🕉️सौ.सविताताई दुधभाते,सोलापूर-धनगर धर्मपीठ महिला आघाडीच्या शिरेपेचातील मानाचा तुरा🌹
धर्म पीठामध्ये काम करण्यासाठी ह.भ.प.मंडळी सोबतच उच्च शिक्षीत समाजबांधवाचा कल वाढतो आहे.धर्मपीठाच्या महिला आघाडी राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांनी डॉ. टकले,डॉ. गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली धर्म पीठाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष पदी सौ.सविताताई दुधभाते यांची केलेली नेमणूक हे वरील बाब सिद्ध करणारी आहे
🌹परिचय-प्रा.सौ.सविताताई ह्या एम.ए.पि.एच.डी.असून पंढरपूर येथे बि.एड.महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.त्यांनी 3 आंतरराष्ट्रीय, 20राष्ट्रीय व 15राज्य स्तरावरील परिसंवादामध्ये भाग घेतलेला आहे.विद्यापिठाच्या अभ्यासक्रम निर्मिती मध्ये व कार्यशाळेत त्या सहभागी असतात. त्यांनी आतापर्यंत 27व्याख्याने दिली आहेत,त्यांचे 25लेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यांना आतापर्यंत 7पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्या उत्कृष्ट सुत्रसंचालन सुद्धा करतात.
सामाजिक कामकाजाची आवड असलेल्या सविताताईना समाज प्रबोधन, समाज शिक्षण व समाज विकासामध्ये रस आहे.
सौ.सविताताईच्या सहभागाने धर्म पीठाची पताका निश्चितच जोमाने फडकणार आहे.
✍️विनायक काळदाते.

No comments:
Post a Comment