🌹अभिनंदन🌹
🕉️धनगर धर्म पीठ अमरावती जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांची निवड घोषित 🕉️
राग,लोभ,ईर्षा, दैनंदिन जिवनातील प्रखर स्पर्धा, हेवेदावे या मुळे सामाजिक व कौटुंबिक शांतता भंग झाली असताना माणूस माणसापासून दुरावल्या जात आहे. समाजाला पुन्हा एका सांध्यात जोडून समाज प्रबोधन, धर्म पालन,संगोपन व शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगती साधन्याच्या उद्देशाने कार्यरत धर्म पीठा मध्ये महिलांचा सुद्धा सहभाग वाढत आहे.किंबहुना घराच्या सर्वागीण प्रगतीत सिंहाचा वाटा असलेल्या गृहिणी या उपक्रमात उत्साहाने सामिल होत आहेत ,सामाजिक विकासाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेउन अख्खा समाज प्रज्वलित करण्यासाठी पाउल टाकत आहेत.
याच अनुषंगाने धर्म पीठाच्या महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांनी अमरावतीची सक्षम,सक्रिय महिला आघाडी तयार केली आहे.
🌹अध्यक्ष-सौ.छबुताई मातकर
माजी पं.स.सदस्य राहून गेलेल्या मातकर ताई समाजकारणात सक्रिय असून मल्हार महासंघातून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली असून रणरागिणी महिला बहू.संस्थेच्या अध्यक्ष आहेत.त्या सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा काम करत असून महिलांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे.
🌹उपाध्यक्ष-सौ.वर्षाताई मोहोड.सौ.वर्षाताई सुद्धा सक्रिय समाजसेवक असून रणरागिणी महिला बहू.संस्था.या मार्फत समाजसेवेला सुरुवात केली आहे व रणरागिणी महिला बहू.संस्थेच्या त्या उपाध्यक्षा आहेत.त्यांचे एक चिरंजीव नौदलात कँप्टण असून फ्रान्स येथे कार्यरत आहेत,दुसरे अभियंता आहेत.सर्वाना समाजसेवेची आवड आहे.
🌹संघटक-सौ.सुनंदाताई पाठक-सौ.पाठक ताई ह्या उत्कृष्ट संघटक असून त्यांनी मल्हार महासंघ व रणरागिणी महिला बहू.संस्था यामधून समाजातील महिलांच्या विकासात हातभार लावलेला आहे.
वरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यामुळे संपूर्ण विदर्भातील महिला समाजसेवकांना प्रेरणा मिळणार आहे व त्यांचे समाजसेवेचे हे काम पथदर्शक ठरणार आहे.
✍️डॉ. अभिमन्यू टकले
विनायक काळदाते
🚩धनगर धर्मपीठ.

No comments:
Post a Comment