🕉️नाशिक जिल्हा धनगर धर्म पीठ महिला आघाडीचा झेंडा सौ.मिनाताई बिडगर यांचे खांद्यावर 🕉️
नाशिक जिल्ह्यात समाजसंघटन व प्रबोधनात आघाडीवर असलेल्या सौ.मिनाताई बिडगर यांची धर्म पीठाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.धर्म पीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेब,राज्य अध्यक्ष डॉ. गावडे साहेब,महिला राज्यधक्ष सौ.शारदाताई ढोमने,धर्म पीठाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.खंडेरावजी पाटील,कार्यकारिणी सदस्य श्री.बुरुंगले यांच्या समितीने सदर निवड करण्यात आली.
🌹परिचय-सौ.मिनाताई बिडगर ह्या नाशिक जिल्ह्यात समाजसेवेत अग्रणी असून त्या सरपंच सेवा संघटना,मानवाधिकार परिषद, दारुबंदी जनआंदोलन,पत्रकार संघ,शांतता कमिटी,अँन्टीकरप्शन अशा विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत.त्यांना समाजरत्न,समाजगौरव पुरस्कार, रणरागिणी महिला पुरस्कार,उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त आहेत.
सौ.मिनाताई यांच्या नियुक्ती मुळे धर्म पीठाचे काम नाशिक शहरात जोमाने वाढून जिल्ह्यातील महिला, संत,महंत,मठ देवस्थान इ.धर्म पीठा सोबत जुळण्यात मदत होईल असा विश्वास आहे.
✍️विनायक काळदाते
राज्य संघटक.
रेश्मा ठोंबरे
प्रसिद्धी प्रमुख.

No comments:
Post a Comment