🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️
*अभिनंदन विनायकराव काळदाते!*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
मा विनायकराव काळदाते साहेब यांची धनगर धर्म पिठाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यांचं हार्दिक अभिनंदन!
🥁🎺🎁💐🤝🏻
धनगर धर्म पिठाचे संस्थापक अध्यक्ष मा डॉ अभिमन्यू टकले. यांनी ईतर पदाधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करून मा काळदाते साहेब यांची नेमणूक केली ती सर्वांगाने योग्य आहे.
मा काळदाते हे उच्च विद्याविभूषित आहेत. ते एका राष्ट्रीयीकृत बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. स्वभाव अत्यंत मन मिळवू आणि नम्र आहे. त्यांची विदर्भ विभाग प्रमुख पदी नेमणूक करताच त्यांनी कामाचा जो धडाका लावला आणि उत्तम, लायक आणि गुणवान पदाधिकाऱ्याच्या ज्या नेमणुका केल्या त्याला तोड नाही. या सर्व बाबींचा विचार करून विनायकराव यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी जी निवड करण्यात आली ती अतिशय योग्य निवड आहे. म्हणून काळदाते साहेब यांचं पुनश्च एकदा अभिनंदन!
दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नेमणूकी मुळें विदर्भ विभागाला काळदाते यांच्या रूपाने राज्य पातळीवर एक सशक्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले हे स्वतः प महाराष्ट्रातील आहेत. मी बापू हटकर केंद्रीय अध्यक्ष खान्देशातून आहे. त्यामुळे या तीनही विभागांना भरभक्कम प्रतिनिधित्व मिळाले आहे. आता मराठवाडा आणि कोकण येथून दोन चांगले प्रतिनिधी प्रदेश कमिटीवर घेऊन संपूर्ण राज्य व्यापी समान प्रतिनिधित्व देण्यात येईल. त्यातून धर्म पिठाची योग्य वाटचाल सुरू होईल. लवकरच धर्म पिठाची राज्य व्यापी ऑन लाईन बैठक घेऊन त्यात धर्मपीठाच्या कार्या बद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.
अभिनंद श्री विनायकराव. जोरात, जोमात काम सुरू करा. सर्व महाराष्ट्र तुमच्या ताब्यात दिला आहे. आदिमाया महाकाली मायाक्का, गंगापुत्र बिरुबा आणि संत बाळूमामा यांचे आशीर्वाद आपल्या सर्वा सोबत आहेत. आगे बढो महात्मा.
*चांगभल*
बापू हटकर
केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्म पीठ
🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️🚩🕉️🟨🕉️

No comments:
Post a Comment