स्वर्गीय. आनंदरावजी देवकते .राजकारणातील स्वयप्रकाशीत धनगर तारा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 विनम्र अभिवादन. 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
आनंदराव नारायणराव देवकते यांचा जन्म सामान्य शेतकरी धनगर कुटुंबात राजुर या खेडेगावात ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर येथे झाला. सत्य आणि प्रमाणीकपणा हा धनगर जमातीचे गुणसुत्रातच.ते धनगर असलेतरी ते धनगर जमातीचे नेते नव्हते. ते कांग्रेस चे राज्य स्तरीय नेते होते. सर्व जाती धर्माचे नेते होते. त्यामुळे २५ वर्षे आमदार आणि ५वर्षे मंत्री आणि ५वर्षे महानंदचे अध्यक्ष. लातूरचे पालकमंत्री राहूनही रहाण्याच्या घरातही बदल झाला नाही
राजकारणाची सुरुवात च राजूर गावचे संरपच म्हणून झाली..
खरतर बैरीस्टर टि.के.शेंडगे सहीत एकदम १२ धनगर आमदार स्वबळावर विना खर्च विधानसभेवर स्वतंत्र निवडून आले .तत्कालीन मुख्य मंत्री यशवंतराव चव्हाण आणि मराठा नेत्यांनी धनगर परत विधानसभेत दिसू नये म्हणून ३६ धनगर बहुल मतदार संघ राखीव ठेवले . राजकीय राख झालेल्या धनगर जमातीची आणखी राख करून उजनी धरणात फेकून दिली. धनगर जमातीचे राजकीय अस्तित्व २०१४पर्यंत शुन्य करून टाकले.
दक्षिण सोलापूर तालुका मतदार संघ राखीव ठेवला नाही कारण आंनदराव देवकते संघटन मध्ये खूप हुशार होते. मी त्यांना अनेक वेळा भेटलो. ते अनेक वेळा आमच्या रुग्णालयात डायबेटिक फुट या आजारामुळे येत असत.आणि मी भेटलो की मी गप्प बसत नव्हतो राजकारण आलेच.मला ते म्हणत कांग्रेस माझी आई सोनिया माझी मायी मी त्यांची दायी ते हे जाहीर सभेत ही म्हणत.मी ती निष्ठा ऐकूण तोंडात व कपाळावर मारून घ्यायचो. ६वेळा त्यांना या प्रमाणीक पणामळे तिकीट मिळाले. दक्षिण तालुक्यात मतदार गणीत धनगर ८२००० मुस्लिम ६५०००कोळी लमान ३५००० आणि लिंगायत ८०००० दलित १५००० मराठा १५००० . देवकते साहेब फक्त धनगर म्हणून धनगर मतदान व कांग्रेस म्हणून मुस्लिम दलित मतदान फिक्स असायचे .लिंगायत आणि मराठा प्रंचड विरोध करायचे .ते राजूर ग्रामपंचायत चे सरपंच व १९६३ला दक्षिण तालुका उपसभापती झाले .तरीही १९७८ ते१९९३ व १९९९ते २००३ पंचवीस वर्षे आमदार राहिले.
२००३ला प्रमाणीक पणे आमदार कीचा राजीनामा देऊन मुख्य मंत्री सुशिलकुमार शिंदे साठी जागा रिक्त केली . शिदेंनी परतफेड म्हणून खासदारकिचे तिकीट देवकते साहेबांना दिले .निवडणूकीने धनगर खासदार होवुन संसदेत जावू नये म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते यांनी एक केला आणि धनगर संसदेत जान्यापासून रोखला.प्रतापसिंग मोहीते ना निवडून दिले.खरतरं गोपीनाथ मुंडे साहेबांनी व मराठा नेत्यांनी भाजपामधून रामहरी रुपनवर,सुभाष पाटील, आण्णा डांगे,मा.प्रकाश आण्णा शेंडगे व कांग्रेस मधून आनंदराव देवकते यांची माती केली.देवकते साहेबांचा पराभव धनगर म्हणून आमच्या जीवाला लागला. २००३ते
२००४ला आम्ही सर्वांनी एकत्र येवून डॉ .इंद्रकुमार भिसे सचिव व महादेवजी जानकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली . पुन्हा दक्षिण सोलापूर रचे बाय इलेक्शन लागले अर्जुन सलगर जिल्हा अध्यक्ष होते त्यांचे वय कमी म्हणून त्यांच्या बंधूंना रासपाचे तिकीट देवून उभा करून आम्ही मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पत्नी ला पराभूत केले.देवकते साहेबांचा बदला घेतला. नंतर देवकते साहेबांना महानंदचे अध्यक्ष केले.मला जानकर साहेबांनी यशवंत सेना अध्यक्ष बनवले आणि अर्जून सलगर आणि मी सोलापूर जिल्ह्यात ६५० शाखा उभा केल्या.आम्हाला गोपीनाथ राव मुंडेचा राग होता. भाजपचे २१ सदस्य झेडपीत होते. आर. जी. रुपनर आप्पा विरोधी पक्षनेते होते. झेडपी इलेक्शन लागले आम्ही प्रत्येक भाजपा विरोधात रासप उमेदवार दिला सगळा भाजपा व कांग्रेस पराभूत करून टाकले दुसरा बदला घेतला.नंतर जानकर साहेबांनी रिडोलस स्थापन केले मगळंवेढा पंढरपूर एक लाख धनगर मतदान आहे विजयसिंह मोहीते उभे राहिले धनगर जमातीने पाडून टाकले आणि धनगर जमातीचा राजकीय शत्रू असलेले मोहीते घराने जवळपास संपले आहे.
पंढरपूर ते बारामती आरक्षण दिंडी पहिली बैठक मे २०१४ सोलापूरात झाली.आम्ही प्रंचड प्रसिध्दी दिली त्याच्या कटींग आजही आमच्या कडे आहेत आग लागल्या नंतर आम्ही दिडींतुन निघून गेलो.दिंडी मुळे धनगर कांग्रेस राष्ट्रवादी मधून बाहेर आला. कांग्रेस राष्ट्रवादी मध्ये मुस्लिम दलित राहीला होता मग शक्कल लढवली धनगर दलित मुस्लिम गणीत मांडले.अर्जुन दादानी मला अगोदर विरोध केला आपल्याला बाळासाहेब आंबेडकर चालतील पण ओवेसी नको .नंतर दादा तयार झाला .आम्ही बैरीस्टर ओवेशींना भेटलो आणि मुस्लिम दलित कांग्रेस राष्ट्रवादी पासून दूर करण्यात यशस्वी झालो. महाराष्ट्र राज्यात आम्ही देवकते साहेब व धनगर जमातीचा केलेला राजकीय आपमानाचा बदला घेण्यात यशस्वी झालो.ओवेसी साहेब एमआयएम जिंकले.आम्ही जातीय राजकारणाचा बदला घेतला.
पण देवकते साहेब सर्वांचेच कांग्रेसी ज्येष्ठ नेते होते. त्यांना दक्षिण सोलापूर मतदार संघातील घर ,प्रत्येक माणसाची जमीनीचा बांध कोठे संपतो हे माहीत होते.ते धनगर नेता होण्याचे प्रयत्न ही करत नव्हते त्यांचेच योग्य होते.मा.आमदार गणपतराव देशमुख नंतर राज्यातील ज्येष्ठ आणि सर्वात जास्त काळ विधान सभेत असलेले नेते आंनदराव देवकते होते. त्यांना जर परत सतत तिकीट दिले असते तर ते दुसरे विक्रम वीर प्रमाणीक धनगर होते.म्हणून च या भ्रष्ट व्यवस्थेने त्यांना तिकीट दिले नाही.धनगर शुद्ध, प्रमाणीक ,परोपकारी असल्याने सतत निवडून येतात जर का पन्नासीक आले तर परत धनगरजमाती व्यतिरिक्त कोणच नसेल म्हणून सर्वच पक्ष जमातीला तिकीट देण्यासही घाबरत आहेत.हे वास्तव आहे.
देवकते साहेबांनी सर्व जाती धर्माला सहकारी साखरकारखाना , बाजारसमिती,बैंक इतर पदे बहाल करुन सत्तेचा समतोल राखला.
शेवटी एवढेच म्हणेल देवकते साहेब तुम्ही जन्माने धनगर होते पण कर्माने महात्मा गांधी होते. तुम्ही खूप सहन केले सोसले. तुम्ही शरीरानं नाहीत तर कर्तृत्वाने आमच्यात असाल.तुमच्या जीवनाचा तारा निखळला असला तरी कर्तृत्वाचे तेज सतत तेवत राहील. तुम्हाला आणि तुमच्या जातीला राजकारणात नष्ट करु इच्छीनारांनी जर योग्य वाटा दिला नाही आश्वासने देवून पाळली नाहीत तर २०२४ पर्यंत तुमची जमात या दुष्ट कौरवांना नष्ट करुन सत्यवादी राजांना गादीवर बसवून तुमचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करेल हीच धनगर जमातीचे आपणाला भावपूर्ण 💐💐विनम्र अभिवादन💐💐.हर और जित तो मर्दोके किस्मत के दो सितारे होते है! .देवकते साहेबांचे कार्य पाहून थंड बसायला आम्ही षंड नाहीत. बदला घेतलाय.पडायला , पाडायला,लढाईला शिकलोय रडायला नव्हे. आम्ही लढतच मरणार रडत नव्हे. जब तक जियेंगे तब तक लढेंगे,हरेंगे तो औरभी भी लढेंगे, भिक नही लेंगे. जरूर एक दिन का याब होंगे. .स्वर्गीय देवकते साहेब.
आपलाच जमात वारस.
डॉ अभिमन्यु टकले
संस्थापक
धनगर धर्म पीठ
धनगर साहित्य संमेलन
महाराष्ट्र राज्य.
प्रकाशक: प्रसिद्धी:
श्री विनायक काळदाते-कार्याध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹
No comments:
Post a Comment