धर्मपीठ सत्संगाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धर्मपीठ आपला ऐतिहासिक असा ५०वा सत्संग लवकरच आयोजित करणार आहे व त्या दिशेने नियोजन सुरू आहे.
समाजाचे धार्मिक,आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय प्रबोधन करून सर्वागीण समाज विकास साधन्याच्या हेतूने धर्मपीठ आपले कार्य कुठल्याही प्रसिद्धी विना करत आहे.
सोमवार दिनांक २९नोव्हेंबर रोजी धर्मपीठाचा ४५वा आँनलाईन सत्संग संपन्न झाला.
सौ.शारदाताई ढोमणे यांनी हरिपाठ गायन केले तर संजिवन समाधी सोहळ्या करीता श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी असलेल्या ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या १६व्या अभंगावर आपले चिंतन केले.तसेच ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामाचे १५वे पुष्प गुंफले.
सौ. सुलोचनाताई मेहत्रे, मालाताई शिंदे,प्राप्तीताई चितळकर, प्रज्ञाताई पेशवे,समिक्षाताई उपासे,राधाताई रुपनवर,कल्याणीताई गोफणे, नंदाताई शिंदे, ममताताई चितळकर यांनी भक्ती गित गायन केले.
ह.भ.प.दिवनाले महाराज, घोडस्कर महाराज, घोंगे महाराज,डॉ. अभिमन्यू टकले, बापूसाहेब हटकर,ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी आपले विचार व्यक्त केले.सौ.रेश्माताई ठोबरे यांनी पसायदान सादर केले.सौ.शारदाताई ढोमणे व रिया काळदाते यांनी सत्संगाचे तांत्रिक नियोजन केले.
सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज, दिवनाले महाराज,डॉ. अभिमन्यू टकले, बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,इंजि. श्री.विनोद ढोरे साहेब,विनायक काळदाते, हिमांशू शिंदे,शिवगनेश देवकर,सौ.शारदाताई ढोमणे,रेश्माताई ठोंबरे,प्रमिलाताई फणसे, सुलोचनाताई मेहत्रे, मालाताई शिंदे,प्राप्तीताई चितळकर, प्रज्ञाताई पेशवे, गडदे,राधाताई रुपनवर,कल्याणीताई गोफणे, नंदाताई शिंदे,ममताताई चितळकर यांनी हजेरी लावली.
🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩