Sunday, January 17, 2021

प्रा.सरोदे(पत्रकार)यांची विदर्भ प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड.

🕉️🛕🛕धर्म पिठ प्रचार व प्रसाराचा झेंडा प्रा.एल.डी.सरोदे(पत्रकार) यांच्या खांद्यावर🕉️🛕🛕


  ✍️आधी केले मग सांगितले या समर्थ उक्तीप्रमाणे धर्म पिठ आपले समाज प्रबोधनाचे कामकाज पुढे घेऊन जात आहे.

समाज शिक्षण,प्रबोधन व समाज विकास असे सर्व मान्य उद्देश व धोरणे असलेले धर्म पिठ ही एक अराजकीय समाज चळवळ म्हणून पुढे येत आहे.

समाजातील  नागपूर ते सोलापूर डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक,पत्रकार, शिक्षक, शेतकरी, महिला, पुरुष, नोकरदार, जेष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत.

  धर्मपिठाच्या या चळवळीला प्रिंट मेडीया व सोशल मेडीयावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.धर्म पिठाच्या या लोककार्याचा प्रचार व प्रसाराची धुरा कुणीतरी खांद्यावर घेणे आवश्यक आहे.

  वरील उद्देशाने विदर्भ प्रदेशाकरीता प्रा.एल.डी.सरोदे (पत्रकार)यांची धर्म पिठाने प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड केली आहे.श्री.सरोदे साहेब हे उच्च शिक्षित असून हाडाचे पत्रकार, लेखक व विश्लेषक आहेत.त्यांना समाजसेवेची आवड असून समाजविकासाची तळमळ आहे.

श्री.सरोदे साहेब यांच्या प्रसिद्धी प्रमुख या पदावर निवड झाल्यामुळे धर्म पिठाचे कार्य समाजापर्यंत पोहचवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.


✍️ विनायक काळदाते

      राज्य सघंटक

      प्रभाकर दिवनाले

     विदर्भ धर्म गुरु, धर्म पिठ.


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...