🕉️धनगर धर्म पिठ महिला आघाडी नांदेड जिल्ह्याची धुरा सौ.सुलोचनाताई मेहत्रे यांच्या खांदयावर🕉️
समाज प्रबोधन, शिक्षण,संघटन यामधून समाजाचा सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने समाजातील विचारवंत,उच्च शिक्षित, आध्यात्मिक मंडळींनी हाती घेतलेली चळवळ म्हणजे धर्म पिठ.नेतृत्वा ऐवजी प्रचारकाची भुमिका घेत समाजातील अनेक विचारवंत हा समाजविकासाचा झेंडा खांद्यावर घेत आहेत. "साता जन्माची ही लाभली पुण्याई-म्हणूनी जाहलो पालखीचे भोई"या उक्तीप्रमाणे समाजविकासाची ही पालखी वाहण्यासाठी अनेक जन पुढे येत आहेत.
नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष
परिचय-नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून सौ.सुलोचनाताई कारिकंटे (मेहत्रे)देगलूर जि.नांदेड यांची निवड संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले व महिला आघाडी राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांनी केली आहे.
सौ.सुलोचनाताई मेहत्रे ह्या
M.A.BEd
M.A.sociology
M.A.english
अशा उच्च शिक्षित असून गृहिणी आहेत.त्यांना समाजसेवेची आवड असून समाजविकासाची तळमळ आहे. साहित्य क्षेत्रात रुची आहे,त्या कविता सुद्धा करतात.
धर्म पिठाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे समाजसेवेचे काम अजून उभारी घेईल सोबतच त्यांना साहित्य संमेलनात सहभाग नोंदवून साहित्य सेवा सुद्धा करता येईल.
सौ.सुलोचनाताई यांच्या हातून धर्म पिठाच्या माध्यमातून उत्तरोत्तर समाजसेवा घडो ह्या शुभेच्छा.🌹
सौ.सुलोचनाताई कारिंकटे(मेहत्रे)9420115648
✍️विनायक काळदाते
राज्य संघटक.
रेश्मा ठोंबरे
प्रसिद्धी प्रमुख.
सर्व पदाधिकारी धर्म पिठ.

No comments:
Post a Comment