धनगर धर्मपिठाचे जिल्हा धर्मगुरू म्हणून ह.भ.प.कोल्हे महाराज व जिल्हाध्यक्ष पदी श्री.होपळ सर.🌹
भौतिक सुखाच्या मागे धावत या धावपळीच्या युगात मनशांती गमावलेला समाज ईर्षा, राग,मत्सर, स्पर्धा इत्यादी च्या मागे लागून आपली मानसिक शांतता हरवून बसला आहे.विचलित झालेल्या समाजाच्या आध्यात्मिक, शैक्षणिक व धार्मिक प्रबोधनासाठी धनगर धर्मपिठाची स्थापना झाली असून या द्वारे समाज शिक्षणाचे व प्रबोधनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
धनगर धर्मपिठाला अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.रामदासजी होपळ सर,अकोट यांची तर अकोला जिल्ह्याचे धर्मगुरू म्हणून ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली.धनगर धर्मपिठाचे मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष म्हणून प्रा.एल.डी.सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली.
धनगर धर्मपिठाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून रवींद्र गुरव महाराज यांची तर धर्मगुरू म्हणून ह.भ.प.संतोष महाराज घोंगे यांची नियुक्ती झाल्याचे धर्मपिठाचे पदाधिकारी दिवनाले महाराज व श्री.विनायक काळदाते यांनी कळवले.

No comments:
Post a Comment