Sunday, January 17, 2021

नागपूर महिला अध्यक्ष/उपाध्यक्ष निवड

🕉️धर्म पीठ महिला आघाडीला नागपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद🕉️

 🌹 डॉ.सौ.रक्षाताई महाजन (एम.ए.,पि एच.डी.) यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती.....तर


🌹सौ.प्रणालीताई खरबडे(शिक्षिका) यांची महिला आघाडी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.

   कोण म्हणतो धनगर समाजातील स्त्रिया ह्या बुजऱ्या असतात, भारतात सर्वप्रथम महिलांची फौज उभारणाऱ्या पु.अहिल्यादेवी होळकरांच्या वारस असलेल्या आमच्या भगिनी समाजकार्यासाठी हिरहीरीने पुढे येत आहेत.डॉ. प्राध्यापक, अधिकारी,शिक्षिका,गृहिणी,समाजसेविका अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळून आमच्या भगिनी या समाज प्रबोधन, शिक्षण व विकासाच्या कामात पुढे येत आहेत स्वताहून जबाबदारी स्विकारत आहेत.सोलापूर पासून नागपूर पर्यंत समाज एका माळेत ओवण्याचे धर्मकार्य धर्म पीठाने आरंभिले आहे.

  कुटुंबाला संस्कार व शिक्षण देण्याऱ्या अहिल्याकन्या समाजाला वळण लावण्यासाठी सरसावत आहेत,फार मोठा बदल आणि फार मोठी समाजविकासाची क्रांती दृष्टीचर होताना दिसत आहेत.चूल आणि मूल हे धोरण सोडून समाजभगिनी सामाजिक जबाबदारी सुद्धा स्विकारत आहेत, सकारात्मक सामाजिक चळवळीची ही नांदी आहे यामधून काही तरे चांगले नक्कीच घडणार आहे.

  उच्च शिक्षीत असलेल्या सौ.रक्षाताई शिक्षण,समाजसेवेसोबत साहित्यात रुची बाळगून आहेत,दरवर्षी आ.धनगर साहित्य संमेलनाला हजेरी लावतात.

 सौ.प्रणालीताईचे नाव नागपूर जिल्ह्यात समाजकार्यात आदराने घेतल्या जाते.प्रत्येक समाजकार्यात, चळवळीत त्या सहभागी असतात. आपली नोकरी सांभाळून त्या हे करत असतात.

  सौ.महाजन ताई व सौ.खरबडे ताई यांची नियुक्ती करुन महिला राज्यधक्ष सौ.शारदाताई ढोमने यांनी नागपुरात महिला आघाडी पक्की करण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे धर्म पीठाच्या कामाला उपराजधानीत बळकटी येणार आहे.


✍️विनायक काळदाते.


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...