Monday, November 8, 2021

धर्मपीठाचा ४२वा सत्संग संपन्न.

 🚩धर्मपीठाचा ४२वा साप्ताहिक आँनलाईन सत्संग संपन्न🚩


"रिद्धी सिध्दी लावी पिसे-तयासी कोण पूसे" या शास्त्र वचनाचा दाखला देत ह.भ.प.क़ोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या १३व्या अभंगावर चिंतन केले.तत्पूर्वी सौ.शारदाताई ढोमणे यांनी या अभंगाचे गायन केले.महाराजांनी आपल्या चिंतनात द्वेतबुद्धी म्हणजे मनाची सैरभैर वृत्ती सिद्धि प्राप्तीच्या कशी आड येते हे समजून सांगितले.

  ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपन करताना "चला वळू गाई-बसू एका ठाई"हे शास्त्रवचन सांगत सर्व दुर्विचार,मतभेद दूर करून माणसाने एकत्र बसले पाहिजे ,विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे असे सांगितले. ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा चिंतन व निरुपनातील विषयाला हात घालत आपले विचार व्यक्त केले.

डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, श्री.कुवर साहेब यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.

  सौ.शारदाताई ढोमणे,पुष्पाताई करे,प्रज्ञाताई पेशवे, कल्याणीताई गोफणे इत्यादी भगिनीं


नी गायन केले तर सौ.रेश्माताई ठोबरे यांनी पसायदान सादर केले.

  सत्संगाला ह.भ.प.क़ोल्हे महाराज, कळंब महाराज,घोगे महाराज, घोडस्कर महाराज, कचरे महाराज, दिवनाले महाराज तसेच डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, श्री.विनायक काळदाते,श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे,आर.पि.कुवर साहेब,श्री.विनोद ढोरे साहेब, श्री.खंडेराव पाटील,राजेश दिवनाले सर,शिवगनेश देवकर ,सौ.शारदाताई ढोमणे, रेश्माताई ठोंबरे,पुष्पाताई करे,कल्याणीताई गोफणे,समिक्षाताई उपासे,प्रज्ञाताई पेशवे,प्राप्तीताई चितळकर ईत्यादी हजर होते.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...