Saturday, January 16, 2021

धर्म पिठात अहिल्येच्या कन्यांची घोडदौड.


🕉️🚴‍♀️🕉️🚴‍♀️🕉️🚴‍♀️🕉️

धर्म पीठ महिला आघाडीची घोडदौड सुरुच🕉️🕉️🕉️🕉️


    धनगर धर्म पीठामध्ये अहिल्या कन्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षिका, समाजसेविका,पत्रकार,गृहिणी धर्म पीठाच्या कार्यात सहभागी होत आहेत. सोलापूर ते नागपूर अहिल्येच्या कन्यांची साखळी तयार होउन समाजविकासाच्या चळवळीत सामिल होत आहेत.


महिला आघाडी राज्यधक्ष सौ.शारदाताई ढोमने ह्या संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेब व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. गावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या महाराष्ट्रातील स्त्री शक्तीची मोट बांधत आहेत.नेमणूकीचा झंझावात आता खालील नेमणूकी द्वारे परभणी, हिंगोली,  अहमदनगर,लातूर पर्यंत पोहचला आहे.

🌹रेखाताई बोमशेटे यांची निवड धर्म पीठ महिला आघाडीच्या परभणी जिल्हा अध्यक्ष म्हणून झाली आहे.सौ.बोमशेटे ताई शिक्षिका असून समाजकार्यात अग्रेसर आहेत.


🌹सिंधूताई तिडके यांची धर्म पीठाच्या  हिंगोली जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.ग्रामीण भागात उत्कृष्ट महिला संघटन असलेल्या सिंधूताईंना धर्म पीठाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने त्यांचे समाज संघटन व प्रबोधन अजून जोमात होणार आहे.


🌹मिनाताई बाचकर यांची धर्म पीठाच्या अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.सौ.बाचकर ताईंचे कुटुंब नगर जिल्ह्यात समाजसेवेत अग्रेसर असुन त्यांचे पती श्री.शरदराव बाचकर,जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष असुन  तसेच ऊद्योजक आहेत. त्याचा वसा ताई धर्म पीठाच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत.


🌹छायाताई मोटेगांवकर यांची धर्म पीठाच्या लातूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.सौ.छायाताई शिक्षिका असून समाज कार्याची त्यांना आवड आहे.

वरील सर्व अहिल्येच्या कन्या धर्म पीठाची पताका खांद्यावर घेऊन समाजाच्या सर्वागीण विकासामध्ये आपले योगदान देण्याचा प्रयत्न करुन  धर्म पीठाची पताका महाराष्ट्रभर फडकवतील असा ठाम विश्वास आहे.


✍️विनायक काळदाते,

     राज्य संघटक.

📚रेश्मा ठोबरे

     प्रसिद्धी प्रमुख.

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...