Sunday, January 17, 2021

माजी तहसीलदार आर.पि.कुवर साहेब यांची मार्गदर्शक म्हणून निवड.


धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य मध्ये स्वागत व अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 -श्री.आर.पि.कुवर साहेब,सल्लागार, मार्गदर्शक धनगर धर्म पीठ-उत्तर महाराष्ट्र विभाग🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

          कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll     ✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️                              श्री.आर.पि.कुवर साहेब सेवानिवृत्त तहसीलदार व कट्टर मेंढपाळ असून नाशिक  जिल्ह्यातील मालेगांव येथील निवासी आहेत. साहेबांना समाजसेवेची उदंड आवड असून नोकरीत असताना सुद्धा समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.महसूल विभागातील जमीन विषयक कायद्याचा व तरतुदीचा त्यांचा विशेष अभ्यास आहे त्यामुळे परिसरात त्यांचा आदरयुक्त वचक आहे.त्यांचे अनेक ज्युनिअर सध्या कलेक्टर श मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.नुकत्याच झालेल्या बानाई माता देवस्थान जवळ ग्रामपंचायत करित असलेल्या बांधकामाला स्थगिती मिळवण्यात समाजाचे त्यांनी नेतृत्व केले तसेच पोलिसांनी विनाकारण जप्त केलेला समाजबांधवाचा ट्रँक्टर त्यांना परत मिळवून दिला.

  त्यांचे  चिरंजीव नुकत्याच घोषित झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत निवड होउन उपजिल्हाधिकारी पदावर  पुणे येथे ट्रेनी म्हणून कार्यरत झाले आहेत. दुसरा मुलगा जीएसटी ईनिस्पेक्टेर नाशिक येथे आहे. दोन्ही सुनबाई जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ आमलदार आहेत.कन्या जिल्हा क्रुषीधिकारी आहे.  कुवर साहेब व त्यांचे कुटुंबीय अध्यात्मिकतेची जपनूक करणारे आहेत. सर्व जण  महत्वाची भूमिका बजावनार आहेत . .परवा नियुक्त  IAS केडर मध्ये अनेक त्यांचे सहकारी नियुक्त झाले आहेत. त्यां मध्ये  सोलापूर जिल्हा कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब सांगता येतील. ते लवकरच स्वामी साहेब  कार्य कारी अधिकारी सोलापूर यांच्या कडे धर्म पीठाचे प्रश्न मांडणार आहेत. त्यांनी धर्म पीठाचे काम जोरदार पणे सुरू केले आहे.

  श्री.कुवर साहेबांच्या मार्गदर्शनाचा धर्मपीठा मार्फत जमातीला भविष्यात फार मोठा फायदा होऊन धर्म पीठाच्या समाज-प्रबोधन, संघटन,शिक्षण, सेवा व विकासाच्या कामात मोठा हातभार लागनार आहे.कुंवर साहेबांचे धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वागत. हार्दिक  अभिनंदन व शुभेच्छा. धर्म पीठ महाराष्ट्र राज्य 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...