धनगर आरक्षण घोंगडे हवेतच-हजार कोटीची उड्डाणे ही हवेतच.
🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा
कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️☸️🕉️
जे जे आपणासी ठावे I ते इतरांसी सांगावे I शहाणे करून सोडावेI. सकळ जण II.
हे संत रामदास स्वामीनी सांगीतले आहे ते काम धर्म पीठा मार्फत करत आहोत.
मित्र हो लबाड बोलल्या शिवाय राजकारण होत नाही.दम देणे, भिती घालणे,आडवणूक केल्या शिवाय सरकारी बाबुला लाच दिल्याशिवाय काम होत नाहीत. त्यामुळे ९९%राजकीय सेवक हे लबाड, ढोंगी, सोंगी आहेत. अपवाद आहेत उदा. मा.योगी आदित्य नाथ,मा.अरवींद केजरीवाल, मा.गणपतराव देशमुख.
८०% सरकारी सेवक (नोकरदार)भ्रष्ट आहेत. २०% आपवाद उदा.तुकाराम मुंढे. संगीता ताई धायगुडे. आरविंद जी केजरी वाल शासकीय सेवक असताना कधी हप्ते घेत नव्हते. राजकीय सेवेतही स्वच्छ कारभार करत आहेत तसेच योगी आदित्यनाथ सारखेही आहेत.बरेच शासकीय सेवक शासकीय सेवेत असताना आयुष्य भर हप्ते गोळा करतात त्या वेळेससमाज आठवत नाही.रिटायर झाल्यानंतर समाज सेवेच्या नावाखाली वर्गणीच्या रूपात हप्ते गोळा करून समाज सेवेचा बहाणा करतात हे समाजाचे दुर्भाग्य. कायद्यात काहीच पळवाट नसेल तर न्याय मिळतो अन्यथा न्याय मिळतच नाही हा आजचा अनुभव आहे.त्यामुळे राज्यातील जनतेने राजकीय, शासकीय सेवकांवर किती विश्वास ठेवायचा हे स्वानुभवातुनच ठरवावे.
सध्या जे सर्व जातीच्या आरक्षण लढाया चालू आहेत त्या सर्व लढायांचे नेते राजकीय सेवक आहेत. त्यांना शासकीय सल्ले देणारे शासकीय सेवक आहेत. या सर्व जातीच्या आरक्षण लढाया ह्या सामाजिक राहिलेल्या नसून राजकीय लढाया झालेल्या आहेत. लोकशाहीत पुढारी आणि त्यांची वंशावळ राजे झाले.लोकशाहीत राजाची वशांवळ जातीयवादी झाली . लोकशाहीत जनता तलवार विसरून गेली आणि वैचारिक व राजकीय दृष्ट्या नपुंसक झाली आहे. लोकशाहीत लोक लोकांच्या न्यायासाठी बौद्धिक हत्यारी बंड विसरून षंढ झाले आहेत.
मला लोक विचारतात मराठा आरक्षण मिळणार का? मी एवढेच सांगेल जर आरक्षण नेता राजकीय सेवक असेल तर तो लबाड बोलून झुलवत ठेवेल. जर केंद्र सरकरची इच्छा शक्ती असेल तरच मराठा आरक्षण मिळेल अन्यथा नाही बाकी सर्व भूल थापा असतील. धनगर आरक्षण साठी मात्र अगोदर राज्य सरकार ची इच्छाशक्ती व नंतर केंद्र सरकरची राजकीय इच्छा शक्ती असेल तरच आरक्षण मिळेल बाकी सर्व भुल आणि थापा आहेत राजकारण आहे. धनगर आरक्षणा साठी खूप मोठा सामाजिक व राजकीय संघटीत लढाई ची गरज आहे.अन्यथा धनगर आरक्षणाचे घोंगडे हवेतच राहील. धनगर जमातीच्या कार्यकर्ते नी राजकीय अभिलाषा न बाळगता घरावर तुळशी पात्र ठेवून लढा उभारला तरच धनगर जमातीच्या आरक्षणाच्या अशा पल्लवित होऊ शकतात अन्यथा नाही आणि नाहीच. अखेरचा धनगर आरक्षण लढा हा राजकीय प्रेरित होता त्याच्यात राजकीय अभिलाषा होती ती अभिलाषा आता काही प्रमाणात पुर्ण झाली आहे.धनगर जमाती साठी एक हजार कोटी आणि आदिवासीच्या २२ सवलती हा भाजपचा निवडणूक पूर्व व निवडणूक अजेंडा होता,राजकीय जुमला होता. पण ती हजार कोटीची भाजप सरकारची घोषणा ही या त्रिदल महाविकास अघाडी सरकारची नव्हती. त्यामुळे ते का राबवतील? आरक्षणाला छेद देऊन अनेक लोक हजार कोटी अस्तित्वात नसताना हजार कोटीच्या वावड्या उडवत आहेत. हजार कोटीं म्हणजे बाजारात तुरी आणि ........ला....मारी?असेच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यानंतर धनगर जमात आजही काही विषयात पारतंत्र्यात व गुलाम गिरीत आहे. स्वातंत्र्या नंतरचे सत्य एक म्हणजे स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी धनगर समाजासाठी स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण मिळवले.दुसरे राजकीय सत्य धनगर जमातीच्या सर्व सामाजिक व राजकीय नेत्यांनी सोलापूर विद्यापीठ नाम विस्तार करून घेतला अर्थातच तत्कालीन कैबीनेट मंत्री राम शिंदे यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमीका बजावली आहे. ७५ वर्षांत धनगर जमाती साठी सर्व पक्षीय शासनाने शुन्य अर्थिक तरतुद केली आहे.भाजप सरकार आरक्षण देण्याच्या तयारीत होते पण देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशा अवस्थे मुळे आरक्षण बारगळले.(समाज नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ आडवा आला)पण आताचे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. प्रमोशन मधील आरक्षण रद्द केले,ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केले आहे . हाता तोडांतील आरक्षण हिरावून घेतले हे काय देणार आहेत? जे पाप सुध्दा देवू शकणार नाहीत त्यांच्या कडून पुण्य मिळेल याची अपेक्षा सोडून द्या.
राजकीय व शासकीय सेवक हे समाजाच्या तिजोरीचे विश्वस्त व रक्षक असतात. आजच्या घडीला खूप कमी विश्वस्त आहेत. म्हणून सिस्टीम चालू आहे. सध्याचे सेवक म्हणतात
जे जे आपणास ठावे I
ते ते सर्व लपवावे I
सतत लुटत रहावे I
मुर्ख बनून सोडावे सकळ जण II
खरे विश्वस्त कोण आहेत हे जमातीने ओळखणे गरजेचे आहे. बरेच बौद्धिक लोक बाहेर वाजायला लागले की चाळ बांधून नाचायला लागतात हे थांबणार कधी?
तमसो माI ज्योतीर्गमये II.
आपले एकमेव अध्यात्मिक, धार्मिक, संत व्यासपीठ .
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

No comments:
Post a Comment