🚩आज एकादशी आहे🚩
उपवासाचे फायदे (Benefits Of Fasting)
उपवासाचे फायदे हे घरामध्ये सुख शांतीसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास करायला हवा. उपवासाने नक्की काय फायदे होतात हे आपण खाली वाचूया -
1. उपवासामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते (Fasting Helps The Body To Detox)
बऱ्याचदा बाहेर जेवल्याने तेल आणि मसाल्याचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून टाकणं गरजेचं आहे. यामुळे फक्त पोटासंबंधी नाही तर त्वचेच्या समस्याही या टॉक्झिन्समुळे सुरू होतात. त्यामुळे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढून टाकायला हवा. अशा स्थितीत उपवास केल्यास, तुम्ही खाद्यपदार्थांऐवजी शुद्ध पेय अर्थात फळांचा रस, लस्सी आणि ताक असे पदार्थ पिण्याने शरीर डिटॉक्झिफाय करू शकता. यामुळे त्वचेसंबंधी समस्या कमी होण्यास सुरूवात होते.
2. वजन कमी करण्यासाठी उपवास (Helps To Loose Weight)
वजन कमी करण्यासाठी उपवास
अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना वजन जास्त असण्याची समस्या आहे. तुम्ही वजन वाढवण्याकडे वेळेवर लक्ष द्यायला हवं. कारण नंतर हे शारीरिक दृष्टीने अधिक त्रासदायक ठरू शकतं. तसं तर वजन कमी करण्यासाठी उपवास हा चांगला पर्याय ठरू शकतो. इंटमिटेंट फास्टिंग हा सध्याचा ट्रेंड आहे. ज्याबद्दल आम्ही तुम्हाला वरही सांगितलं आहे. उपवास वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
3. पचनक्रियेसाठी उपवासाचे फायदे (Benefits of Fasting For Digestion)
बऱ्याच लोकांना पचनक्रियेची समस्या असते. अशावेळी उपवास करणं फायद्याचं ठरतं. तुमची पचनक्रिया उपवासामुळे चांगली होते. उपवासाने शरीराचं पचनयंत्र व्यवस्थित काम करतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीर आजारांशी स्वतः लढा देण्यास समर्थ होतं. एका अभ्यासानुसार 62.33% लोकांना उपवासादरम्यान अपचनाची समस्या झाली नाहीये तर 27% लोकांची अपचनाची समस्या ठीक झाली आहे. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते.
4. रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास (Fasting Relieves Blood Pressure)
रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास - Benefits Of Fasting In Marathi
जसजशी जाडेपणाची समस्या वाढते, तसतशी शारीरिक समस्या वाढते आणि रक्तदाबाची समस्या ही त्यापैकीच एक आहे. रक्तदाबाची समस्या ही आजकाल तरूणपणातही होऊ लागली आहे. अशावेळी याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, उच्च रक्तदाबापासून उपवास तुम्हाला नक्कीच सुटका करून देऊ शकतो. तुम्ही जर साधारण 8 तासाचा उपवास केलात तर तुम्हाला लाभदायी ठरू शकतो. यामुळे तुमची उच्च रक्तदाबाची समस्या बऱ्याच अंशी बरी होते. तसंच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.
5. कोलेस्ट्रॉल होतं कमी (Cholesterol Reduces)
तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपवास केलात तर यामुळे तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा तुमच्यापासून अनेक आजाराही दूर होऊ लागतात. लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल हा आजारही येतो. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ हा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. तसंच यामुळे तुमच्या हृदयावरही परिणाम होत असतो. पण तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास केलात तर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणं सोपं होतं. उपवासाच्या वेळी एचडीएल अर्थात चांगल्या कॉलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते.
6. त्वचा होते अधिक सुंदर (Skin Becomes Beautiful)
त्वचा होते अधिक सुंदर - Benefits Of Fasting In Marathi
बऱ्याचदा क्रिम आणि इतर सौंदर्यप्रसाधनं नाहीत तर तुमच्या खाण्यातील बदलानेही त्वचा अधिक सुंदर होते. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण आणा असं नेहमी सांगण्यात येतं. जास्त तेल आणि मसाल्याचं खाणं तुम्ही खाल्ल्यास, तुम्हाला चेहऱ्यावर अधिक त्रास होतो त्याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स येणं आणि काळे डाग निर्माण होणं हादेखील होतो. उपवास ठेवल्याने तुमचं शरीर डिटॉक्झिफाय होतं आणि त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम तुमची त्वचा अधिक चमकदार आणि चांगली होण्यावर होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात तेव्हा त्वचा अधिक चमकदार होते. तसंच उपवासामध्ये तुम्ही अधिक पौष्टिक खाता आणि फळांवर अथवा फळांच्या रसावर भर देता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होते. फळांचा रस पिणं हे अतिशय शुद्ध असून त्वचेवर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो.
7. मानसिक आणि भावनात्मक लाभासाठी उपवास (Fasting For Mental And Emotional Benefits)
उपवासाचा परिणाम हा केवळ शारीरिक आरोग्यावर होतो असं नाही, त्याचा मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. उपवास करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता लागते. तुमच्या एकाग्रतेवर चांगला परिणाम होऊन कामात अधिक लक्षही लागतं. सुस्ती कमी होते. कामाकडे लक्ष केंद्रित करता येतं. तसंच सतत चिंता आणि तणाव असेल ज्यामुळे झोप येत नसेल तर उपवासाने आणि उपवासात योग्य खाण्याने तुम्हाला चांगली झोपही येते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी जर झेपत असेल तर शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास करणं चांगलं आहे.
8. उपवासाने वय वाढतं (Fasting Increases Your Age)
आपण सतत काही ना काहीतर चुकीचे अन्नपदार्थ पोटात घालवत राहतो. त्याचा परिणाम शरीरावर होऊन अनेक आजार निर्माण होतात. पण हे थांवबण्यासाठी आणि शरीराचं पचन आणि शरीराचं तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण उपवास करायला हवा. त्यामुळे तुमचं वय वाढतं. योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुमचं वय निश्चितच वाढतं. कारण उपवासाच्या वेळी आपण शरीराला आवश्यक तितकाच आहार घेतो. अरबट चरबट खात नाही. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
9. मेटाबॉलिजममध्ये होते वाढ (Increase In Metabolism)
उपवास म्हटलं की, आपण कधीही जास्त खात नाही. सहसा खाणं टाळतो. केवळ फळं आणि फळांचा रस अथवा तत्सम पदार्थांवर लक्ष देत असतो. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होऊन तुमच्या मेटाबॉलिजममध्येदेखील वाढ होते. तुमची शारीरिक ऊर्जा योग्य प्रमाणात राखून अतिरिक्त टॉक्झिन्स शरीरातून बाहेर फेकले जातात. त्यामुळेच शरीरामध्ये मेटाबॉलिजम वाढतं.
आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे 'आरोग्यदायी पदार्थ'
10. प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ (Increase In Immunity)
कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. उपवासाचा हा एक फायदा होतो तो म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. उपवास केल्याने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर फेकली जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही योग्य स्वरूपात उपवास करायला हवा. उपवास करायचा म्हणजे दिवसभर केवळ पाण्यावर राहायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा असा अर्थ होत नाही. नियमित काही तासांनी फळं खाऊन अथवा पाणी पिऊन त्याप्रमाणे उपवास केल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
11. पिंपल्सपासून मिळते सुटका (Reduces Pimples)
पिंपल्सपासून मिळते सुटका
उपवासाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच आहे. त्याता सर्वात जास्त परिणाम हा चेहऱ्यावर पिंपल्स येण्यात होत असतो. पण तुम्ही नियमितपणे उपवास केलात आणि खाण्यापिण्याचं योग्य प्रमाण पाळून तिखट आणि तेलकट पदार्थ कमी केलेत तर तुम्हाला नक्कीच पिंपल्सपासून सुटका मिळते. उपवासाने हा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक येण्यासाठीही उपवास फायदेशीर ठरतो.
12. हृदयासाठी अप्रितम (Good For The Heart)
हृदयासाठी अप्रितम
सतत खात राहण्याने कॉलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याचा थेट परिणाम होतो तो हृदयावर. पण तुम्हाला हृदयरोगांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही योग्यरित्या उपवास करायला हवा. तुमच्या हृदयावर कोणताही दाब न येता अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता. उपवासामध्ये तुम्ही केवळ जलपदार्थ अथवा केवळ शरीराला आवश्यक आहेत तेच पदार्थ खाता. त्यामुळे हृदयात कॉलेस्ट्रॉलचा धोकाही टळतो. तसंच हृदयासाठी उपवास करणं चांगलं ठरू शकतकं.
उपवासाच्या वेळी काय खायला हवं? (What To Eat During Fasting)
उपवासाच्या वेळी काय खायला
तुम्ही कोणत्या प्रकारचा उपवास करत आहात त्यानुसार तुम्ही काय खायला हवं ते अवलंबून आहे. आम्ही तुम्हाला इथे काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत सांगणार आहोत ज्याचं सेवन उपवासादरम्यान तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे उपवासादरम्यान तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तुम्ही पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर तुम्ही आंशिक उपवासापासून सुरूवात करा. यामध्ये तुम्हाला काही वेळेसाठी काही अन्नपदार्थांपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. या वेळेत तुम्ही फळ, फळांचा रस अथवा हल्केफुल्के पदार्थ खा. ज्याप्रमाणे -
उपवासादरम्यान तळलेले पदार्थ सेवन करू नका
रसदार फळांचं सेवन करा
तुम्ही नेहमी ड्रायफ्रूट्सचं सेवन करा
दूध प्या
फळांचा रस तुम्ही प्या
तुम्ही मीठ खाणार नसलात तर तुम्ही हिरव्या भाज्या मीठाशिवाय उकडवून खा
तुम्ही निर्जला उपवास करत असाल तर तुम्ही दूध पिऊ शकता. तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही कॉफी अथवा चहा पिऊ शकता. मात्र असं करत असल्यास, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला जर अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी पिऊ नका
नोट - तुम्हाला वर जे पदार्थ सांगण्यात आले आहेत ते उपवास करणाऱ्या व्यक्तीनुसार बदलू शकता. हे तुम्हाला पर्यायी पदार्थ म्हणून आम्ही सांगितले आहेत.
उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य
उपवासादरम्यान तुम्ही काय टाळायला हवं (What To Avoid During Fasting)
तुम्ही उपवास हा तुमच्या आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी करणार असता. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला उपवासाच्या दरम्यान टाळायला हव्यात.
उपवासापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची आणि शरीराची योग्य तयारी करा. वजन कमी करण्यासाठी उपवास करणं आणि धार्मिक उपवास करण्यामध्ये खूपच अंतर असतं. दोन्हीसाठी तुम्हाला तुमचं मन आणि शरीर तयार करावं लागतं. तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीसाठी उपवास करणार आहात हे तुमच्या मनात निश्चित करून घ्या. उपवास करताना तुमच्या रोजच्या कामातही काही फरक पडू शकतो याकडे नीट लक्ष द्या.
तुम्ही पहिल्यांदाच उपवास करत असाल तर तुम्ही वेळ कमी ठेवा. जास्त वेळेसाठी तुम्ही लगेच उपवास करू नका
उपवास करण्यापूर्वी तुम्ही योग्य आणि पौष्टिक जेवण करा. जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दरम्यान कोणताही त्रास होणार नाही. लक्षात ठेवा की, एकाच वेळी जास्त खाऊ नका. या जेवणात तुम्ही उपवासाचे थालीपीठदेखील खाऊ शकता.
उपवासाच्या दरम्यान जास्त कठीण व्यायाम अथवा जास्त वेळ व्यायाम करू नका कारण या दरम्यान तुमच्या शरीराला अधिक एनर्जीची गरज असते आणि व्यायाम केल्यास, अधिक ऊर्जा जाते. त्यामुळे तुम्हाला अधिक थकवा येण्याची शक्यता निर्माण होते.
तुम्हाला जर आरोग्यासंबंधी काही समस्या असतील अथवा कोणत्याही प्रकारचं औषध तुम्ही घेत असलात तर उपवास करणं टाळा
उपवासादरम्यान पोष्टीक गोष्टींचं सेवन जास्त करा - उदाहरणार्थ - फळ, फळांचा रस, दूध इत्यादी
उपवासानंतर खूप भूक लागणं साहजिक आहे. पण अशावेळी उपवास सोडताना अति आहार घेणं शक्यतो टाळा. संतुलित प्रमाणात तुम्ही आहार घ्या
उपवास केल्याने काय होतं नुकसान (Side Effects Of Fasting)
तुम्हाला उपवासाने होणारे फायदे तर कळलेच आहेत. पण उपवासाचे काही तोटेही आहेत. आपण त्याबद्दलही जाणून घेऊया -
तुम्ही उपवासादरम्यान योग्य पौष्टिक तत्वयुक्त खाद्यपदार्थांचं सेवन न केल्यास, तुम्हाला डिहायड्रेशन, चक्कर आणि थकव्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात
तुम्हाला जास्त कालावधीसाठी उपवास करायचा असल्यास, तुम्हाला एनिमिया होण्याची शक्यता असते
उपवासानंतर तुम्ही जर लगेच खाल्लं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या निर्माण होऊन त्रास होतो
काही लोकांना उपाशी राहिल्यास भूक सहन होत नाही आणि चिडचिडेपणा वाढतो अथवा रागाचं प्रमाण वाढतं
जास्त काळ उपाशी राहिल्यास डोकेदुखी अथवा अन्य काही आजार होण्याची शक्यता असते
उपवासाचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. तोट्यांपेक्षा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त फायदा होतो. पण तुम्ही जास्त काळासाठी उपवास करू नये हा सल्लादेखील आम्ही तुम्हाला नक्कीच देत आहोत. कारण याचा तुमच्या शरीरावर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो. उपवासाचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पाणी, ज्युस आणि फळांचं सेवन कराल.

No comments:
Post a Comment