Sunday, January 17, 2021

धर्मपिठ हा जगन्नाथाचा रथ-बापूसाहेब हटकर.

🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️

                           *धनगर धर्म पीठ*

        *आध्यात्मिक विचार आणि महिला नेतृत्व*

             *नव वर्षाच्या शुभेच्छा आणि अपेक्षा*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           शिक्षण, साहित्य, संस्कार आणि आध्यात्म हे माणसाला ईतर प्राण्यापासून वेगळं करत, माणसाला स्वयंभू, स्वयंसिद्ध बनवतात. धनगर समाज आजही विकासाच्या वाटेवरून चाचपडत चालला आहे. इतरांपेक्षा खूप मागे राहिला आहे. तो सुसंस्कारित नेतृत्वाच्या अभावी मागे पडला आहे. त्याला शिक्षण, संस्कार आणि आध्यात्मातून स्वयंसिद्ध करून इतरां सोबत स्पर्धेत कसा विजयी करता येईल हे शिक्षण आम्ही त्याला देणार आहोत. हेच मुख्य कार्य आहे धनगर धर्म पिठाचे. त्यातूनच निस्वार्थी दमदार नेतृत्व उभे राहिल आणि समाज विकासाच्या दिशेने झेपावेल. 

        छ शिवाजी महाराजानी स्वराज्य निर्माण केले. बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी त्याचा विस्तार करून साम्राज्य उभे केले,

*शिव वरदान मिळाले।मराठा साम्राज्य उभारले।।*

*शिव छत्रपती रचिले पाया।जेणे उभारले देवालया।।*

*बाजी तयाचा किंकर।तेणे विस्तारले आवार।।*

*मल्हार योद्धा सुभेदार।झेंडे फडकविले अटकेपार।।*

*अहिल्या झालीसे सबला।तिने धर्म चालविला।।*

*हर हर  गर्जे सारा देश।यशवंत झालासे कळस।।*

        ई स 1674 मध्ये छ शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि रीतसर मराठा राज्य निर्माण झाले. पुढे बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी त्याचे साम्राज्यात रूपांतर केलं. ते राज्य 1818 पर्यंत अबाधित होत. या 144 वर्षाच्या कारकिर्दीत मराठेशाहीत अनेक शासक होऊन गेले. कधी छत्रपतिच्या हातात सत्ता होती, कधी पेशवे, कधी होळकर तर कधी शिंदे शासक होते. या सर्वात उत्तम प्रशाक या अहिल्यादेवी होळकर होत्या. त्या मराठेशाहीच लेण होत्या. त्या या सर्वांच्या मुकुटमणी होत्या. त्यांनी सर्वोत्कृष्ट लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. त्यांच्या कार्याचा डंका आशिया आणि युरोप खंडात वाजले. दोन्ही ठिकाणच्या ईतिहासकारानी अहिल्यादेवींचे गोडवे गायले आहेत. स्त्री शक्ती काय असते ते अहिल्यादेवीच्या कर्तृत्वातून सिद्ध होत आहे. तेच आता आपल्याला पुन्हा वास्तवात उतरावयाचे आहे. त्यासाठी धनगर धर्म पीठ कटीबद्ध आहे.

        अहिल्यादेवीच्या कार्याला आध्यात्म आणि धर्माची बैठक होती. त्यातूनच त्यांनी मानवी मूल्य जपली. त्यांच्या काळात ज्या प्रकारचा मानवतावाद होता त्यातील सर्वोच्च मूल्य त्यांनी जपली म्हणून तर काशीच्या धर्म पीठाने त्यांना पुण्यश्लोक ही किताबत बहाल केली. 

         आता आधुनिक काळात, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे स्त्रियांना खुली केली त्यातून असंख्य माता भगिनी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचल्या. त्यातीलच मातांनी समाज हिताची सूत्र हातात घेतली. समाज आध्यात्मातून स्वयं प्रकाशित करावा या हेतूने धनगर धर्म पिठाच्या कार्यात अहिल्या कन्या मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. धर्म पीठातील 50% पद आपण माता बघिनीसाठी आरक्षित ठेवत आहोत. 

       70 वर्ष पुरुषी नेतृत्वाखाली आपण काम केले. त्यातून काही साध्य झालं नाही. एक बी के कोकरेचा अपवाद वगळता कोणीच काही केले नाही. त्यामुळे आता माता भगिनींना नेतृत्वास्थानी बरोबरीचा वाटा देऊन आध्यात्मातून माणूस आत्मनिर्भर करावा. केवळ पुरुषी नेतृत्वावर विसंबून न रहाता स्त्री पुरुषांनी समसमान वाटा घ्यावा ही धर्म पिठाची ईच्छा आहे. आजच्या घडीला तरी माता भगिनी पुरुषांपेक्षा दोन पावलं पुढे आहेत. 

             साहित्य आणि आध्यात्म ही माणसाला जनावरा पासून वेगळं करतात. त्यातून समाजाचा शाश्वत आणि चिरंतन विकास घडवून आणतात. माणसाला पैशा बरोबरच अध्यात्माची आणि साहित्याची जोड हवी. हे डॉ अभिमन्यू टकले यांनी बरोबर हेरलं आणि राजकारण सोडून त्यांनी आदिवासी धनगर साहित्य परिषद आणि धनगर धर्म पीठ याची स्थापना केली. आता पर्यंत तीन साहित्य संमेलन उत्कृष्टपणे पार पडली. आता धर्म पिठाचे कार्य सुरू केले आहे. त्यात अनेक मान्यवरांचा उत्कृष्ट सहभाग आहे. त्यांची श्रेय नामावली आम्ही वेळच्या वेळी जाहीर करीतच असतो. मी वर म्हटल्याप्रमाणे अत्यंत उच्च विद्या विभूषित महिला वर्ग यात सामील होत आहे. हा शुभ शकुन आहे.

        आम्ही धनगर धर्म पिठासाठी वर्गणी मागत नाही. मत मागत नाही. त्याची आम्हाला गरजही नाही. तरी काही मंडळी उगाच घाबरली आहे. त्यांना भीती वाटते की, आपली दुकान बंद पडतील. त्या भीती पोटी तें समाजात गैरसमज पसरवत आहेत. मी गेली चाळीस वर्षे समाज सेवा केली आहे. एक पैशाची वर्गणी मागितली नाही की, गर्दी जमवून सत्तेतील पदे मिळविली नाहीत. समाजाची निरपेक्ष सेवा करणे हे माझं ध्येय आहे. 

       आज पर्यंत डॉ अभिमन्यू टकले यांनी कोणताही गैर  व्यवहार केला नाही. पुढे करतील अस वाटत नाही. त्यांच्या हातून काही चूक घडली तर धर्म पीठ सोडणार मी पहिला माणूस असेन.

      कोणी काहीही म्हटलं तरी अफवावर विश्वास ठेवू नका. धनगर धर्म पीठ हा धनगर विकासाचा जगन्नाथाचा रथ आहे. तो सर्वानी ओढू या समाजाचं कल्याण साधू या. हीच धनगर धर्म पिठाची नवीन वर्षातील घोषणा!

🕉️👩🏻‍🦱🙏🏻👩🏻‍🦱🕉️ बापू हटकर

                          केंद्रीय अध्यक्ष

                         धनगर धर्म पीठ

🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️👩🏻‍🦱🕉️


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...