्तीसाठी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळेल व त्याचे फळ मिळेल तसेच शंकाखोर ,संशयी प्रवृत्तीने नुकसानच होईल असे सांगितले. जागतिक पातळीवर सोशल मेडीया नेटवर्क बाधीत झाले असताना सुद्धा सौ.शारदाताई ढोमणे व श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे दाम्पत्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करत सत्संग पूढे नेला. 

  सुरुवातीला ह.भ.प.घोडस्कर महाराज यांनी प्रार्थना व सौ.पुष्पाताई करे यांनी हरीपाठ अभंग ८व्याचे गायन केले.तदनंतर ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपन केले.

 सौ.सुलोचनाताई मेहत्रे,सारीकाताई ठोंबरे,नंदाताई चाफले,शोभाताई डहाके,रंजनाताई लांडे यांनी आपले भक्तीगीत/प्रार्थना सादर केल्यात.

  ह.भ.प.दिवनाले महाराज, कचरे महाराज,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,काशिनाथजी फुटाणे, डॉ. मधुकरराव सलगरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

  कार्यक्रमाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, दिवनाले महाराज,कचरे महाराज, घोडस्कर महाराज,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,विनायक काळदाते,काशिनाथजी फुटाणे,डॉ. मधुकरराव सलगरे,सौ.शारदाताई ढोमणे, प्रा.शशिकलाताई सरगरे,प्रा.प्रितीताई शिंदे,सारीकाताई ठोंबरे(बुरुले),कुमार ठोंबरे(बुरुले),रेश्माताई ठोंबरे,रंजनाताई लांडे,नंदाताई चाफले,पुष्पाताई करे,शोभाताई डहाके,रिया काळदाते, समिक्षाताई उपासे तसेच हरी लबडे,शिवगनेश देवकर,राजेश खरात,चुडे महाराज, रोहित करे,माणिकराव गुलवाडे,पियुष दिवनाले,तुषार कोल्हे,कु.क़ोल्हे व समाजबांधव उपस्थित होते.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️













Tuesday, September 28, 2021

धर्मपीठाचा ३६वा सत्संग संपन्न


 🚩एक तरी ओवी-अनुभवावी.

धर्मपीठ सत्संगाने वाट दाखवावी🚩

  ज्ञानेश्वरी जयंतीच्या शुभ योगावर सोमवार दिनांक २७सप्टेंबर रोजी धर्मपीठाचा ३६वा संतसंग पार पडला.

   ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी हरीपाठावर  निरुपन करतांना सज्जनाचे लक्षणे,आचरणे सांगितली.मनात सद्विचार येण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरीपाठ म्हटला पाहिजे असे त्यांनी सांगितले."एक तरी ओवी अनुभवावी"असे श्रोत्यांच्या मनावर बिंबवले.

  ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी विष्णूसहस्त्रनामाचे ६वे पुष्प गुंफताना पातांजली योग सुत्रावर छान प्रवचन केले व भगवंताचे विविध नामे सांगितली.ज्ञानेश्वरी जयंतीचा ईतिहास सांगितला.

  सौ.शालिनीताई पगारे यांच्या मार्गदर्शनात कु.आसावरी पगारे,अवनी बच्छाव, सुशिल बच्छाव परीवाराने  गायन व वादनातून आपली सेवा सादर केली.

 सौ.शारदाताई ढोमणे,सुलोचनाताई मेहत्रे,रेश्माताई ठोंबरे,जयश्रीताई वाघ यांनी आपल्या सुरेल स्वरात  वातावरण भक्तीमय केले.

डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, प्रभाकर दिवनाले महाराज, ह.भ.प.घोडस्कर महाराज, श्री.विनोद ढोरे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले.

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी आभार व्यक्त केले तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.श्री.विनायक काळदाते यांनी सुत्रसंचालन केले.

  सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, कचरे महाराज, घोडस्कर महाराज,दिवनाले महाराज ,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे, काशिनाथजी फुटाणे, कार्य.अभियंता विनोदजी ढोरे साहेब,दिवनाले परीवार,दिपकजी नागे,प्रमोदजी पगारे,भाऊराव गाढवे,शिवगनेश देवकर,माणिकराव गुलवाडे, पंकज ढगे,गनेश शिंदे,पियुष दिवनाले,प्रतिक पडळकर,राज घुमनर ,सुशिल बच्छाव तसेच भगिनी मंडळामध्ये सौ.शारदाताई ढोमणे, शशिकलाताई सरगर,नंदाताई चाफले,जयश्रीताई वाघ,रेश्माताई ठोंबरे,प्रितीताई शिंदे,नंदाताई पाटील, प्रमिलाताई फणसे,शालिनीताई पगारे,आसावरी पगारे,अवनी बच्छाव उपस्थित होते.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️


Sunday, August 15, 2021

खरे देशभक्त व प्रामाणिक समाजसेवकांची उणीव भासत आहे.-डॉ. अभिमन्यू टकले.

 भारतीय स्वातंत्र्याचा आम्रुत महोत्सव  साजरा होत असताना प्रमाणीक अशा सामाजिक,  राजकीय,धार्मिक  देश भक्तांचा ह्रास वा  अस्त होतो आहे का?🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

भारतीय भूमी स्वतंत्र व्हावी या साठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले प्राण अर्पण केले त्यांना माझा शिर साष्टांग दंडवत.

सर्व देश बंधू भगिनींना स्वातंत्र्याच्या आम्रुत महोत्सवी दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश गरिबी, दारिद्र्य यांनी रंजला गांजला होता. १९७२ ला भिषण दुष्काळ होता पण स्वर्गीय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलूमिलू आयात केला ,सुकडी  वाटली व जनता जगवली.हरितक्रांती झाली,धवल क्रांती झाली. देश अन्न धान्य, दुध दुप्ते मध्ये स्वयंपूर्ण झाला.विज्ञानीकरण, आधुनिकीकरण झाले.स्वर्गीय  राजीव गांधी यांच्या कारकीर्दी पर्यंत तो जो विकास झाला तो  शेवटचा  विकास त्या नंतर फक्त दळणवळण विकास झाला. 

केंद्रीय आघाडी सरकार सुरू झाले. सरकार मध्ये देशभक्ता ऐवजी भ्रष्ट भक्तांचा संधीसाधुचा शिरकाव सुरू झाला. जनतेचा विकास थांबला . देश भक्ती मावळली संधी सांधूनी  जनता गरिब,मध्यम वर्ग, श्रीमंत, अशि विभागली तशा योजना राबवू लागले.पुढे कळसच झाला. आरक्षणाच्या नावावर देशातील विद्यार्थ्यांना टार्गेट करून  जाती धर्मात देशांतर्गत फुट पाडण्यात आली.देशात डावे ऊजवे  तयार झाले. मस्जिद मंदिर वाद सुरू झाले. हिंदू मतदार विरोधात इतर धर्म असे केंद्रीय राजकारण सुरू झाले.धार्मिक असहीस्नुता सुरू झाली. त्या वरून देशभर वांदग उठले. आरक्षणा नुसार मतदार विभागला गेला खुला,एससी एसटी,ओबीसी,बारा बलुतेदार.राजकीय व शासकीय नेते जनतेचे विश्वस्त असतात परंतु लोकशाहीत हे लोक राजे महाराजे व साहेब झालेत.मंत्रालयात जावून बघा  लोक सेवक मंत्री राजा सारखे व नोकरदार पतंप्रधाना सारखे वागत असतात. १९९० पर्यंत केंद्र शासनातील काही मंत्री भ्रष्टाचारात डुबले होते.

तेव्हापासून स्विस बँक भारतात चर्चेत आली.कांग्रेस सरकार मध्ये भ्रष्टाचार होता पण खूप कमी होता.आज जो देशाचा विकास दिसतो आहे ना तो फक्त कांग्रेस सरकरने केला आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थितीही तशीच आहे १९९४ पर्यंत टप्प्या टप्प्यानी विकास सुरू होता. कांग्रेस सरकार गेले  झुंड शाही सुरू झाली कधी नाही ते नको ते लोक सत्तेत गेले आणि राज्य धूवून ओरबाडून खाल्ले .२००५ पर्यंत भ्रष्टाचार हा संचालक लेवल व खालच्या पातळीवर असायचा हे जेव्हा सचिव व मंत्री यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सर्व अधिकार म्हणजे अर्थिक व बदल्या, बढत्या, प्रतिनियुक्ती हे सचिव पातळीवर घेतले. क्रिमपोस्ट घेण्याचे व्यवहार सुरू झाले.प्रचंड प्रमाणात हप्ते सुरू झाले. वसुलदार नेमणूका सुरू झाल्या. शासन आणि राजकारण हा बिगर भांडवली व्यावसाय तेजीत सुरू झाला. पैशा पुढे सेवा सुविधा ह्या विकत मिळु लागल्या. नियम कायदे कानून घटनेची आमल बजावणी ही फक्त गरिब जनते साठी व मिडीयाने ट्रायल केलेल्या घटने पुरतेच लागू झाले. आता तर  प्रत्येक कार्यालयात वाझे सारखे वसुलदार आहेत. 

२००१ पासून  2जी इंटरनेट चे जाळे आले 

माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाला प्रिंट मिडीया अडचणीत येवू लागला ,सेवे ऐवजी व्यवहार सुरू झाले. विविध राजकीय पक्षांच्या बाजूने बातम्या येऊलागल्या.जनसामान्य लोकांचे प्रश्न कमी आणि राजकीय लोकांची प्रसिद्धी जास्त होऊ लागली. साहित्यीकाची संख्या  वाढली .साहित्यीक लोकांची आक्रमकता सामाजिक भूमीका कमी झाली दर्जा घसरला.फिल्म इंडस्ट्री व क्रिकेट वेड वाढले. २०१० नंतर  सोसेल मिडीया आला वाचन कमी झाले. ई पुस्तके ई लायब्ररी सुरू झाली. ई लग्न सुरू झाले.आता तर क्रुत्रीम बुध्दीमता आली. लोक संख्येचा स्फोट झाला एकशे तीस कोटी झाली पण शैक्षणिक, आरोग्य विषयक, दळणवळण सेवा आणि सुविधा वाढल्या नाहीत. शिक्षण आणि आरोग्य सेवांचे बाजारी करण झाले. कोरोना आला आणि शाळांना कुलपे ठोकली गुणवत्तेचे बारा वाजवले व एक ऑक्सिजन सिलींडर दहा रूग्णाला लावावे लागले.व्हेटींलेटर   अभावी अनेक रूग्ण दगावले, ज्यांना व्हेंटीलेटर मिळाले त्याचे प्राण  वाचले पण व्हेंटीलेटर ची काळजी घेतली नाही त्याला बुरशी लागली त्या बुरशीने अनेकांना डोळे आणि जिव गमवावे लागले.सरकारी लसीकरण कंपन्या उत्कृष्ट काम करत होत्या त्या बंद करून खाजगीकरणास चालना दिली. या खाजगी कंपणी देशाला कोरोना लस देण्या ऐवजी परदेशाला देत आहेत आणि ते उद्योजक देशातल्या नेत्यांची जाहीर बदनामी करत आहेत हे दुर्दैवच की.

विज्ञानीकरण, अधुनिकीकरण या मुळे धर्म, संस्कार कमी झाले त्या मुळे देशाने एवढी प्रगती केलेली असली तरी  अधर्म मुळे बरेच लोक माणसीक स्थैर्य गमावून बसले आहेत.

आपला देश, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, विद्युतीकरण,संरक्षण या मध्ये बर्या पैकी अघाडीवर आहे.पण  शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, दळण  वळण सोयी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, लोकसंख्या नियंत्रण, धर्म संस्कार, शेती उद्योग, व्यवस्थापन या मध्ये आजही असतुंलीत आहे.

भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🌹

प्रा. डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 

आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕


Sunday, June 20, 2021

धनगर आरक्षण घोंगडे हवेतच-हजार कोटींची उड्डाणे ही हवेतच

 धनगर आरक्षण घोंगडे हवेतच-हजार कोटीची उड्डाणे ही हवेतच.

🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा


कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll

🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️☸️🕉️

जे जे आपणासी ठावे I ते इतरांसी सांगावे I शहाणे करून सोडावेI.        सकळ जण II.

हे संत रामदास स्वामीनी सांगीतले आहे  ते काम धर्म पीठा मार्फत करत आहोत. 

 मित्र हो लबाड बोलल्या शिवाय राजकारण होत नाही.दम देणे, भिती घालणे,आडवणूक केल्या शिवाय सरकारी बाबुला लाच दिल्याशिवाय काम होत नाहीत. त्यामुळे ९९%राजकीय  सेवक हे लबाड, ढोंगी, सोंगी आहेत. अपवाद आहेत  उदा.  मा.योगी आदित्य नाथ,मा.अरवींद केजरीवाल, मा.गणपतराव देशमुख. 

८०% सरकारी सेवक (नोकरदार)भ्रष्ट आहेत. २०% आपवाद उदा.तुकाराम मुंढे. संगीता ताई धायगुडे.  आरविंद जी केजरी वाल शासकीय सेवक असताना कधी हप्ते घेत  नव्हते. राजकीय सेवेतही स्वच्छ कारभार करत आहेत तसेच योगी आदित्यनाथ  सारखेही आहेत.बरेच शासकीय सेवक शासकीय सेवेत असताना  आयुष्य भर हप्ते गोळा करतात  त्या वेळेससमाज आठवत नाही.रिटायर झाल्यानंतर समाज  सेवेच्या नावाखाली वर्गणीच्या रूपात हप्ते  गोळा करून समाज सेवेचा बहाणा करतात हे समाजाचे दुर्भाग्य. कायद्यात काहीच पळवाट नसेल तर न्याय मिळतो अन्यथा न्याय मिळतच नाही हा आजचा अनुभव आहे.त्यामुळे राज्यातील जनतेने राजकीय, शासकीय सेवकांवर किती विश्वास ठेवायचा हे स्वानुभवातुनच ठरवावे. 

सध्या जे सर्व जातीच्या आरक्षण लढाया  चालू आहेत त्या सर्व लढायांचे नेते राजकीय सेवक आहेत. त्यांना  शासकीय सल्ले देणारे शासकीय सेवक आहेत. या सर्व जातीच्या आरक्षण लढाया ह्या सामाजिक राहिलेल्या  नसून राजकीय लढाया झालेल्या  आहेत. लोकशाहीत  पुढारी    आणि त्यांची वंशावळ राजे झाले.लोकशाहीत राजाची वशांवळ जातीयवादी झाली . लोकशाहीत जनता तलवार विसरून गेली आणि वैचारिक व राजकीय दृष्ट्या  नपुंसक झाली आहे. लोकशाहीत लोक लोकांच्या न्यायासाठी बौद्धिक हत्यारी बंड विसरून षंढ झाले आहेत. 

मला लोक विचारतात मराठा आरक्षण मिळणार का? मी एवढेच सांगेल जर  आरक्षण नेता राजकीय सेवक असेल तर तो लबाड बोलून झुलवत ठेवेल. जर केंद्र सरकरची इच्छा  शक्ती असेल तरच मराठा आरक्षण मिळेल अन्यथा नाही बाकी सर्व भूल थापा असतील. धनगर आरक्षण साठी मात्र अगोदर राज्य सरकार ची इच्छाशक्ती व नंतर केंद्र सरकरची राजकीय इच्छा शक्ती असेल तरच आरक्षण मिळेल बाकी सर्व भुल आणि थापा आहेत  राजकारण आहे. धनगर आरक्षणा साठी खूप मोठा सामाजिक व राजकीय संघटीत लढाई ची गरज आहे.अन्यथा धनगर आरक्षणाचे घोंगडे हवेतच राहील. धनगर जमातीच्या कार्यकर्ते नी राजकीय अभिलाषा न बाळगता घरावर तुळशी पात्र ठेवून लढा उभारला तरच धनगर जमातीच्या आरक्षणाच्या अशा पल्लवित होऊ शकतात अन्यथा नाही आणि नाहीच. अखेरचा धनगर आरक्षण लढा हा राजकीय प्रेरित होता त्याच्यात राजकीय अभिलाषा होती ती अभिलाषा  आता काही प्रमाणात पुर्ण झाली आहे.धनगर  जमाती साठी एक हजार कोटी आणि आदिवासीच्या २२ सवलती हा भाजपचा निवडणूक पूर्व व  निवडणूक अजेंडा होता,राजकीय जुमला होता.  पण ती हजार कोटीची भाजप सरकारची घोषणा ही या त्रिदल महाविकास अघाडी सरकारची नव्हती. त्यामुळे ते का राबवतील? आरक्षणाला छेद देऊन अनेक लोक हजार कोटी अस्तित्वात नसताना हजार  कोटीच्या वावड्या उडवत आहेत. हजार कोटीं म्हणजे बाजारात तुरी आणि ........ला....मारी?असेच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यानंतर धनगर जमात आजही  काही विषयात पारतंत्र्यात व गुलाम गिरीत आहे. स्वातंत्र्या नंतरचे सत्य एक म्हणजे स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी धनगर समाजासाठी स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण मिळवले.दुसरे राजकीय सत्य धनगर जमातीच्या सर्व सामाजिक व राजकीय नेत्यांनी सोलापूर विद्यापीठ  नाम विस्तार करून घेतला अर्थातच तत्कालीन कैबीनेट मंत्री राम शिंदे यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमीका बजावली आहे. ७५ वर्षांत धनगर जमाती साठी  सर्व पक्षीय शासनाने शुन्य अर्थिक तरतुद केली आहे.भाजप सरकार आरक्षण देण्याच्या  तयारीत होते पण देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशा अवस्थे मुळे आरक्षण बारगळले.(समाज नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ आडवा आला)पण आताचे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. प्रमोशन मधील आरक्षण रद्द केले,ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केले आहे . हाता तोडांतील आरक्षण हिरावून घेतले हे काय देणार आहेत? जे पाप सुध्दा देवू शकणार नाहीत त्यांच्या कडून पुण्य मिळेल याची अपेक्षा सोडून द्या.

राजकीय व शासकीय सेवक हे समाजाच्या  तिजोरीचे विश्वस्त व रक्षक असतात. आजच्या घडीला खूप कमी विश्वस्त आहेत. म्हणून सिस्टीम चालू आहे. सध्याचे सेवक म्हणतात 

जे जे आपणास ठावे I 

ते ते सर्व लपवावे I

सतत लुटत रहावे I

मुर्ख बनून सोडावे सकळ जण II

खरे विश्वस्त कोण आहेत हे जमातीने ओळखणे गरजेचे आहे. बरेच बौद्धिक लोक बाहेर वाजायला लागले की चाळ  बांधून नाचायला लागतात हे थांबणार कधी? 


तमसो माI ज्योतीर्गमये II.

आपले  एकमेव  अध्यात्मिक, धार्मिक, संत व्यासपीठ .

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

Tuesday, February 16, 2021

धनगर धर्मपिठा मार्फत लवकरच राज्यस्तरीय धर्म संसद.डॉ. अभिमन्यू टकले.

धनगर धर्म पिठा मार्फत लवकरच पहिली राज्य स्तरीय ऐतिहासिक धर्म संसद  होनार 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

तमाम महाराष्ट्र राज्यातील अध्यात्म,धर्म, क्षेत्रातील व धर्म प्रिय सज्जन व मान्यवरांना व धर्म पिठ पदाधिकारी, धर्म गुरू,अनुयायी, भक्त,संत, संत  साहित्यीक यांना कळवण्यास आंनद होत आहे की महाराष्ट्र राज्यात लवकरच  धर्म संसद आयोजित करवयाची आहे.धर्म म्हणजे सत्य.सत्याला कधी जात आणि धर्म नसतो.त्या प्रमाणे सर्व समावेशक धर्म संसद होनार आहे.

सध्याच्या युगात समाजाला योग्य दिशा देने,मार्गदर्शन करने,सज्जनांना एकत्र करने हे काम फक्त साहित्य संमेलन आणि धर्म या दोनच व्यासपीठावर होऊ शकते .या उलट समाजाला एखाद्या मुद्यावर भावनीक बनवून त्याचा स्वतःच्या पक्षासाठी व मतासाठी उपयोग करून फेकून देण्याचे काम राजकीय नेते करत असतात. बहुजन, ओबीसी यांना धर्मातही फक्त भक्त आणि देणगीदार दर्जा प्राप्त आहे.देशात जरी लोकशाही व घटनेचे राज्य असले तरी लोकांच्या मनावर धर्माचे राज्य आहे हे नकारून चालनार नाही.या मध्ये ८५%हिंदू हे ओबीसीं आहेत. यांना धर्म स्वातंत्र्य असले तरी व्यासपीठ मात्र कोणीही तयार केलेले नाही.त्या साठी आपण धनगर धर्मपिठ प्रभावी असे व्यासपीठ तयार केलेले आहे.अनेक धर्मपिठ आहेत पण त्यांचा सामान्य माणसाला काहीच उपयोग नाही. अनेक अरबो खरबोची देवस्थान आहेत पण ते फक्त देणग्या गोळा करुन एखादेअन्नछत्र व एखादे रूग्णालय चालवने या पलीकडे गेलेले नाहीत.जे जगात बहुसंख्य लोकांचे धर्म आहेत त्यांना जगभर राजाश्रय आहेत व आपल्या देशात ही राजाश्रय आहे.ते योग्यच  असले तरी हिदू धर्माला मात्र  जगात कोठेच राजाश्रय नाही.धर्म विद्यापीठ नाहीत.धर्म शिक्षण, संशोधन, प्रसारण नाही. धनगर आणि बहुजन समाजाचा जसा अडगळीत पडला  ईतिहास होता तो आपण साहित्य संमेलन माध्यमातून बाहेर काढला तसेच ही दैवतेही बाहेर  व्यासपीठावर आली पाहिजेत. हिदू धर्मा पासून प्रिंट मिडीया ही खूप दूर गेलेला आहे.

महाराष्ट्र ही संताची भूमी.तुकोडोजी महाराज, संत  गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर माउली,संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखा मेळा, संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज, संत बाळुमामा, संत जनाबाई, संत भगवान बाबा. संत गाडगे महाराज, संत कैकाडी महाराज,संत सावता महाराज. कितीतरी जमिनीवर चालून समाज प्रबोधन करणारी संत दैवते या राज्याच्या भूमीत होउन गेली. यांचे चांगभल  धनगर धर्मपिठा मार्फत झाले पाहिजे.

खंडोबा, बिरोबा,सिध्दोबा, महालिंगराया, म्हसोबा, बाबींरबुआ,  सोमलिंगराया, भूताळ सिध्द, चिचंणी मायाक्का, अशा अनेक या दैवतांचा धार्मिक इतिहास,बाहेर आला पाहिजे.लाखो लोकांच्या यात्रा ,जत्रा भरतात याचे सुयोग्य नियोजन झाले पाहिजे.अनेक धार्मिक ओव्या आहेत. हलमत नावाचा कन्नड मध्ये धर्म ग्रंथ आहे. हा मौलीक ठेवा, ही मौलीक धर्म संस्कृती आपण टिकवायला पाहीजे.वाईट कर्मकांड काढून टाकले पाहिजेत.सर्वात महत्वाचे धनगर आणि बहुजनांना एक चांगले धार्मिक व्यासपीठ मिळावे या साठी धर्म संसद झाली पाहीजे.बहुजनांच्या धर्माचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या सरकारच्या कानात सकारात्मक द्रुष्टीने घुमला पाहिजे.संत सज्जन एकत्र आली पाहिजेत तरच राज्यात आणि देशात एक चांगली समाज परिवर्तन करणारी व सुसंस्कृत पिढी घडवनारी चळवळ सुरू झाली पाहिजे.

शंकराचार्य नंतर आदर्श राज्य कारभार व आदर्श धर्म शिक्षण, धर्म संवर्धन, धर्म रक्षण,प्रसारण कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. त्यांचा वारसा सक्षम पणे  टिकवण्या साठी आपणाला या पालखीला खांदा द्यावा लागणार आहे.राज्यातील तमाम धर्म,अध्यात्म प्रिय जनांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हिंदू धर्माचा वारसा  टिकवण्या  साठी उत्कृष्ट धर्म कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी यादी तयारी करावी.महाराष्ट्र राज्यात 80%हिंदू धर्मीय आहेत तर 80%हिंदूचा व 20%अल्प संख्याक 20% अल्पसंख्याक धर्म  कार्य करणार्या संत, अनुयायांचा ही सन्मान करण्यात येईल.तसेच जे कोणी धर्म चर्चा सत्र,परिसंवाद या मध्ये भाग घेवू ईच्छीते त्यांनीही आपली नावे खालील पदाधिकारी यांच्या कडे द्यावेत.धनगर धर्म पिठ सर्व कर्तुत्वान लोकांसाठी खुले आहे.

संपर्क फोन नंबर 

१] श्री बापूसाहेब हटकर मुंबई. केंद्रीय अध्यक्ष. 7710020069. २]श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष नाशिक 

8208558546 

३]श्री प्रभाकर दिवनाले आकोला. विदर्भ धर्म गुरू. 

४]श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष. सातारा.9423827878

५]श्री ज्ञानेश्वर ढोमणे जिल्हाप्रमुख आमरावती 9423434223

६]श्री विठ्ठल सजगने सर   जि. अध्यक्ष.माणदेश. 9423828908

७]श्री प्रकाश कोळेकर जिल्हाध्यक्ष सोलापूर. 9970817591

८]डाॅ.मधुकर सलगरे सर  लातूर. धर्म गुरू मराठवाडा 9922245380

९] श्री सोमनाथ कर्णवर API मुंबई विभाग.9595114444

१०]डाॅ.विजय पाटील कोकण प्रमुख 9890730893

११] डाॅ. सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष पुणे.

१३]डाॅ.प्रविण सहावे नागपूर9326863318

लवकरच पिठ पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा करून , वेळ,स्थळ,चर्चा सत्र,परिसंवाद विषय, मुख्य अतिथी ठरवले जातील.यळकोट यळकोट जय मल्हार, हरहर महादेव,जय भवानी जय शिवशंकर च्या गर्जनेत पहिली धर्म संसद एकदम दणक्यात घेतली जाईल. धर्म संसद कशी असेल या वरतीही एक लेख लिहीला जाईल. 

आपलेच एक सर्वांच्या हक्काचे पहिले एकमेव राज्य स्तरीय व्यासपीठ धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य. आपल्या संस्कृती आणि धर्माचा अभिमान असेल तर धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या घराघरात  पोहचवा.अभिमान बाळगा  सर्व धर्म संस्कृती चा मुळ पुरूष धनगर आहे.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕


धनगर धर्मपिठा मार्फत राज्यस्तरीय धर्मसंसदेचे आयोजन-डॉ. अभिमन्यू टकले.

धनगर धर्म पिठा मार्फत लवकरच पहिली राज्य स्तरीय ऐतिहासिक धर्म संसद  होनार 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

तमाम महाराष्ट्र राज्यातील अध्यात्म,धर्म, क्षेत्रातील व धर्म प्रिय सज्जन व मान्यवरांना व धर्म पिठ पदाधिकारी, धर्म गुरू,अनुयायी, भक्त,संत, संत  साहित्यीक यांना कळवण्यास आंनद होत आहे की महाराष्ट्र राज्यात लवकरच  धर्म संसद आयोजित करवयाची आहे.धर्म म्हणजे सत्य.सत्याला कधी जात आणि धर्म नसतो.त्या प्रमाणे सर्व समावेशक धर्म संसद होनार आहे.

सध्याच्या युगात समाजाला योग्य दिशा देने,मार्गदर्शन करने,सज्जनांना एकत्र करने हे काम फक्त साहित्य संमेलन आणि धर्म या दोनच व्यासपीठावर होऊ शकते .या उलट समाजाला एखाद्या मुद्यावर भावनीक बनवून त्याचा स्वतःच्या पक्षासाठी व मतासाठी उपयोग करून फेकून देण्याचे काम राजकीय नेते करत असतात. बहुजन, ओबीसी यांना धर्मातही फक्त भक्त आणि देणगीदार दर्जा प्राप्त आहे.देशात जरी लोकशाही व घटनेचे राज्य असले तरी लोकांच्या मनावर धर्माचे राज्य आहे हे नकारून चालनार नाही.या मध्ये ८५%हिंदू हे ओबीसीं आहेत. यांना धर्म स्वातंत्र्य असले तरी व्यासपीठ मात्र कोणीही तयार केलेले नाही.त्या साठी आपण धनगर धर्मपिठ प्रभावी असे व्यासपीठ तयार केलेले आहे.अनेक धर्मपिठ आहेत पण त्यांचा सामान्य माणसाला काहीच उपयोग नाही. अनेक अरबो खरबोची देवस्थान आहेत पण ते फक्त देणग्या गोळा करुन एखादेअन्नछत्र व एखादे रूग्णालय चालवने या पलीकडे गेलेले नाहीत.जे जगात बहुसंख्य लोकांचे धर्म आहेत त्यांना जगभर राजाश्रय आहेत व आपल्या देशात ही राजाश्रय आहे.ते योग्यच  असले तरी हिदू धर्माला मात्र  जगात कोठेच राजाश्रय नाही.धर्म विद्यापीठ नाहीत.धर्म शिक्षण, संशोधन, प्रसारण नाही. धनगर आणि बहुजन समाजाचा जसा अडगळीत पडला  ईतिहास होता तो आपण साहित्य संमेलन माध्यमातून बाहेर काढला तसेच ही दैवतेही बाहेर  व्यासपीठावर आली पाहिजेत. हिदू धर्मा पासून प्रिंट मिडीया ही खूप दूर गेलेला आहे.

महाराष्ट्र ही संताची भूमी.तुकोडोजी महाराज, संत  गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर माउली,संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखा मेळा, संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज, संत बाळुमामा, संत जनाबाई, संत भगवान बाबा. संत गाडगे महाराज, संत कैकाडी महाराज,संत सावता महाराज. कितीतरी जमिनीवर चालून समाज प्रबोधन करणारी संत दैवते या राज्याच्या भूमीत होउन गेली. यांचे चांगभल  धनगर धर्मपिठा मार्फत झाले पाहिजे.

खंडोबा, बिरोबा,सिध्दोबा, महालिंगराया, म्हसोबा, बाबींरबुआ,  सोमलिंगराया, भूताळ सिध्द, चिचंणी मायाक्का, अशा अनेक या दैवतांचा धार्मिक इतिहास,बाहेर आला पाहिजे.लाखो लोकांच्या यात्रा ,जत्रा भरतात याचे सुयोग्य नियोजन झाले पाहिजे.अनेक धार्मिक ओव्या आहेत. हलमत नावाचा कन्नड मध्ये धर्म ग्रंथ आहे. हा मौलीक ठेवा, ही मौलीक धर्म संस्कृती आपण टिकवायला पाहीजे.वाईट कर्मकांड काढून टाकले पाहिजेत.सर्वात महत्वाचे धनगर आणि बहुजनांना एक चांगले धार्मिक व्यासपीठ मिळावे या साठी धर्म संसद झाली पाहीजे.बहुजनांच्या धर्माचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या सरकारच्या कानात सकारात्मक द्रुष्टीने घुमला पाहिजे.संत सज्जन एकत्र आली पाहिजेत तरच राज्यात आणि देशात एक चांगली समाज परिवर्तन करणारी व सुसंस्कृत पिढी घडवनारी चळवळ सुरू झाली पाहिजे.

शंकराचार्य नंतर आदर्श राज्य कारभार व आदर्श धर्म शिक्षण, धर्म संवर्धन, धर्म रक्षण,प्रसारण कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. त्यांचा वारसा सक्षम पणे  टिकवण्या साठी आपणाला या पालखीला खांदा द्यावा लागणार आहे.राज्यातील तमाम धर्म,अध्यात्म प्रिय जनांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हिंदू धर्माचा वारसा  टिकवण्या  साठी उत्कृष्ट धर्म कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी यादी तयारी करावी.महाराष्ट्र राज्यात 80%हिंदू धर्मीय आहेत तर 80%हिंदूचा व 20%अल्प संख्याक 20% अल्पसंख्याक धर्म  कार्य करणार्या संत, अनुयायांचा ही सन्मान करण्यात येईल.तसेच जे कोणी धर्म चर्चा सत्र,परिसंवाद या मध्ये भाग घेवू ईच्छीते त्यांनीही आपली नावे खालील पदाधिकारी यांच्या कडे द्यावेत.धनगर धर्म पिठ सर्व कर्तुत्वान लोकांसाठी खुले आहे.

संपर्क फोन नंबर 

१] श्री बापूसाहेब हटकर मुंबई. केंद्रीय अध्यक्ष. 7710020069. २]श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष नाशिक 

8208558546 

३]श्री प्रभाकर दिवनाले आकोला. विदर्भ धर्म गुरू. 

४]श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष. सातारा.9423827878

५]श्री ज्ञानेश्वर ढोमणे जिल्हाप्रमुख आमरावती 9423434223

६]श्री विठ्ठल सजगने सर   जि. अध्यक्ष.माणदेश. 9423828908

७]श्री प्रकाश कोळेकर जिल्हाध्यक्ष सोलापूर. 9970817591

८]डाॅ.मधुकर सलगरे सर  लातूर. धर्म गुरू मराठवाडा 9922245380

९] श्री सोमनाथ कर्णवर API मुंबई विभाग.9595114444

१०]डाॅ.विजय पाटील कोकण प्रमुख 9890730893

११] डाॅ. सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष पुणे.

१३]डाॅ.प्रविण सहावे नागपूर9326863318

लवकरच पिठ पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा करून , वेळ,स्थळ,चर्चा सत्र,परिसंवाद विषय, मुख्य अतिथी ठरवले जातील.यळकोट यळकोट जय मल्हार, हरहर महादेव,जय भवानी जय शिवशंकर च्या गर्जनेत पहिली धर्म संसद एकदम दणक्यात घेतली जाईल. धर्म संसद कशी असेल या वरतीही एक लेख लिहीला जाईल. 

आपलेच एक सर्वांच्या हक्काचे पहिले एकमेव राज्य स्तरीय व्यासपीठ धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य. आपल्या संस्कृती आणि धर्माचा अभिमान असेल तर धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या घराघरात  पोहचवा.अभिमान बाळगा  सर्व धर्म संस्कृती चा मुळ पुरूष धनगर आहे.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕


Thursday, February 11, 2021

धर्मपिठाचे राज्य संघटक पदी माजी.डि.वाय.एस.पि.केशवराव पातोंड यांची तर अमरावती जिल्हा संघटक म्हणून प्राध्यापक संजय अघडते यांची निवड.




🕉️या रे या लहान थोर,येथे कुणी नाही लहान नर-झेंडा धर्मपिठाचा घेतला खांदयावर🕉️

      🌹राज्य संघटक म्हणून माजी डि.वाय.एस.पि.श्री.केशवराव पातोंड यांची निवड🌹

    धर्मपिठाच्या माध्यमातून समाजातील सुशिक्षित ,विचारवंत, समाजसेवी आणि परोपकारी वृत्तीचे  बांधव एकत्र येउन हा समाज विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सरसावत आहेत.संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले व केंद्रीय अध्यक्ष मा.बापूसाहेब हटकर यांच्या सल्याने अशीच एक महत्त्वाची निवड म्हणजे  मा.केशवराव पातोंड यांची धर्मपिठाच्या राज्य संघटक पदी निवड.

परिचय🌹 श्री.केशवराव पातोंड अकोला हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत (डि.वाय.एस.पी.),उच्च शिक्षित असून उत्कृष्ट कामकाजासाठी शासनाने व समाजाने त्यांचा गौरव केला आहे.चंद्रपुर गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त प्रदेशात त्यांनी सेवा देवून देशसेवा केलेली आहे,त्याप्रदेशातील गुन्हेगारांना वठणीवर आणून सज्जनांचे रक्षण केले आहे,गुन्हेगारांचे समुपदेशन करून मत परिवर्तन केले आहे.औरंगाबाद, चाळीसगाव परिसरात नोकरी करत असतांना नोकरी सोबतच समाजसेवेत मोठे योगदान दिले आहे.चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे कार्यरत असतांना त्यांच्या पुढाकाराने समाजाचे सुव्यवस्थित असे मंगल कार्यालय उभे राहले आहे जे उल्लेखनीय आहे,प्रशंसनिय आहे.

  मा.पातोंड साहेब चांगले वक्ते असून त्या माध्यमातून त्यांनी समाज जोडला आहे त्याचा फायदा धर्मपिठाला समाजप्रबोधन, शिक्षण व समाज विकासात नक्कीच होणार आहे.


🌹प्रा.संजय अघडते-अमरावती जिल्हा संघटक म्हणून निवड.

    आजची दुसरी महत्त्वाची निवड म्हणजे प्रा.श्री.संजय अघडते सरांची अमरावती जिल्हा संघटक म्हणून निवड. प्रा.संजय अघडते सर दर्यापूर जि.अमरावती येथे विद्यार्जनाचे काम करत असून त्यांना समाजसेवेची आवड आहे,  विद्वतांचा मोठा गोतावळा त्यांच्या सोबत आहे.परिसरातील   समाजबांधवांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा नेहमी लाभ होत असतो.


वरील विद्वजनांनी धर्मपिठाचे सामाजिक विकासाचे मिशन व व्हिजन स्विकारुन  ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचे ठरवले आहे,त्यांना या समाजकार्यात शुभेच्छा🌹


✍️विनायक काळदाते

    कार्यध्यक्ष

   ✍️ ह.भ.प.प्रभाकर दिवनाले

   धर्मगुरु

✍️प्रा.एल.डी.सरोदे

  प्रसिद्धी प्रमुख(विदर्भ)


Monday, February 1, 2021

धर्मपिठाची आँनलाईन मिटिंग दि.31 जानेवारी 2021 रोजी संपन्न.







✍️धर्मपिठ आँनलाईन मिटिंग दि.31/01/2021वृतांत. 📚


🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹



    समाज  शिक्षण,प्रबोधन संघटन,धर्मसंवर्धन व यामधून सर्वांगीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत झालेल्या धर्मपिठाचे कामकाज मागील तिन चार महिन्यात वेगाने पुढे जात आहे.

  समाजातील विचारवंताची मांदीयाळी धर्मपिठा मध्ये पहायला मिळत आहे,यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, पत्रकार, संतमडळी,शेतकरी, व्यावसायिक,गृहिणी  ई.सामील झाल्या आहेत,होत आहेत.

   कोविद-19व लाँकडाउनमुळे सर्व संपर्क मोबाईल व सोशलमेडीयाच्या माध्यमातून साधल्या जात असतांना सुद्धा धर्मपिठाची पताका सोलापूर ते नागपूर फडकवण्यात यश आले.


 धर्मपिठाच्या वेगवेगळ्या प्रदेशातील पदाधिकाऱ्यांची एकमेकांसोबत ओळख व्हावी, चर्चा व्हावी या हेतूने दि.31जानेवारी2021 रोजी संध्या.8वा. धर्म पिठाची आँनलाईन मिटिंग केंद्रिय अध्यक्ष मा.  बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सर्व प्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली.

   संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले यांनी प्रवासातच मिटिंग मध्ये सहभाग नोंदवला व पदाधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले.मा.हटकरसाहेबांनी धर्मपिठाची आवश्यकता, महत्त्व व गरज याबद्दल सविस्तर माहिती दिली तर डॉ टकले यांनी धर्मपिठाचे व्हिजन व मिशन सांगितले.श्री ज्ञानेश्वरजी ढोमने यांनी सभेचे सुत्रसंचालन केले.


कार्यध्यक्ष विनायक काळदाते, महिला आघाडी राज्य अध्यक्ष सौ.ढोमने ताई, विदर्भ संघटक श्री.गोपाळभाऊ गावंडे,विदर्भ धर्मगुरु ह.भ.प.दिवनाले महाराज, ह.भ.प.कोल्हे महाराज, ह.भ.प.घोंगे महाराज, ह.भ.प.कचरे महाराज,ह.भ.प. घोडस्कर महाराज, ह.भ.प.पुनसे महाराज, रंजनाताई गांजे , शशिकलाताई सरगर,सिमाताई धुमाळ ,मंजुषाताई चामटे , सुलोचनाताई कारिकंटे (मेहत्रे) ,आर. पि. कूवर साहेब,राजेश दिवनाले सर यांनी सभेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला.विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी विदर्भात प्रादेशिक स्तरावर संतसभा घेण्याची कल्पना मांडली, त्याला संस्थापक अध्यक्षांनी अनुमोदन दिले. केंद्रीय अध्यक्षांनी दर आठवड्याला आँनलाईन सत्संग घेण्याची कल्पना मांडली त्याला पदाधिकारी व संतमडळीने सकारात्मक प्रतिसाद दिला.ह.भ प.कोल्हे महाराजांनी संतमडळींना धोरण प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज वर्तवली.ह.भ प.घोंगे महाराजांनी तरुणांमध्ये धर्म प्रचारासाठी,आवड निर्माण करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची  विनंती केली. सलगर ताई यांनी धर्म पिठाचे व्हिजन व मिशन असलेले पत्रक उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

   श्री.ढोमने साहेबांनी आभार प्रदर्शन करून मिटिंगची सांगता केली.


✍️विनायक काळदाते

      कार्यध्यक्ष

    धनगर धर्मपिठ.

    दि.01/02/2021


🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹


समाजसेविका सौ.मिनाताई होपळ यांची धर्मपिठ महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष पदी निवड.

🕉️🛕🔯धर्मपिठ महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष पदी समाजसेविका सौ.मिनाताई होपळ यांची निवड🕉️🛕🔯🛕🕉️🌹🕉️🌹


   समाज प्रबोधन,शिक्षण, समाजसेवा या माध्यमातून सर्वागीण समाज विकास साधन्याचे धोरण,मिशन व व्हिजन असलेल्या धर्मपिठात समाजातील उत्कृष्ट समाजसेवक,समाजसेविका सहभागी होत आहेत. शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, डॉक्टर, पत्रकार, महिला ,जेष्ठ नागरिक ,तरुण सामिल होत आहेत ही धर्मपिठाच्या पारदर्शक धोरणाची पावतीच आहे.

धर्मपिठाची महिला आघाडी सुद्धा आपल्या कार्यसहभागाने धर्मपिठाच्या कामकाजात नेहमी अग्रेसर असते.


🌹सौ.मिनाताई होपळ यांची महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष

निवड🌹

   मागील बारा तेरा वर्षांपासून अकोट जि.अकोला येथे डिसेंबर महिन्यात आयोजित होत असलेल्या वधूवर परिचय मेळाव्याचे नियोजनात सिंहाचा वाटा असलेल्या सौ.मिनाताई होपळ ह्या मेळाव्याचे बॅक आँफिसच म्हणावे लागेल.

  दरवर्षी निराधार विद्यार्थ्यांना व वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना आपल्या घरी एक दिवस घरी मुक्कामी आणून, त्यांना घरपण देण्याचे समाजकार्य सुद्धा त्यांच्या नावावर आहे.लाँकडाउन काळात सर्वत्र रोजगार थांबलेले असतांना सौ.मिनाताई होपळ यांनी परिसरातील दिव्यांग कुटुंबाना आपल्या स्त्रीधनातून मदत केली.

आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मा.श्री.रामदासजी होपळ सर यांच्या अर्धांगिनी असलेल्या सौ.मिनाताई श्रीयुत सरांच्या यशात त्यांच्या पाठीमागे सशक्त पणे उभ्या असतात.सौ.मिनाताई    आपले यजमान श्री.होपळ सर यांच्या जि.प.शाळेत सुट्टी च्या दिवशी जाऊन शाळा सुशोभित करतात जेणे करून विद्यार्थ्यांना शाळेत आनंद वाटेल.त्यांनी पुर्णवेळ निस्वार्थ समाजसेवेला वाहून घेतले आहे.

सौ.मिनाताई होपळ यांची धर्मपिठ महिला आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी झालेली निवड धर्मपिठाचे कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी फार मोलाची ठरणार आहे,त्यांना आपल्या कार्यात शुभेच्छा🌹

✍️सौ.शारदाताई ढोमने

   धर्मपिठ महिला राज्य अध्यक्ष.

 रेश्मा ठोंबरे

प्रसिद्धी प्रमुख


🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹




Friday, January 29, 2021

धनगर जमातीच्या चळवळी संपवनारे संपले पाहिजेत हेच कै.बि.के.कोकरे यांनाअभिवादन-डॉ. अभिमन्यू टकले.

धनगर जमातीच्या चळवळी संपवणारे संपले पाहिजेत हेच कै.बि के कोकरे यांना अभिवादन 

प्रा. डाॅ.अभिमन्यु टकले 

🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️धनगर जमातीच्या प्रमाणीक चळवळी संपवणारे संपले पाहिजेत हेच माझे कै. बापूसाहेब कोकरे यांना विनम्र अभिवादन. 

श्री बापूसाहेब कोकरे यांनी धनगर समाजाच्या समाज कारणाची लोकशाहीतील पहिली चळवळ १९८८ ला सुरू केली.या संघटनेचे नाव यशवंत सेना का? तर महाराजा यशवंतराव होळकर , शाहू महाराजांच्या मुलगा यशवंत, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुत्र यशवंत यांच्या नावाने यशवंत सेना काढण्यात आली. श्री अनिल कुमार  वाघे सोलापूर हे पहिले यशवंत सेनेचे सचिव. मी २००३ते२००४ या काळात श्री अर्जुन दादा सलगर बरोबर दोन्ही नेत्यांच्या घरी जाऊन आलो आहे. यशवंत सेना व हे नेते कसे संपवले? का संपवले? कोणी संपवले?याची उत्तरे शोधली? यशवंत सेना धनगर जमातीच्या लोकांनीच सुपारी घेऊन संपवली.दोन्ही नेते विषाणू जन्य जैविक अस्त्र वापरून नष्ट केले. आगोदर वाघे वारले. नतंर कै.बी के कोकरे यांना नष्ट केले.

यशवंत सेना स्थापनेत श्री पांडुरंग गडदे मास्तर  मुंबई यांचा मोठा वाटा होता.गडदे मास्तर मुंबई चे अध्यक्ष होते.श्री राजू जांगळे कोकण चे अध्यक्ष होते.श्रीरंग वाघमोडे लोखंडी जथा विभाग अध्यक्ष होते.तर श्री बापूसाहेब हटकर हे सरचिटणीस मुंबई होते.

कै बापूसाहेब यांनी समाज सेवेची डरकाळी फोडली होती आणि महाराष्ट्राची राजकीय गादी थरथरली होती.१९९०ला पंढरपूर आरक्षण मेळावा जाहीर झाला.आषाढी कार्तिकी  यात्रा नसताना पंढरपूर यात्रा भरली. कै.बापूसाहेब कोकरे चा ताबा शत्रुने घेतला होता.बापूसाहेबांना थम्स  अप मध्ये मद्य घालून पाजले जात होते. बाहेर धनगर जमातीच्या घोषणा चालू होत्या.बापूसाहेब स्टेज वर हडभडत आले आणि एकच वाक्य बोलले यशवंत सेना काँग्रेस मध्ये विलीन करत आहे. नतंर धनगर जमातीला एन टी २आरक्षण मिळाले. बापूसाहेबाना विषाणू जन्य जैविक आजार निर्माण केला गेला होता. जबरदस्ती खिशात पैसे कोंबले होते. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जा तेथेच नोकरी कर परत आला तर बघून घेवू  म्हणून बापूसाहेब महाराष्ट्र राज्यातून हाकलून लावले. बापूसाहेब परत ससून रुग्णालय पुणे येथे उपचार घेत घेत समाजासाठी शहीद झाले, शेवटची मदत श्री अर्जुन दादा सलगर आणि श्री महादेव जी जानकर यांनी केली.

आज आरक्षणामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी, डाॅ.ईजिंनियर, प्रशासकीय अधिकारी झाले आहेत.पण आपल्याला सवलत का मिळाली हे विसरून कुटुंबात रममाण होऊन आयुष्याचे भौतिक भोग घेत आहेत. 

अनेक ग्रामपंचायत, झेडपी सदस्य या सवलती घेत आहेत. पण आपल्या आईवडील व्यतिरिक्त आपल्या साठी कोणीतरी झगडले आहेत बळी गेलेले आहेत, आयुष्याचा यज्ञ करून स्वत:ची आहुती दिली आहे हे का विसरता? चांगल्या चळवळी संपवण्या साठी आजही प्रस्थापित नालायक लोकांकडून सुपारी घेतली जाते आणि चळवळी संपवल्या जातात. आपलेच लोक चिरीमिरी घेवून बंड करतात आणि चळवळी संपवतात. कै.बापूसाहेब कोकरे चे वादळ दोन तीन वर्षात च संपवण्यात आले.मेळाव्या नतंर बापूसाहेब कोकरेचें काय झाले त्याचा शोध जमातीने का नाही घेतला? त्यांचा शोध घेवून मदत का नाही केली? आजही बापूसाहेब कोकरेच्यां नावाने राज्यात अनेक सामाजिक दुकाने थाटण्यात आली आहेत.विठोजी रावांना पेशव्यांनी हलहल करून मारून टाकले त्याचा बदला म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांनी पुणे जाळून टाकले होते व हाडे उरूळी कांचन पर्यंत पसरली होती. पेशवे कोकणात पळून गेले होते.पण बीके कोकरेंचे बलिदान मात्र आजही प्रस्थापितांच्या बिमोडाची वाट पहात आहे.धनगर समाजाच्या चळवळींची अवस्था काशीला निघालेल्या  कुत्र्यां सारखीे झाली आहे.  मालकांचा आदेश पाळण्या साठी प्रमाणीक पणे टुकड्यावर जगणारी कुत्री ईतर कुत्र्यांना आपला ईलाका ओलांडून देत नाहीत अशी अवस्था आहे.सध्याच्या सर्व सामाजीक राजकीय चळवळी फक्त आणि फक्त आरक्षणाच्या नावावर चालू आहेत. या सर्वाना माहीती आहे आरक्षण मिळणार नाही .तरीही आरक्षणाच्या नावावर कोणी पैसे कमावून हात धुतले,कोणी आमदार खासदार होऊन हात धुतले.काही राजकीय पक्ष सत्तेत आले.धनगर समाज मात्र राजकीय, सामाजिक, अर्थिक, मानसिक रित्या गिरणीत  दळला जात आहे.हे थांबले पाहिजे.धनगर जमातीला आरक्षण कसे  मिळेल यावरती यांच्याकडे खरे उत्तर नाही. कलयुगात सत्य व धर्म एकटेच  निंदा, नालस्ती,आपमान, कष्ट, अन्याय सहन करत असते .या उलट अधर्माचे ,असत्याचे सर्व सोबती आणि संगती असतात. पण लक्षात  ठेवा सत्य परेशान हो सकता है पराजित नही.

मराठा समाजाच्या आरक्षणा साठी आण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले त्यांच्या नावाने महामंडळ सुरू झाले,अनेक संस्था स्मारक स्थापन झाल्या पण बि के चा बदला घेणे सोडा आपण व मी एखाद्या चौकात फोटो पुतळा,स्मारक उभा करू शकलो नाही? कसा समाज सुधारणार? बि के चा इतिहास बाहेर आला पाहिजे या साठी साहित्य संमेलनात त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला.त्यांची प्रतीमा  पहिल्या साहित्य संमेलनात प्रथम दर्शनी ठेवण्यात आली. यशवंत  सेना सेना पतींचा पुरस्कार देऊन गौरवही केला. या निमीत्ताने मला एकच सांगायचे आहे ज्यांनी ज्यांनी जमातीला, आरक्षण, राजकीय, सामाजिक, अर्थीक रित्या फसवले आहे व  चांगल्या चळवळी संपवण्या साठी सुपार्या घेणार्या विषारी सापांना वेळीच ठेचले पाहिजे तरच समाजाचे हित आहे.बि के कोकरे यांच्या नावाने एखादे मध्यवर्ती स्थळ पाहून पुतळा उभा करावा व दरवर्षी या ठिकाणी त्यांना अभिवादन करावे.होळकर घरण्याने देशाचे राजकारण केले.पण बि के कोकरे नी फक्त धनगर जमाती साठी बलिदान दिले.त्यांचा पुतळा एका व्यक्तीकडून, गावाकडून, उभा करू नये तर त्यांचे काम राज्यासाठी होते.राज्याने उभा करावा.बि के ची जिवंत असताना लोकांनी काळजी घेतली नाही. जमातीने आता तरी सावध व्हावे चांगल्या चळवळी संपवनारे, चांगल्या लोकावर भुंकणारे, सुपार्या घेवून जमातीला संपवनारे संपले पाहिजेत. कै.बापूसाहेब कोकरे साहेब तुमच बलिदान व्यर्थ जाणार नाही आम्ही एकत्र येत आहोत, शूर आहोत, षंड नाहीत.आम्ही विठोजीचे बलिदान विसरलो नाहीत. आमच्या विरंगना तुरूंगात टाकून ठार मारल्या हे ही विसरलो नाहीत. बापूसाहेबांची चळवळ कपटाने संपवली आहे व बापूसाहेबांना कपट करून मारलेले आहे हे ही विसरलो नाहीत.तुमच्या बलिदानचे विचार आमच्या मनात आले तरी आमची तळपायाची आग मस्तकात जाते पण लोकशाहीने कायद्याने आमचे  हात बांधले आहेत. आम्ही आपले घरातले बाहेरचे शत्रु संयम,शांतता, बुध्दी,एकता यांनी अप्रत्यक्ष  रित्या नक्कीच ठेचू तुमच राहीलेले कार्य  पुरे करू हीच आमची तुम्हाला विनम्र आदरांजली विनम्र अभिवादन 

जय मल्हार 

हर हर महादेव 

प्रा.डाॅ.अभिमन्यु टकले 

संस्थापक 

धनगर धर्म पिठ 

आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐♟️💐💐💐💐💐💐💐💐💐


Monday, January 25, 2021

धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल श्री.गोपाळभाऊ गावंडे यांचा अकोला येथे सत्कार.

🕉️🌹धर्मपिठ विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल मा.गोपाळभाऊ गावंडे यांचा अकोला येथे सत्कार🕉️🌹


   समाज शिक्षण,प्रबोधनातून  सर्वांगीण समाज विकास साधन्याचे व्हिजन व मिशन असलेल्या धर्मपिठामध्ये  शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, ईजिनिअर,व्यावसायिक, नोकरदार सामिल होऊन समाज विकासात योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत.

  धर्मपिठाच्या विदर्भ संघटक पदी अशाच उच्च शिक्षित, तरुण,बांधकाम व्यावसायिक असलेल्या श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची निवड करण्यात आली.

  श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल अकोला येथे त्यांच्या मित्रमंडळ व हितचिंतकांकडून  मा.आ.हरिदासजी भदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  मा.जि.प.सदस्य श्री.दिनकरराव नागे,डॉ. पातुर्डे,नितीन गव्हाळे,संजय गाडगे,श्री बाळासाहेब खराटे,मनोज करणकार,दिपक नागे,देवानंद नवलकार,दिपक पातोंड,यशवंत नागे,सचिन बचे व समाजबांधव उपस्थित होते.


Sunday, January 24, 2021

आदरणीय रुक्मिणीताई गलांडे,ACP यांना धर्मपिठाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 आदरणीय रुक्मिणीताई गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂

धनगर धर्मपिठ

महाराष्ट्र राज्य.


Saturday, January 23, 2021

उपवासाचे फायदे आणी तोटे-डॉ. पुजा सहावे/डॉ.प्रविण सहावे.धर्मपिठ नागपूर शहर अध्यक्ष.

🚩आज एकादशी आहे🚩


उपवासाचे फायदे (Benefits Of Fasting)

उपवासाचे फायदे हे घरामध्ये सुख शांतीसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास करायला हवा. उपवासाने नक्की काय फायदे होतात हे आपण खाली वाचूया - 


1. उपवासामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते (Fasting Helps The Body To Detox)

बऱ्याचदा बाहेर जेवल्याने तेल आणि मसाल्याचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून  टाकणं गरजेचं आहे. यामुळे फक्त पोटासंबंधी नाही तर त्वचेच्या समस्याही या टॉक्झिन्समुळे सुरू होतात. त्यामुळे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढून टाकायला हवा. अशा स्थितीत उपवास केल्यास, तुम्ही खाद्यपदार्थांऐवजी शुद्ध पेय अर्थात फळांचा रस,  लस्सी आणि ताक असे पदार्थ पिण्याने शरीर डिटॉक्झिफाय करू शकता. यामुळे त्वचेसंबंधी समस्या कमी होण्यास सुरूवात होते. 


2. वजन कमी करण्यासाठी उपवास (Helps To Loose Weight)

वजन कमी करण्यासाठी उपवास


अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना वजन जास्त असण्याची समस्या आहे. तुम्ही वजन वाढवण्याकडे वेळेवर लक्ष द्यायला हवं. कारण नंतर हे शारीरिक दृष्टीने अधिक त्रासदायक ठरू शकतं. तसं तर वजन कमी करण्यासाठी उपवास हा चांगला पर्याय ठरू शकतो. इंटमिटेंट फास्टिंग हा सध्याचा ट्रेंड आहे. ज्याबद्दल आम्ही तुम्हाला वरही सांगितलं आहे. उपवास वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 


3. पचनक्रियेसाठी उपवासाचे फायदे (Benefits of Fasting For Digestion)

बऱ्याच लोकांना पचनक्रियेची समस्या असते. अशावेळी उपवास करणं फायद्याचं ठरतं. तुमची पचनक्रिया उपवासामुळे चांगली होते. उपवासाने शरीराचं पचनयंत्र व्यवस्थित काम करतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीर आजारांशी स्वतः लढा देण्यास समर्थ होतं. एका अभ्यासानुसार 62.33% लोकांना उपवासादरम्यान अपचनाची समस्या झाली नाहीये तर 27% लोकांची अपचनाची समस्या ठीक झाली आहे. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते. 


4. रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास (Fasting Relieves Blood Pressure)

 रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास - Benefits Of Fasting In Marathi


जसजशी जाडेपणाची समस्या वाढते, तसतशी शारीरिक समस्या वाढते आणि रक्तदाबाची समस्या ही त्यापैकीच एक आहे. रक्तदाबाची समस्या ही आजकाल तरूणपणातही होऊ लागली आहे. अशावेळी याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, उच्च रक्तदाबापासून उपवास तुम्हाला नक्कीच सुटका करून देऊ शकतो. तुम्ही जर साधारण 8 तासाचा उपवास केलात तर तुम्हाला लाभदायी ठरू शकतो. यामुळे तुमची उच्च रक्तदाबाची समस्या बऱ्याच अंशी बरी होते. तसंच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. 


5. कोलेस्ट्रॉल होतं कमी (Cholesterol Reduces)

तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपवास केलात तर यामुळे तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा तुमच्यापासून अनेक आजाराही दूर होऊ लागतात. लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल हा आजारही येतो. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ हा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. तसंच यामुळे तुमच्या हृदयावरही परिणाम होत असतो. पण तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास केलात तर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणं सोपं होतं. उपवासाच्या वेळी एचडीएल अर्थात चांगल्या कॉलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते. 


6. त्वचा होते अधिक सुंदर (Skin Becomes Beautiful)

त्वचा होते अधिक सुंदर - Benefits Of Fasting In Marathi


बऱ्याचदा क्रिम आणि इतर सौंदर्यप्रसाधनं नाहीत तर तुमच्या खाण्यातील बदलानेही त्वचा अधिक सुंदर होते. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण आणा असं नेहमी सांगण्यात येतं. जास्त तेल आणि मसाल्याचं खाणं तुम्ही खाल्ल्यास, तुम्हाला चेहऱ्यावर अधिक त्रास होतो त्याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स येणं आणि काळे डाग निर्माण होणं हादेखील होतो. उपवास ठेवल्याने तुमचं शरीर डिटॉक्झिफाय होतं आणि त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम तुमची त्वचा अधिक चमकदार आणि चांगली होण्यावर होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात तेव्हा त्वचा अधिक चमकदार होते. तसंच उपवासामध्ये तुम्ही अधिक पौष्टिक खाता आणि फळांवर अथवा फळांच्या रसावर भर देता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होते. फळांचा रस पिणं हे अतिशय शुद्ध असून त्वचेवर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. 


7. मानसिक आणि भावनात्मक लाभासाठी उपवास (Fasting For Mental And Emotional Benefits)

उपवासाचा परिणाम हा केवळ शारीरिक आरोग्यावर होतो असं नाही, त्याचा मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. उपवास करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता लागते. तुमच्या एकाग्रतेवर चांगला परिणाम होऊन कामात अधिक लक्षही लागतं. सुस्ती कमी होते. कामाकडे लक्ष केंद्रित करता येतं. तसंच सतत चिंता आणि तणाव असेल ज्यामुळे झोप येत नसेल तर उपवासाने आणि उपवासात योग्य खाण्याने तुम्हाला चांगली झोपही येते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी जर झेपत असेल तर शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास करणं चांगलं आहे. 


8. उपवासाने वय वाढतं (Fasting Increases Your Age)

आपण सतत काही ना काहीतर चुकीचे अन्नपदार्थ पोटात घालवत राहतो. त्याचा परिणाम  शरीरावर होऊन अनेक आजार निर्माण होतात. पण हे थांवबण्यासाठी आणि शरीराचं पचन आणि शरीराचं तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण उपवास करायला हवा. त्यामुळे तुमचं वय वाढतं. योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुमचं वय निश्चितच वाढतं. कारण उपवासाच्या वेळी आपण शरीराला आवश्यक तितकाच आहार घेतो. अरबट चरबट खात नाही. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. 


9. मेटाबॉलिजममध्ये होते वाढ (Increase In Metabolism)

उपवास म्हटलं की, आपण कधीही जास्त खात नाही. सहसा खाणं टाळतो. केवळ फळं आणि फळांचा रस अथवा तत्सम पदार्थांवर लक्ष देत असतो. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होऊन तुमच्या मेटाबॉलिजममध्येदेखील वाढ होते. तुमची शारीरिक ऊर्जा योग्य प्रमाणात राखून अतिरिक्त टॉक्झिन्स शरीरातून बाहेर फेकले जातात. त्यामुळेच शरीरामध्ये मेटाबॉलिजम वाढतं. 


आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे 'आरोग्यदायी पदार्थ'


10. प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ (Increase In Immunity)

कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. उपवासाचा हा एक फायदा होतो तो म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. उपवास केल्याने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर फेकली जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही योग्य स्वरूपात उपवास करायला हवा. उपवास करायचा म्हणजे दिवसभर केवळ पाण्यावर राहायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा असा अर्थ होत नाही. नियमित काही तासांनी फळं खाऊन अथवा पाणी पिऊन त्याप्रमाणे उपवास केल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 


11. पिंपल्सपासून मिळते सुटका (Reduces Pimples)

पिंपल्सपासून मिळते सुटका


उपवासाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच आहे. त्याता सर्वात जास्त परिणाम हा चेहऱ्यावर पिंपल्स येण्यात होत असतो. पण तुम्ही नियमितपणे उपवास केलात आणि खाण्यापिण्याचं योग्य प्रमाण पाळून तिखट आणि तेलकट पदार्थ कमी केलेत तर तुम्हाला नक्कीच पिंपल्सपासून सुटका मिळते. उपवासाने हा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक येण्यासाठीही उपवास फायदेशीर ठरतो. 


12. हृदयासाठी अप्रितम (Good For The Heart)

हृदयासाठी अप्रितम


सतत खात राहण्याने कॉलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याचा थेट परिणाम होतो तो हृदयावर. पण तुम्हाला हृदयरोगांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही योग्यरित्या उपवास करायला हवा. तुमच्या हृदयावर कोणताही दाब न येता अनेक समस्यांपासून  तुम्ही दूर राहू शकता. उपवासामध्ये तुम्ही केवळ जलपदार्थ अथवा केवळ शरीराला आवश्यक आहेत तेच पदार्थ खाता. त्यामुळे हृदयात कॉलेस्ट्रॉलचा धोकाही टळतो. तसंच हृदयासाठी उपवास करणं चांगलं ठरू शकतकं.  


उपवासाच्या वेळी काय खायला हवं? (What To Eat During Fasting)

उपवासाच्या वेळी काय खायला 


तुम्ही कोणत्या प्रकारचा उपवास करत आहात त्यानुसार तुम्ही काय खायला हवं ते अवलंबून आहे. आम्ही तुम्हाला इथे काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत सांगणार आहोत ज्याचं सेवन उपवासादरम्यान तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे उपवासादरम्यान तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तुम्ही पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर तुम्ही आंशिक उपवासापासून सुरूवात करा. यामध्ये तुम्हाला काही वेळेसाठी काही अन्नपदार्थांपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. या वेळेत तुम्ही फळ, फळांचा रस अथवा हल्केफुल्के पदार्थ खा. ज्याप्रमाणे - 


उपवासादरम्यान तळलेले पदार्थ सेवन करू नका

रसदार फळांचं सेवन करा

तुम्ही नेहमी ड्रायफ्रूट्सचं सेवन करा

दूध प्या

फळांचा रस तुम्ही प्या

तुम्ही मीठ खाणार नसलात तर तुम्ही हिरव्या भाज्या मीठाशिवाय उकडवून खा

तुम्ही निर्जला उपवास करत असाल तर तुम्ही दूध पिऊ शकता. तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही कॉफी अथवा चहा पिऊ शकता. मात्र असं करत असल्यास, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला जर अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी पिऊ नका


नोट - तुम्हाला वर जे पदार्थ सांगण्यात आले आहेत ते उपवास करणाऱ्या व्यक्तीनुसार बदलू शकता. हे  तुम्हाला पर्यायी पदार्थ म्हणून आम्ही सांगितले आहेत. 


उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य


उपवासादरम्यान तुम्ही काय टाळायला हवं (What To Avoid During Fasting)

तुम्ही उपवास हा तुमच्या आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी करणार असता. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला उपवासाच्या दरम्यान टाळायला हव्यात. 


उपवासापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची आणि शरीराची योग्य तयारी करा. वजन कमी करण्यासाठी उपवास करणं आणि धार्मिक उपवास करण्यामध्ये खूपच अंतर असतं. दोन्हीसाठी तुम्हाला तुमचं मन आणि शरीर तयार करावं लागतं. तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीसाठी उपवास करणार आहात हे तुमच्या मनात निश्चित करून घ्या. उपवास करताना तुमच्या रोजच्या कामातही काही फरक पडू शकतो याकडे नीट लक्ष द्या. 

तुम्ही पहिल्यांदाच उपवास करत असाल तर तुम्ही वेळ कमी ठेवा. जास्त वेळेसाठी तुम्ही लगेच उपवास करू नका

उपवास करण्यापूर्वी तुम्ही योग्य आणि पौष्टिक जेवण करा. जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दरम्यान कोणताही त्रास होणार नाही. लक्षात ठेवा की, एकाच वेळी जास्त खाऊ नका. या जेवणात तुम्ही उपवासाचे थालीपीठदेखील खाऊ शकता.

उपवासाच्या दरम्यान जास्त कठीण व्यायाम अथवा जास्त वेळ व्यायाम करू नका कारण या दरम्यान तुमच्या शरीराला अधिक एनर्जीची गरज असते आणि व्यायाम केल्यास, अधिक ऊर्जा जाते. त्यामुळे तुम्हाला अधिक थकवा येण्याची शक्यता निर्माण होते. 

तुम्हाला जर आरोग्यासंबंधी काही समस्या असतील अथवा कोणत्याही प्रकारचं औषध तुम्ही घेत असलात तर उपवास करणं टाळा

उपवासादरम्यान पोष्टीक गोष्टींचं सेवन जास्त करा - उदाहरणार्थ - फळ, फळांचा रस, दूध इत्यादी

उपवासानंतर खूप भूक लागणं साहजिक आहे. पण अशावेळी उपवास सोडताना अति आहार घेणं शक्यतो टाळा. संतुलित प्रमाणात तुम्ही आहार घ्या

उपवास केल्याने काय होतं नुकसान (Side Effects Of Fasting)

तुम्हाला उपवासाने होणारे फायदे तर कळलेच आहेत. पण उपवासाचे काही तोटेही आहेत. आपण त्याबद्दलही जाणून घेऊया - 


तुम्ही उपवासादरम्यान योग्य पौष्टिक तत्वयुक्त खाद्यपदार्थांचं सेवन न केल्यास, तुम्हाला डिहायड्रेशन,  चक्कर आणि थकव्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात

तुम्हाला जास्त कालावधीसाठी उपवास करायचा असल्यास, तुम्हाला एनिमिया होण्याची शक्यता असते

उपवासानंतर तुम्ही जर लगेच खाल्लं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या निर्माण होऊन त्रास होतो

काही लोकांना उपाशी राहिल्यास भूक सहन होत नाही आणि चिडचिडेपणा वाढतो अथवा रागाचं प्रमाण वाढतं

जास्त काळ उपाशी राहिल्यास डोकेदुखी अथवा अन्य काही आजार होण्याची शक्यता असते

उपवासाचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. तोट्यांपेक्षा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त फायदा होतो. पण तुम्ही जास्त काळासाठी उपवास करू नये हा सल्लादेखील आम्ही तुम्हाला नक्कीच देत आहोत. कारण याचा तुमच्या शरीरावर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो. उपवासाचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पाणी,  ज्युस आणि फळांचं सेवन कराल.


धर्मपिठ विदर्भ धर्मगुरू ह.भ.प.प्रभाकरराव दिवनाले यांचे कडून शुभेच्छा.

.

🚩🕉️ हार्दिक अभिनंदन🌹

                मा. विनायकरावजी काळदाते साहेब यांची नुकतीच धनगर धर्मपीठाचे कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

                मा. काळदाते साहेबांचा तसा बऱ्याच दिवसांपासून धर्मपीठाशी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संबंध आला . परंतु 10 आक्टो.2020 ला त्यांची धनगर धर्मपीठाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची काम करण्याची हातोटी, संघटनात्मक कौशल्य  व समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित वर्गाला धर्मपीठा कडे आकर्षण करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना राज्य संघटक म्हणून पदभार सांभाळण्यास सांगण्यात आले त्यानुसार त्यांनी आपली यशस्वी कारकीर्द पार पाडली .

               अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या काळदाते साहेबांच्या कामाची धर्मपिठाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अभिमन्यु टकले साहेब , केंद्रीय अध्यक्ष बापूसाहेब हटकर  यांनी कामाची दखल घेत त्यांना नुकतेच कार्याध्यक्ष पद बहाल केले .

             काळदाते साहेब मूळचे सिंदखेड मोरेश्वर जि.अकोला, (विदर्भ)येथील रहिवाशी असून अकोलेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे . त्यांच्या शब्दाला मान म्हणून त्यांचे शिफारसी वरून सौ. शारदाताई ढोमणे यांची धनगर धर्मपीठाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.


               महिला आघाडीचे राज्याचे अध्यक्ष पद व धर्मपीठाचे कार्याध्यक्ष पद विदर्भाला लाभले ही बाब विदर्भासाठी भुषणावह आहेच सोबत अभिमानास्पद सुद्धा आहे.

              त्यांच्या मार्गदर्शनाखाली , संघटनात्मक कार्य आणखी पुढे जाईल याची आम्हास खात्री आहे .

               कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन . त्यांच्यावर धर्मपीठाने टाकलेली जबाबदारी निश्चितच पार पाडतील .


प्रभाकर दिवनाले

       धर्मगुरु

विदर्भ प्रदेश


🕉️🔯🕉️🔯🕉️🔯🕉️🔯


🙏🙏 धन्यवाद🙏🙏


धर्मपिठ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.कचरे महाराज यांचेकडून नवनियुक्त कार्यध्यक्ष यांना शुभेच्छा.


आदरणीय श्री विनायकराव काळदाते सर आपली कार्य अध्यक्ष धर्मपीठ महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती झाली आहे करीताआपल मी आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो 🌹👏🏼

जयगुरु 

जय 

ल्हा

🙏🏽🚩⛳👏🏼

आपला नम्र 

रमेश कचरे फुबगांव 

धनगर धर्म पीठ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष 

 धन्यवाद सर

🌹👏🏼🌾🚩🌹👏🏼✒️

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...