Sunday, October 10, 2021

"अखंड होळकरशाही"पुस्तकाचे लेखक श्री.उज्वलकुमार माने व धर्मपीठ संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांची भेट.

 अखंड होळकर शाही पुस्तकाचे  लेखक व पत्रकार उज्ज्वलकुमार माने यांची भेट.  -----------------------------

प्रा. डॉ अभिमन्यु टकले. 

8793222817

-----------------------------

श्री उज्ज्वलकुमार माने हे मला ऑगस्ट मध्ये भेटायला आले व अंखड होळकर शाही पुस्तक भेट देवून गेले.मी पुजा अर्चा करत होतो आणि म्हणून मी पुस्तक भेट मिळाल्याचा फोटो घेतला नाही.पुस्तक वाचा आणि  कसे आहे ते सांगा एवढे बोलून ते पाच मिनिटात निघून गेले. ते जाताना मी त्यांना सांगीतले तुम्ही खूप कष्ट घेऊन पुस्तक लिहले मी वाचेलच आणि पुस्तक राज्यात गाजेलच.

मला पुस्तक वाचायलाच  तिन आठवडे लागले. मी पुस्तक परिचय व परिक्षणही लिहले होते.मी पुस्तक वाचले आणि  एक माहिती देणारा लेख ही लिहला. खरंतर ते परिक्षणही नव्हत आणि जाहिरात ही नव्हती. मला आवडले मी लिहले. आश्चर्य असे की आठवडा भरात त्याच पुस्तकावर, अनेक  साहित्य, इतिहासाची आवड असनारे जमातीच्या इतिहास प्रेमींनी परिक्षण लिहीले .सोसेल मिडीयात आणि प्रिंट मिडीयात ही राज्य भर गाजले.समाज सजग होत आहे वाचत आहे हे ही प्रकर्षाने जाणवले. या पुस्तकाला राज्य भरातून मागणी ही येवू लागली. 

रविवारी  आणखी ते पुस्तक घेऊन आले चेहर्‍यावर आनंद होता.पुस्तक लिहल्याचे समाधानही दिसत होते. राज्य स्तरीय 

पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या वेळेस सोलापूर येथे माझे मनोबल राखण्याचे  काम येथील सर्व पत्रकार बांधवानी केले होते.मला पत्रकार म्हणाले होते ,साहेब तुम्ही काळजी करू नका कोणीच आले नाहित तर आम्ही चाळीस पत्रकार दोन दिवस सभागृहात बसून राहू संमेलन यशस्वी करू. या सर्व प्रक्रियेचे जनक श्री उज्ज्वलकुमार माने, भरत कुमार मोरे आणि सर्व पत्रकार बंधु होते. आज जी धनगर जमातीची प्रतीमा राज्यात निर्माण झाली आहे त्याचे जनक सोलापूर चे सर्व प्रिंट मिडीयातील पत्रकार आहेत.

सोलापूर ही साहित्य, कला,सांस्कृतिक, ऐतेहासिक नगरी आहे. सोलापूर  येथील पत्रकार  व्यावसायिकतेचे व्यापारीकरण झालेले असतानाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता,नैतिकता यांचे  पालन करत असतात.पत्रकार हा दररोज लेखक असतो. आजही उज्वलकुमार माने यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला हे लवकर व्हावे अशी अशा व्यक्त केली.कोरोना ची तिसरी लाट आलीच नाही. त्यामुळे दिवाळी झाली की स्वागताध्यक्ष,अध्यक्ष, माजी अध्यक्ष ,सर्व राज्यातील सहकारी यांच्या सल्ल्यानुसार चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन जाहिर करू असे सांगितले. उज्वलकुमार माने यांनी साहित्य संमेलना साठी काही सुजाव ही सांगितले.साहित्य आणि धर्म संमेलनाच्या ठरावांना खूप महत्व असते. समाजाचे दखलपात्र मान्यवर ,पत्रकार, समाजसेवक,साहित्यीक संमेलनात सहभागी होत नसतील तर त्यांच्या विरोधात ठराव पास करायला पाहिजेत.चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन  सांगोला येथे अखंड होळकरशाही हे पुस्तक स्टाल वरती ऊपलब्ध करून देवू असेही उज्वलकुमार माने यांनी सांगितले.तसेच सोलापूर  येथे प्रिंट मिडिया  पत्रकार म्हणून जे करता येईल ते सर्व सहकार्य करू असेही त्यांनी अश्वासन दिले.✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️


1 comment:

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...