धर्मपीठ ३९वा सत्संग संपन्न🚩
हरी नाम ना जपतीl परी नाना तिर्थे हिंडती l तयाची ही स्वार्थी भक्तीl कैसी लाभेल मना शांती ll
धर्मपीठाच्या ३९व्या सत्संगात ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या दहाव्या अभंगावर निरुपन केले तर ह.भ प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर ९वे पुष्प गुंफले.दोन्ही महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगताना जनतेच्या वर्मावर बोट ठेवले.मुखात देवाचे नाव नाही आणि तिर्थाटन सुरू आहे या दांभिकतेवर महाराजांनी आसूड ओढले व नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले.तत्पूर्वी सौ.पुष्पाताई करे यांनी हरिपाठाच्या दहाव्या अभंगाचे गायन केले.ह.भ.प.घोडस्कर महाराज, कचरे महाराज,गाडगे महाराजांनी प्रार्थना सादर केल्या.
डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,मा.कुवर साहेब यांनी धर्मपीठाच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले.
सौ.सुलोचनाताई मेहत्रे,शोभाताई डहाके, मालाताई शिदे,पेशवे ताई,प्राप्तीताई चितळकर, शारदाताई ढोमणे यांनी भक्तीगीत सादरीकरण केले तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.
सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, दिवनाले महाराज, घोडस्कर महाराज, कचरे महाराज, डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,ज्ञानेश्वर ढोमणे,विनायक काळदाते, हिमांशू शिदे,पियुष दिवनाले,राजेश दिवनाले सर माणिकराव गुलवाडे,संतोष पेशवे,डॉ. गोपाळ कळंब,ज्ञानदीप शिंदे तसेच शारदाताई ढोमणे, पुष्पाताई करे,रेश्माताई ठोंबरे,सुलोचनाताई मेहत्रे,शोभाताई डहाके,प्रमिलाताई फणसे,समिक्षाताई उपासे,प्राप्तीताई चितळकर, मालाताई शिंदे,पेशवेताई, रिया काळदाते व श्रोतेजन उपस्थित होते.
🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩











