भारतीय स्वातंत्र्याचा आम्रुत महोत्सव साजरा होत असताना प्रमाणीक अशा सामाजिक, राजकीय,धार्मिक देश भक्तांचा ह्रास वा अस्त होतो आहे का?🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
भारतीय भूमी स्वतंत्र व्हावी या साठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले प्राण अर्पण केले त्यांना माझा शिर साष्टांग दंडवत.
सर्व देश बंधू भगिनींना स्वातंत्र्याच्या आम्रुत महोत्सवी दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश गरिबी, दारिद्र्य यांनी रंजला गांजला होता. १९७२ ला भिषण दुष्काळ होता पण स्वर्गीय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलूमिलू आयात केला ,सुकडी वाटली व जनता जगवली.हरितक्रांती झाली,धवल क्रांती झाली. देश अन्न धान्य, दुध दुप्ते मध्ये स्वयंपूर्ण झाला.विज्ञानीकरण, आधुनिकीकरण झाले.स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कारकीर्दी पर्यंत तो जो विकास झाला तो शेवटचा विकास त्या नंतर फक्त दळणवळण विकास झाला.
केंद्रीय आघाडी सरकार सुरू झाले. सरकार मध्ये देशभक्ता ऐवजी भ्रष्ट भक्तांचा संधीसाधुचा शिरकाव सुरू झाला. जनतेचा विकास थांबला . देश भक्ती मावळली संधी सांधूनी जनता गरिब,मध्यम वर्ग, श्रीमंत, अशि विभागली तशा योजना राबवू लागले.पुढे कळसच झाला. आरक्षणाच्या नावावर देशातील विद्यार्थ्यांना टार्गेट करून जाती धर्मात देशांतर्गत फुट पाडण्यात आली.देशात डावे ऊजवे तयार झाले. मस्जिद मंदिर वाद सुरू झाले. हिंदू मतदार विरोधात इतर धर्म असे केंद्रीय राजकारण सुरू झाले.धार्मिक असहीस्नुता सुरू झाली. त्या वरून देशभर वांदग उठले. आरक्षणा नुसार मतदार विभागला गेला खुला,एससी एसटी,ओबीसी,बारा बलुतेदार.राजकीय व शासकीय नेते जनतेचे विश्वस्त असतात परंतु लोकशाहीत हे लोक राजे महाराजे व साहेब झालेत.मंत्रालयात जावून बघा लोक सेवक मंत्री राजा सारखे व नोकरदार पतंप्रधाना सारखे वागत असतात. १९९० पर्यंत केंद्र शासनातील काही मंत्री भ्रष्टाचारात डुबले होते.
तेव्हापासून स्विस बँक भारतात चर्चेत आली.कांग्रेस सरकार मध्ये भ्रष्टाचार होता पण खूप कमी होता.आज जो देशाचा विकास दिसतो आहे ना तो फक्त कांग्रेस सरकरने केला आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थितीही तशीच आहे १९९४ पर्यंत टप्प्या टप्प्यानी विकास सुरू होता. कांग्रेस सरकार गेले झुंड शाही सुरू झाली कधी नाही ते नको ते लोक सत्तेत गेले आणि राज्य धूवून ओरबाडून खाल्ले .२००५ पर्यंत भ्रष्टाचार हा संचालक लेवल व खालच्या पातळीवर असायचा हे जेव्हा सचिव व मंत्री यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सर्व अधिकार म्हणजे अर्थिक व बदल्या, बढत्या, प्रतिनियुक्ती हे सचिव पातळीवर घेतले. क्रिमपोस्ट घेण्याचे व्यवहार सुरू झाले.प्रचंड प्रमाणात हप्ते सुरू झाले. वसुलदार नेमणूका सुरू झाल्या. शासन आणि राजकारण हा बिगर भांडवली व्यावसाय तेजीत सुरू झाला. पैशा पुढे सेवा सुविधा ह्या विकत मिळु लागल्या. नियम कायदे कानून घटनेची आमल बजावणी ही फक्त गरिब जनते साठी व मिडीयाने ट्रायल केलेल्या घटने पुरतेच लागू झाले. आता तर प्रत्येक कार्यालयात वाझे सारखे वसुलदार आहेत.
२००१ पासून 2जी इंटरनेट चे जाळे आले
माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाला प्रिंट मिडीया अडचणीत येवू लागला ,सेवे ऐवजी व्यवहार सुरू झाले. विविध राजकीय पक्षांच्या बाजूने बातम्या येऊलागल्या.जनसामान्य लोकांचे प्रश्न कमी आणि राजकीय लोकांची प्रसिद्धी जास्त होऊ लागली. साहित्यीकाची संख्या वाढली .साहित्यीक लोकांची आक्रमकता सामाजिक भूमीका कमी झाली दर्जा घसरला.फिल्म इंडस्ट्री व क्रिकेट वेड वाढले. २०१० नंतर सोसेल मिडीया आला वाचन कमी झाले. ई पुस्तके ई लायब्ररी सुरू झाली. ई लग्न सुरू झाले.आता तर क्रुत्रीम बुध्दीमता आली. लोक संख्येचा स्फोट झाला एकशे तीस कोटी झाली पण शैक्षणिक, आरोग्य विषयक, दळणवळण सेवा आणि सुविधा वाढल्या नाहीत. शिक्षण आणि आरोग्य सेवांचे बाजारी करण झाले. कोरोना आला आणि शाळांना कुलपे ठोकली गुणवत्तेचे बारा वाजवले व एक ऑक्सिजन सिलींडर दहा रूग्णाला लावावे लागले.व्हेटींलेटर अभावी अनेक रूग्ण दगावले, ज्यांना व्हेंटीलेटर मिळाले त्याचे प्राण वाचले पण व्हेंटीलेटर ची काळजी घेतली नाही त्याला बुरशी लागली त्या बुरशीने अनेकांना डोळे आणि जिव गमवावे लागले.सरकारी लसीकरण कंपन्या उत्कृष्ट काम करत होत्या त्या बंद करून खाजगीकरणास चालना दिली. या खाजगी कंपणी देशाला कोरोना लस देण्या ऐवजी परदेशाला देत आहेत आणि ते उद्योजक देशातल्या नेत्यांची जाहीर बदनामी करत आहेत हे दुर्दैवच की.
विज्ञानीकरण, अधुनिकीकरण या मुळे धर्म, संस्कार कमी झाले त्या मुळे देशाने एवढी प्रगती केलेली असली तरी अधर्म मुळे बरेच लोक माणसीक स्थैर्य गमावून बसले आहेत.
आपला देश, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, विद्युतीकरण,संरक्षण या मध्ये बर्या पैकी अघाडीवर आहे.पण शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, दळण वळण सोयी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, लोकसंख्या नियंत्रण, धर्म संस्कार, शेती उद्योग, व्यवस्थापन या मध्ये आजही असतुंलीत आहे.
भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🌹
प्रा. डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

No comments:
Post a Comment