🚩तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||
🕉️धर्मपीठाचा ५२वा सत्संग संपन्न🚩
सत् संगती सदा घडोlसुजन वाक्य कानी पडो या उक्तीप्रमाणे अनेक धर्मसेवक व समाजसेवकांच्या उपस्थितीत धर्मपीठाचा ५२वा सत्संग उत्साहात पार पडला.
ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी हरिपाठाच्या २३व्या अभंगावर निरुपण करताना विद्वानांची लक्षणे सांगितली.रेड्याच्या तोंडातून माऊलींनी वेद वदवून कसे घेतले व स्वताला विद्वान समजणाऱ्या चांगदेवाला सुद्धा कशी जाण करून दिली याचे वर्णन केले.
ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी विष्णूसहस्त्रनामावर प्रवचन करतांना भगवंताच्या विविध नामांचे स्पष्टीकरण करताना ईश्वराचे एक नाव भिषज म्हणजे वैद्यक सुद्धा आहे जो सर्व रोग दूर करतो असे उदाहरण दिले.'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती'या उक्तीप्रमाणे संत हे जगाची काळजी करणारे असतात, त्यांचा संग लाभण्यासाठी पूर्वजन्माचे पुण्यच लागते व सत्संगाला हजेरी भाग्यवानच लावू शकतात हे विशद केले.
ह.भ.प.घोंगे महाराजांनी हरिपाठातील २३व्या अभंगाचे गायन केले तर ह.भ.प.कचरे महाराज, दिवनाले महाराज,डॉ. अभिमन्यू टकले,माजी तहसीलदार श्री.कुवर साहेब, पप्पू बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले.
सौ.समिक्षाताई उपासे,सुलोचनाताई मेहत्रे,सौ.रंजनाताई कोकणे यांनी भक्ती गीत गायन केले तर सत्संगाची तांत्रीक बाजू हाताळत सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करीत सत्संगाची सांगता केली.
✍️विनायक काळदाते
No comments:
Post a Comment