Sunday, January 17, 2021

धर्मपिठाची धर्मपरिषदेकडे वाटचाल.

धनगर धर्म पिठाची धर्म परिषदे कडे दमदार वाटचल 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯ऋतस्य यथा प्रेत. 

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ धर्म रक्षित रक्षित:🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ धनगर धर्म पिठाची घोषणा सोसेल मिडीयात तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली.अनपेक्षित पणे धर्म पिठ मुंबई ते कोल्हापूर व कोल्हापूर ते नागपूर असे महाराष्ट्र एक्सप्रेसच्या गतीने पसरले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यानंतर कोणत्याच राजकीय नेतृत्वाने हिंदू धर्म,देव,दैवतं, धर्म, याच्या कडे लक्ष दिले नाही. जगात सर्व धर्मांना  राजाश्रय आहे. राज्यातील 85%ओबीसी हिंदू धर्मात उपेक्षित आहे.कोट्यावधी मंदिर आहेत, लाखो मठ व मठपती आहेत ते फक्त स्वत:चा विचार करत आहेत. सर्व धर्म, सर्व सत्ता यांचा उदय धनगर जमातीने च केला आहे.त्यामुळेच धनगर धर्म पिठाचा संवाद वेग कासव गतीने वाटत असला तरी एक दिवस विजेच्या वेगानेच चालनार आहे.राज्य आणि देश पातळीवर असे संघटन उदयाला आले नाही. कल युगा मध्ये ही परमेश्वराला धनगर निमित्त करून परमेश्वरी कार्य करून घ्यायचे असेल. निस्वार्थी    सज्जन, सात्विक, संत, वारकरी, डाॅ,इंजिनिअर,वकिल, प्राध्यापक, शिक्षक,उद्योजक, समाजसेवक, सर्व क्षेत्रातील सन्माननीय अधिकारी, जे स्वकर्तृत्वावर उभा आहेत असेच लोक सामील होत आहेत. ज्यांना कधी सज्जन संगती ,व्यासपीठ मिळालेच नाही अशी सात्विक मंडळी या मध्ये सामील होत आहेत. कोरोना संपल्यानंतर हेच  सज्जन लोक धर्म संमेलन/धर्म संसद/धर्म परिषद घेण्याचा मानस करत आहेत तर आंनदच आहे.आपले हिन्दू हजार धर्म गुरू असतील तर धर्म संमेलनात एखादा ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, शिख, लिंगायत, जैन धर्म गुरू बोलवावेत  म्हणजे धनगर समाजाची उदारताही दिसून येईल.आणि भारत मातेचा सर्व धर्म समतेचा सन्मान ही राखला जाईल. अनेक राजे, संत यांनी जीवाचे रान करून, जीवाची बाजी लावून, धर्म रक्षण केले. पण स्वातंत्र्या नंतर  धर्म प्रचार करणायाचाच मुद्दा उरला आहे.अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य यांना ज्ञानेश्वर माउलीच्या ज्ञाना नुसार धर्म संमेलन अपेक्षित असावे. जें खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो Iभूता परस्परे पडोI मैत्र जिवाचें ll.

धर्म पिठ अधिक्रुत रित्या मिडीयात जाहीर केलेले नाही तरीही राज्यभरात प्रिंट मिडीयात ही गाजत आहे.त्यामुळे आजच्या या तरूण भारत संवाद सदरातील बातमीचे थोडक्यात म्हणने प्रसारित करत आहोत. 

श्री विनायक काळदाते.राज्य संघटक धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...