Monday, January 10, 2022

"मन करारे प्रसन्न-सर्व सिद्धीचे कारण" नामस्मरणातून माणसिक शांतता व प्रगती होते:-ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब.

 🕉️नित्य नेम नामी तो नर दुर्लभ। लक्ष्मीवल्लभ तयांजवळी ॥

  🚩धर्मपीठाचा ५१वा सत्संग संपन्न.🚩

  धार्मिक व्यासपीठावरुन प्रबोधन करून सर्वांगीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपीठाच्या ५१ सत्संगात हरिपाठाच्या २२व्या अभंगावर निरुपण करतांना ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी जिवनात विकासासाठी मनाची शांती पाहिजे, शांत मन नामस्मरणाच्या माध्यमातून समाधान मिळवून आनंदाची प्राप्ती करून घेत असते असे सांगितले.

 सुखी माणूस तोच आहे जो समाधानी आहे  म्हणून जो नित्य नामस्मरण करतो,चालता बोलता नामस्मरणात तल्लीन राहतो त्याच्या जवळ लक्ष्मीचा पती विष्णू वास करत असतो व त्याला सुख समाधान प्राप्त होत असते असेही आपल्या निरुपणातून महाराजांनी सांगितले. 

सध्या अफाट अशी भौतिक सुविधा समोर असताना माणसाला समाधान नाही, समाधान नाही म्हणून सुख नाही व सुख नाही म्हणून शांतता नाही. माणूस सुख शोधत फिरत असतो परंतु त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्याची फरफट होत आहे.धर्मपीठ जिवनातील सर्वागीण प्रगती साधन्यासाठी मार्गदर्शन करणारे व्यासपीठ आहे व सत्संग,नामस्मरण ही त्यावरील मात्रा आहे.

या धावपळीच्या युगात मि पणाचा आव सोडून आपले नित्यकर्म करत असताना माणसाने नामस्मरण केल्यास त्याला आत्मिक बळ लाभून कार्य करण्यासाठी उर्जा लाभते व यश लाभण्याची शक्यता वाढते असेही प्रतिपादन महाराजांनी आपल्या निरुपणातून केले.

सौ.पुष्पाताई करे यांनी हरिपाठाच्या २२व्या अभंगाचे गायन केले व त्यानंतर ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी २२व्या अभंगावर आपले निरुपण केले.

  ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा  प्रबोधन केले.

   समाजाचे जेष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर राव सलगरे,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, प्रा.शशिकलाताई सरगर,नंदाताई चाफले, ज्योतीताई गाडगे,प्रमिलाताई फणसे, ई.आपले विचार मांडले.

जेष्ठ अभ्यासक डॉ. मधूकरराव सलगरे यांनी धर्मपीठाच्या माध्यमातून समाजाचा गौरवशाली ईतिहास पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होण्याची अपेक्षा केली व डॉ. अभिमन्यू टकले यांनी धर्मपीठ याच दिशेने मार्गक्रमण करीत असल्याची ग्वाही दिली.

सौ.सुलोचनाताई मेहत्रे,रंजनाताई कोकणे,पुष्पाताई करे यांनी गायन केले.

सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी सत्संगाची तांत्रिक बाजू सांभाळली.


✍️विनायक काळदाते.


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...