महिला अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य यांचे श्री महालक्ष्मीच्या करवीर नगरीत स्वागत. धर्म पिठाचे कार्य करण्यास राज्यात अनेक उच्च पदस्थ महिला अधिकारी, इच्छुक. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ धर्म रक्षित रक्षित: ऋतस्य यथा प्रेत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll 💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦 धर्म पिठ कार्य सुरू झाले. निवड झालेल्या महिलांना धर्म पिठ मार्फत कार्य करण्यास पुर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.सर्व उच्च शिक्षित व सात्विक, सज्जन लोक एकत्र येत असल्याने सुरक्षीत व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक चांगले उच्च शिक्षित समाज धुरीण विचारवंत,संत,वारकरी एकत्र येत असल्याने समाजात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दोनच महिन्यात मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते नागपूर धर्म पिठाचा ऐतिहासिक प्रवास सुरू आहे.या मध्ये महिलांनी कधी नव्हे एवढा सहभाग नोंदवला आहे.राज्यातील अनेक जण उत्सुक आहेत. संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यु टकले .केंद्रीय अध्यक्ष बापूसाहेब हटकर, उपाध्यक्ष श्री संभाजीराव सुळ,अध्यक्ष डॉ विष्णुपंत गावडे,राज्य संघटक विनायकजी काळदाते, श्री सोमनाथ कर्णवर पाटील ASI.श्री बबनराव बरकडे प्रशासकीय अधिकारी,विभागीय धर्म गुरू पश्चिममहाराष्ट्र., डाॅ.विजय पाटील कोकण विभागीय अध्यक्ष असे अनेक मान्यवर कोरोना मुळे राज्य दौऱ्याच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यातील अनेक मान्यवर गाठी भेटीच्या प्रतिक्षेत आहेत. धर्म पिठ निरपेक्ष पणे सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भेटणार आहे. सन्मान पुर्वक सहभाग घेतला जाणार आहे. अनेक संघटना, अनेक लोकांनी, अनेक राजकीय पक्षांनी समाजाची फसवनूक केली आहे .फसवनूक चालूच आहे असे अनेक लोकांचे मत आहे हे नाकारता येत नाही.आदिवासी धनगर साहित्य संमेलन एक रचनात्मक उपक्रम सुरू केला आहे.धर्मपिठ ही रचनात्मक कार्य असून खरोखर च समाज उपयोगी उपक्रम आहेत.यांचे समाजासाठी कार्यक्रम होणार आहेत.अशा या धर्म पिठच्या महिला अध्यक्ष कोल्हापूर, धनगरवाडा येथे भेट देऊन आले. नक्कीच त्यांचे स्वागत ही चांगलेच झाले. अनेक महिला आणि व्यक्तींनी धर्म पिठ कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.लवकरच पुर्ण राज्य आणि प्रतिक्षेत असलेले सर्व सात्विक, सज्जन,उच्च शिक्षित या मध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहेत. धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांचे कोल्हापूर शहरात या करवीर नगरीत,उत्स्फूर्त स्वागत करून धर्म पिठाच्या कार्याबाबत सदिच्छा व्यक्त केल्या.
स्थानिक राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनर यांच्या हस्ते धर्म पिठ महिला अध्यक्षांचा काँलेजतर्फे शेला व पुस्तक भेट देवून सत्कार केला व धर्म पिठाप्रती सदिच्छा व्यक्त केली.या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.संजयजी वाघमोडे, प्रा.संतोषजी कोळेकर, प्रा.कटारे सर,प्रा.येलगुंडे मँडम व समाजाचे सर्व कर्मचारी वृंद हजर होते.या सर्व उच्च शिक्षित समाजबांधवांनी धर्म पिठ स्थापनेबद्दल आनंद व्यक्त करुन समाजकार्याकरीता शुभेच्छा दिल्या.
दुसऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात समाजबांधवांनी धर्म पिठ प्रतिनिधी म्हणून महिला आघाडी अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन ह्रदयस्पर्शी सत्कार केला, यावेळी सौ.खरात मँडम,सौ.सरगर मँडम,सौ.शेळके मँडम,श्री.मोठे साहेब,प्रा.संतोषजी कोळेकर , सामाजिक कार्यकर्ते श्री.संजयजी वाघमोडे तथा ईतर समाज बांधव उपस्थित होते.
कोल्हापूर प्रवासा दरम्यान समाज बांधव तथा भगिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्थानिक महिला मंडळाने धर्म पिठातर्फे घेण्यात येणाऱ्या समाजशिक्षण,समाज प्रबोधन व समाजविकासाच्या कामात योगदान देण्याची उत्सुकता दर्शविली. श्री महालक्ष्मी करवीर नगरीचे धर्म पिठावरचे प्रेम असेच व्रुध्दींगत होत राहो.विठ्ठल बिरूदेवाची क्रुपा अशीच राहो.करवीर नगरीच्या तमाम जमात बांधवाचे हार्दिक आभार. असेच आपले प्रेम धर्म पिठावर रहावो व करवीरवासिनी अबांबाई महालक्ष्मीचा क्रुपाशिर्वाद आपणा सर्वावर रहावो हीच सदिच्छा. साहित्य संमेलन आणि धर्म पिठ हे धनगर जमाती साठी उगवलेले ज्ञान सुर्य आहेत नक्कीच जमातीच्या जीवनातील अंधार दूर होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणत हे राज्य मल्हारी मार्तंडाचे आहे.यळकोट यळकोट जय मल्हार. 🙏.
✍️ विनायक काळदाते.
रेश्मा ठोंबरे.
धनगर धर्म पिठ🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

No comments:
Post a Comment