Friday, January 15, 2021

धर्मपिठात स्वेच्छेने काम करण्याची संधी.

धनगर धर्म पीठ मध्ये धर्म कार्य करण्याची स्वेच्छेने संधी 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🕎

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

जमातीतील सर्व  धर्मशिल सज्जनांना कळवण्यात येत आहे की आपण तीन वर्षां पुर्वी धनगर धर्म पीठ संस्थेची स्थापना केली आहे.जे कोणी इच्छुक असतील त्यांनी या कार्यात सहभागी व्हावे.असे आवाहन करण्यात येत आहे.

धर्म म्हणजे सत्य, न्यायाने वर्तन करणे. जगा मध्ये १००% कोणीही आदर्श नाही.आपण ही कलियुगातील मानव प्राणी आहोत. चुका तर

होणारच पण ५०% टक्के तरी सद्वर्तन घडावे. जेथे स्वार्थ येतो तेथे आधर्म सुरू होतो. चुका होतात त्याला आपण पाप म्हणतो. जनावरे कधी खोटी कामे करत नाहीत निसर्ग नियमा प्रमाणे कर्तव्य पार पाडत असतात. माणसाने कुटुंब, गाव,राज्य, देश, जग अशी व्यवस्था निर्माण केली आहे व प्रत्येक मानवी गरजेचा व्यवसाय केला आहे .अनेक लोक या व्यवस्थेत बळी जात आहेत कारण ते धर्म पाळत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने  आरोग्याची  केलेली व्याख्या सांगते जो व्यक्ती शारीरिक, मानसिक,सामाजिक, धार्मिक रित्या संतुलित आहे तोच व्यक्ती सुद्रूढ होय.लक्षात घ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य सांभाळायचे असेल तर धार्मिक आचरण खूप महत्वाचे आहे.कलयुगामध्ये भूल,थापा,भोगवाद व चंगळवादाने थैमान घातले आहे लोक त्यालाच सत्य समजतात फसवणूक करून घेतात. सर्व प्रकारचे व्यवहार करा. व्यवहार आपल्या नियंत्रणात असावेत आपण व्यवहाराच्या अहारी जायचे नाही तोच खरा धर्म आहे.हे झाले धर्म पीठ तत्वज्ञान. 

धर्म पीठ उद्देश पुढील प्रमाणे आहेत. साहित्य संमेलन माध्यमातून सुशिक्षित लोकांना समाजमुख बनवने व धर्म पीठ माध्यमातून सर्व सामान्य जनता समाजमुख बनवने. सर्व देवदेवतांचा इतिहास जगासमोर मांडने .धर्म शिक्षण व संमेलन घेणे.जमातीने धर्माच्या नावावर वाईट कर्मकांड न करणे. राज्यातील सर्व धार्मिक संस्थाने समन्वय  साधने. धर्माला राजाश्रय मिळावे म्हणून प्रयत्न करणे.धर्म शिक्षण प्रसार करणे.सामाजिक,सांस्कृतिक, साहित्य, आरोग्य विषयक सेवा करने.धर्म कार्य करनारे व्यक्तीना प्रोत्साहन व सामाजिक दर्जा व शासकीय मदती साठी प्रयत्न करने..जमातीचे सर्व प्रश्न या व्यासपीठावर मांडणे व शासन दरबारी पाठपुरावा करणे. कामाची व्याप्ती जिल्हा, राज्य, देश,प्रदेश असे आहे.आपण जर धर्म इतिहास पाहिला तर धार्मिक कार्य करणारांना  अनेक लोक बदनामी करण्या साठी टपलेले असतात. त्यामुळे सज्जन, संयमी व्यक्तीनी या मध्ये सहभागी व्हावे. समाजाचे ऋणानुबंध जपत धर्म ऋण फेडण्या साठी व सत्कार्या साठी धर्म नेतृत्व करावे.धर्म पीठ चे दोन विभाग असतील एक प्रशासकीय विभाग व दुसरा धर्म विभाग. प्रशासकीय विभागात सर्व गाव पातळी ते राज्य पातळीवर अध्यक्ष असतील. धर्म पातळीवर धर्म गुरू नियुक्ती असतील. संस्थेच्या उद्देशा नुसार कर्तव्य असतील. तरी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे हे नम्र आवाहन करण्यात येत आहे. लवकरच निवड  नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

सध्या संस्थापक डॉ अभिमन्यु टकले. केंद्रीय अध्यक्ष बापूसाहेब हटकर.राज्य अध्यक्ष डॉ विष्णुपंत गावडे.  उपाध्यक्ष संजय शिंगाडे सर.मार्गदर्शक संभाजीराव सुळ. संचालक:क्रुष्णा बुरूगुंले. सोलापूर अध्यक्ष रमेश गावडे.सोलापूर शहर धर्म गुरू आण्णासाहेब कोळेकर महाराज. 

सध्या २५लोक कार्यरत झाले आहेत.लवकरच अध्यक्ष व धर्म गुरूची नावे डाॅ विष्णुपंत गावडे जाहीर करतील. 

संपर्कासाठी नंबर 

डाॅ. विष्णुपंत गावडे सर 9423065116

विनायक काळदाते सर:8208568546

क्रुष्णा बुरूगुंले 9702760412.🕉️✡️🕉️🔯✡️🕉️🔯✡️🕉️🔯✡️🕉️🔯✡️🕉️🔯✡️🕉️🔯

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...