Monday, January 24, 2022

🚩आता तरी पुढे हाची उपदेश l नका करु नाश आयुष्याचाll 🚩

 🚩आता तरी पुढे हाची उपदेश l नका करु नाश आयुष्याचाll 🚩



  🕉️५३ वा धर्मपीठ सत्संग संपन्न🚩

    

 धर्मपीठाच्या ५३व्या सत्संगात हरिपाठाच्या २४ व्या अभंगावर निरुपण करताना ह.भ.प. कळंब महाराज-ह.भ.प.दिवनाले महाराज यांनी सांगितले

 वित्त गोत कुळ शील मात l भजकां त्वरित भावना युक्त ll 

   उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यांत भजन म्हणजे नामस्मरण हेच सर्वात श्रेष्ठ व सुलभ असल्यामुळे संतानी जगाला याच मार्गाचा उपदेश केला आहे.ज्ञानेश्वर माऊली सांगतात तू सुद्धा भजनाचा मार्ग धर,शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरीत म्हणजे विलंब न करता, यापुढे तरी आपले आयुष्य भजन-नामस्मरणाच्या मार्गाला लाव.

 ह.भ.प.नंदाताई चापले यांनी आपल्या प्रवचनात  "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" असे प्रतिपादन केले.

ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

डॉ. अभिमन्यू टकले यांच्या उपस्थितीत सकाळी धर्मपीठ नागपूर महिला अध्यक्ष प्रा. डॉ.रक्षाताई महाजन(खडसे)यांच्या "धनगर-एक शोध"या पुस्तकाचे प्रकाशन झाले,डॉ. टकले यांनी ताईंच्या कार्याचा सत्संगात गौरव केला.

सौ.प्रज्ञाताई पेशवे, समिक्षाताई उपासे यांनी भक्तीगीत सादर केले.मा.विनोदजी ढोरे साहेब, कुवंर साहेब यांनी सुद्धा सत्संगाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.ज्ञानेश्वर ढेपले ,लक्ष्मण पातोंड यांनी सुद्धा आपले विचार व्यक केले.

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी सर्वांचे आभार मानले व सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करून सत्संगाची सांगता केली.

सत्संगाला वक्त्यांसोबतच प्रा.संजय शिंगाडे,प्रा.शशिकलाताई सरगर,प्रा.प्रितीताई नवलकर,प्रमिलाताई फणसे,कमलताई बंडगर,संपादक विजय हुबाले पत्रकार सुनील धनगर,मंगेश चराटे,शंकरराव पारेकर,शिवगनेश देवकर,संतोष पेशवे,संतोष कोगदे,विनायक नवलकार,समर्थ लासूरकर व ईत्यादी श्रोते उपस्थित होते.


विनायक काळदाते

कार्याध्यक्ष,धनगर धर्मपीठ.


सौ.रेश्माताई ठोबरे

प्रसिद्धी प्रमुख

धनगर धर्मपीठ.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...