🚩एक तरी ओवी-अनुभवावी.
धर्मपीठ सत्संगाने वाट दाखवावी🚩
ज्ञानेश्वरी जयंतीच्या शुभ योगावर सोमवार दिनांक २७सप्टेंबर रोजी धर्मपीठाचा ३६वा संतसंग पार पडला.
ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी हरीपाठावर निरुपन करतांना सज्जनाचे लक्षणे,आचरणे सांगितली.मनात सद्विचार येण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरीपाठ म्हटला पाहिजे असे त्यांनी सांगितले."एक तरी ओवी अनुभवावी"असे श्रोत्यांच्या मनावर बिंबवले.
ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी विष्णूसहस्त्रनामाचे ६वे पुष्प गुंफताना पातांजली योग सुत्रावर छान प्रवचन केले व भगवंताचे विविध नामे सांगितली.ज्ञानेश्वरी जयंतीचा ईतिहास सांगितला.
सौ.शालिनीताई पगारे यांच्या मार्गदर्शनात कु.आसावरी पगारे,अवनी बच्छाव, सुशिल बच्छाव परीवाराने गायन व वादनातून आपली सेवा सादर केली.
सौ.शारदाताई ढोमणे,सुलोचनाताई मेहत्रे,रेश्माताई ठोंबरे,जयश्रीताई वाघ यांनी आपल्या सुरेल स्वरात वातावरण भक्तीमय केले.
डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, प्रभाकर दिवनाले महाराज, ह.भ.प.घोडस्कर महाराज, श्री.विनोद ढोरे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी आभार व्यक्त केले तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.श्री.विनायक काळदाते यांनी सुत्रसंचालन केले.
सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, कचरे महाराज, घोडस्कर महाराज,दिवनाले महाराज ,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे, काशिनाथजी फुटाणे, कार्य.अभियंता विनोदजी ढोरे साहेब,दिवनाले परीवार,दिपकजी नागे,प्रमोदजी पगारे,भाऊराव गाढवे,शिवगनेश देवकर,माणिकराव गुलवाडे, पंकज ढगे,गनेश शिंदे,पियुष दिवनाले,प्रतिक पडळकर,राज घुमनर ,सुशिल बच्छाव तसेच भगिनी मंडळामध्ये सौ.शारदाताई ढोमणे, शशिकलाताई सरगर,नंदाताई चाफले,जयश्रीताई वाघ,रेश्माताई ठोंबरे,प्रितीताई शिंदे,नंदाताई पाटील, प्रमिलाताई फणसे,शालिनीताई पगारे,आसावरी पगारे,अवनी बच्छाव उपस्थित होते.
🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️


सर्वांच्या सहभागाने सत्संग छान झाला.
ReplyDelete