Friday, January 15, 2021

धनगर समाजाने गतवैभवाचे सोने लुटावे.

धनगर जमातीने गत वैभवाचे  सोने लुटावे याच नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯जमातीच्या राजा महाराजांनी भारत देशावर पिढ्यान पिढ्या राज्य केले. देशात सोन्याचा धूर निघत होता. जमात पंरपरेने धार्मिक, सुसंस्कृत, संस्कारी होती म्हणून धर्म पालन करत होती. जमात शूर वीर राज्य कर्ती होती म्हणून धर्माला राजाश्रय होते व धर्म रक्षण करत होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जे राजकारण आणि धर्मकारण  केले ते जगाच्या इतिहासात अधोरेखित झाले आहे .भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले जमातीचे अज्ञान आणि मागास पणा याचा फायदा घेत प्रस्थापित राजकारणी लोकांनी इतिहास लपवला म्हणजे साहीत्य संस्कृती लपवली.धर्मावरती ताबा मिळवून खर्या अध्यात्मा पासून व धर्म ज्ञाना पासून धनगर जमात कोसो दूर ठेवली गेली आहे.जगाची लोक संख्या ७५९.४३ कोटी आहे. या लोकांच्या महासागरात मोठे मासे छोट्या माशांना खात असतात.  आपल्या जमातीचे एकत्रीकरण, रक्षण, प्रवाहीकरण आपणच करायचे असते.आपण जमाती साठी अहंकार, स्वार्थ, लबाडी,भोगवाद, चंगळवाद सोडून  प्रमाणीकपणे समाजासाठी साहित्य व  धर्म चळवळ उभारून लोकांना साहित्यातून भूत,वर्तमान व भविष्याचे ज्ञान, व धर्मातून सुयोग्य सामाजिक वर्तन व संस्कार शिकवत नाहीत तोपर्यंत आपलीच मुले आपल्याला उध्दट, उर्मट, ज्ञानाचे पाठ शिकवत कौटुंबिक व सामाजिक एक्य भंग करत रहाणार आहेत. ज्यांनी सत्ता, धन कमावून ठेवले आहे त्यांची मुले चंगळवाद व भोगवादात आडकून जीवन व्यतीत करतात करणार आहेत. आपल्या सामाजिक, राजकीय चळवळी चालू आहेत पण हवेतच तरंगत आहेत. कारण वैयक्तिक चळवळीत  राजकीय स्वार्थ असल्याने निर्माण होणार्या इतर चळवळी बद्दल द्वेष निर्माण होत आहेत त्यामुळे समाजात एकी होत नाही हे एकमेव सत्य आहे.वैयक्तीक  राजकीय स्वार्थाने चळवळी चालवणार्या तरूणांना राजकीय पक्ष भिक देवून त्यांचा समाजाच्याच विरूद्ध उभे करतात त्यामुळे त्याचे स्थान समाजात ही शून्य आणि इतर समाजहीतही शुन्य. कारण पद देवून  विरोधकाला शिव्या द्यायला लावने व दोन समाजात भांडण लावून आपण राज्य करने ही लोकशाहीत रूढ पध्दत झाली आहे.आपले तरूण वापरले जाताहेत ही शोकांतिका आहे.जमातीच्या नेत्यांनी  जाती बाहेर जाऊन स्वतःची सर्व जमात मान्य राजकीय चळवळ निर्माण करने गरजेचे आहे. जमातीच्या विकासासाठी सामाजिक, साहित्य, धर्म चळवळीची नितांत गरज आहे.या चळवळी सर्व मान्य असायला हव्यात. म्हणूनच जमातीच्या भविष्यासाठी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सुरू केले आहे.त्याचे परिणाम सर्व राज्य पहात आहे.

सर्वात महत्वाची बाब धर्म. आपल्या देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्यानंतर कोणत्याच राज्यकर्त्यांने धर्म कार्य केले नाही.भारतीय लोक शाही तर धर्मनिरपेक्ष आहे. येथे प्रत्येक धर्माला १००% स्वातंत्र्य आहे.आपल्या देशात कोण संत, साधू,धर्मगुरू असावा असा कायदाच नाही.सर्व जाती धर्मानी स्वतःचे धर्मातही वर्चस्व सिद्ध केलंय. पण धनगर  जमात धर्म वर्चस्वा पासून ही वंचितच आहे.समाज खूप मोठा प्रमाणीक आणि  धार्मिक आहे. अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी,पंरपंरा ही आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत. जा प्रमाणे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने महाराष्ट्र राज्यात साहित्य आणि सांस्कृतिक,इतिहास क्षेत्रात धनगर जमातीची वेगळी प्रतीमा, वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या प्रमाणे धनगर जमातीचा धार्मिक अध्यात्मीक इतिहास, धार्मिक  अध्यात्मिक कार्य करणारे महापुरुषांचा, देव दैवतांचा इतिहास जगासमोर ठेवण्यासाठी धर्म पीठाची, धर्म गुरूंचे व धर्माचे शिक्षण, संशोधन, प्रसार होणे खूप गरजेचे आहे..१९९०ला भटक्या जमाती क आरक्षणा नंतर आज पावेतो ३० वर्षा पासुन नेत्याना एखादी आमदारकी द्यायची आणि जनतेच्या तोंडाला अश्वासनाची पाने पुसायची हे नित्य चालत आले आहे.त्यामुळे जमातीचे विद्यार्थी बेकारीच्या खाईत लोटले जात आहेत.मेंढपाळाच्या छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार करून उमलन्या पुर्वीच कळया खुडून टाकल्या जात आहेत. मेंढपाळाचे खून करून   त्यांच्या रक्ताने शस्र रंगवली जात आहेत. शेळ्या मेंढ्याच्या हाडा मासांचे सडे महामार्ग रंगवत आहेत. नैसर्गिक आपत्ती ने जमातीच्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून देशोधडीला पाठवले आहेत. कोरोना महामारीने कामगार व मजूरांच्या मुलाबाळाच्या तोडांतून घास हिरावून घेतला आहे.२०१४ पासून धनगर आदिवासी आरक्षणाचे घोंगडे राजकीय पाण्यात भिजत पडले आहे.याचाच अर्थ जमातीच्या सर्व चळवळी  फेल झालेल्या आहेत. आपण कोठे व किती भरकटलेले आहोत याचे आत्मपरीक्षण आपण करणार कधी? आपल्या राजकीय, सामाजिक, साहित्य, धर्म, अर्थ या शक्ती, चळवळी रचनात्मक झाल्या तरच यशस्वी होणार आहेत.धनगर साहित्य आणि धर्माचे राज्यात देशात नामो निशाण मिटले होते. साहित्य चळवळ जिवंत केली आहे. धर्म चळवळ ही जीवंत झाली पाहिजे. साहित्य  व धर्म चळवळी सर्व चळवळीचा भक्कम पाया असतात व सर्व  सेवकाना उपयोगी असतात. आपला देश साहित्य म्हणजे मिडीया व धर्म राजकारण या वरच आवलंबून आहे.उदाहरणार्थ  कोरोना  महा मारीत सर्व व्यवहार सुरू झाले आहेत पण  धर्म स्थळांचे राजकारण चालू आहेत. राज कारणाने प्रेरित असलेल्या चळवळी असत्य, अन्याय, अनिती,अधर्मावर अधारीत आहेत म्हणून आपण अपयशाचे धनी आहोत. आपल्या चळवळी सत्य, न्याय,निती, धर्म , (बुध्दी)साहित्य वर अधारीत सुरू झाल्या पाहिजेत नक्कीच यश मिळेल.आपण आपले गत वैभव सत्ता आणि धर्म गमावून बसलो आहोत. धनगर जमातीने गत वैभव मिळवून गत वैभवाचे सोने लुटावे याच नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आपलेच जमात हितचिंतक . धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 

डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक 

मा.संभाजीराव सुळ उपाध्यक्ष व संचालक डीसीसी बॅन्क लातूर,

मा.बापूसाहेब हटकर केंद्रीय अध्यक्ष. 

मा.डाॅ. विष्णुपंत गावडे.राज्य अध्यक्ष. 

मा.संजयजी शिंगाडे सर  राज्य उपाध्यक्ष. 

क्रुष्णा बुरूंगुले संचालक  

मा.संजीवन खांडेकर सर धर्मगुरू उस्मानाबाद. 

मा.रमेश गावडे अध्यक्ष सोलापूर.

विनायक काळदाते विदर्भ अध्यक्ष .श्री प्रभाकर दिनवाले धर्म गुरू विदर्भ 

श्री दिलीप भोरे धर्म गुरू यवतमाळ

श्री विठ्ठल सजगने सर अध्यक्ष सातारा 

अजित करणवर अध्यक्ष माळशिरस. श्री देवीदास वैदकर धर्म गुरू भुसावळ.🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...