Tuesday, January 4, 2022

धर्मपीठाचा ५०वा सत्संग संपन्न !!

 🚩संत सज्जनांचा मेळा । त्यासि लोटांगण घाला llतेथे जाउनि उभे रहा ll

 🚩धर्मपीठाचा ५०सत्संग संपन्न🔱

  धार्मिक व्यासपीठावरुन प्रबोधन करीत समाजाच्या आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक  राजकीय विषयांवर चर्चा करून समाजाची सर्वांगीन प्रगती साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपीठाचा ५०वा साप्ताहिक आँनलाईन सत्संग सोमवार दिनांक ३जानेवारी २०२२रोजी संध्याकाळी ७वाजता पार पडला.

  सत्संगाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.आ.रामरावजी वडकुते साहेब, त्रिपुरा राज्याचे विद्यूत विभागाचे प्रमुख व ज्यांचा संत साहित्याचा खोल अभ्यास आहे असे डॉ. मुरहरी केळे साहेब उपस्थित होते.

   ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी हरिपाठाच्या २१व्या अभंगावर निरुपण केले तर ह.भ.प.प्रल्हाद कळंब यांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपण केले.ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज,ह.भ.प.दिवनाले महाराज यांनी सुद्धा आपले प्रवचन केले.

  मा.आ.वडकुते साहेबांनी धर्मपीठाकडून सुरू असलेल्या सत्संगाची आवश्यकता व महत्त्व विषद करून  मानसिक शांतते करीता सत्संग हा राजकारणी,समाजकारणी व सर्वांसाठीच आवश्यक असल्याचे सांगितले.

  संत साहित्याचे गाढे अभ्यासक ,महावितरणचे माजी अधिकारी व सध्या त्रिपुरा राज्याचे विद्यूत विभागाचे संचालक असलेले डॉ. श्री.मुरहरी केळे साहेबांनी धर्मपीठाच्या कार्याचे कौतुक करतांना धार्मिक व आध्यात्मिक विचारांमधील फरक सांगितला,सत्संग हा कौटुंबिक संस्काराप्रमाणे एक प्रकारचा सामाजिक संस्कारच असल्याचे सांगितले.

नागपूर जि. प.माजी अध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी डाखोळे साहेबांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनात सत्संगाचे महत्त्व व धर्मपीठ करीत असलेल्या कामाचे कौतुक केले,शुभेच्छा दिल्या.

  डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,श्री.कुवर साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

प्रा.शशिकलाताई सरगर,नंदाताई चाफले,डॉ. रक्षाताई महाजन,प्रमिलाताई फणसे यांनी सुद्धा आपले विचार मांडले.

सौ.पुष्पाताई करे,सुलोचनाताई मेहत्रे,मालाताई शिंदे,रेश्माताई ठोंबरे,प्रज्ञाताई पेशवे यांनी भक्ती गीत गायन करून वातावरण भक्तीमय केले.

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे साहेबांनी आभार प्रदर्शन केले तर सौ.सारीकाताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करून सत्संगाची सांगता केली.


✍️विनायक काळदाते

कार्याध्यक्ष

धनगर धर्मपीठ म.रा.


1 comment:

  1. धनगरांसह मानव जातीच्या सम्यक कल्याणाची संकल्पना धनगरधर्म पिठ निर्माण करेल।

    ReplyDelete

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...