🕉️धनगर धर्म पीठाने दिला वारकरी आंदोलनाला पाठिंबा🕉️
लाँकडाउनच्या अटी शिथिल झाल्यावर जवळपास सर्वच व्यवहार सुरु झाले आहेत परंतु भजन,किर्तन, सत्संग, पारायण याला अजून परवानगी घ्यावीच लागते,काही ठिकाणी अडवणूक सुद्धा होते.यामुळे आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या धार्मिक भावनांचा कोडमारा होत असून अनेकांचा रोजगार सुद्धा बुडाला आहे.
वरील परवानगीच्या जाचक अटी रद्द करून सोशल डिस्टन्सिग पाळत साधुसंत मंडळीला व भाविकांना भजन किर्तन करु दयावे या साठी विश्व वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषदेने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला आरंभ केला आहे. या अनुषंगाने धनगर धर्म पीठाचे पदाधिकारी श्री.विनायक काळदाते, श्री.होपळ सर, धर्मगुरु ह.भ.प.कोल्हे महाराज,दिवनाले महाराज यांनी चर्चा करून उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.धनगर धर्म पीठाचे धर्म गुरु ह.भ.प.प्रभाकररावजी दिवनाले,ह.भ.प.कळब महाराज, ह.भ.प.पातोड महाराज व समन्वयक श्री.अनिल पातुर्डे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून विश्व वारकरी सेना अध्यक्ष ह.भ.प.शेट्ये महाराज तसेच साबळे महाराज, गवारे महाराज यांना पाठिंब्याचे पत्र दिले.

No comments:
Post a Comment